Skip to main content

Full text of "Vend-uu Veland-akar"

See other formats


1 न६८800%४४/७5 
[_) रि८॥४९(./८० 


(|॥५॥४/८॥२७/१|_ 
(3२,२२४ 


0[)_ 192956 


२०7१००. 
॥४$७--/॥४) 


वेणू वेलणकर 


ठेखक 
'भारीवरासम विठठल वरेरकर 


प्रकादाक--- 


गोपाळ गोविद अधिकारी 
महाराष्र प्रकारन संस्था 
गोवर्धनभुवन, खेतवाडी, मुंबई नं. ४ 


या पुस्तकाच्या दुसऱ्या आत्रत्तींचा हक्क प्रकाशकांच्या स्वाधीन आहे. 


प्रकारान ता. २० जानेवारी १९३७ 


किं, रू, १॥ 


मुद्रक--- 
र. दि. केसाडे, 
न्यू भारत प्रिंटींग प्रेस, 
६ केळेवाडी, मुंबई ४ 


वेणू वेलणकर 


हें पुस्तक गजानन कृष्ण दाबके यांनीं आपल्या 
लघुलेखन पद्धतीर्न लिहून घेतलें, 


प्रकरण १ 
सी उव्योगाला लागलं 


६ इतिहासांत ज्या व्यक्तीची नांवे झळकली आहित त्या व्यक्तींनींच 
इतिहास निर्माण केला आहे. हा जो समज आहे तो किती खोटा 
आहे ! नांबाजलेल्या या ऐतिह्याधिक व्यक्तींच्या छत्राखाली जी माणसं 
गोळा झालीं, नि ज्या माणसांनी स्वतःचे देह, मनं नि प्राण खर्ची 
घालून या ऐतिह्यासेक व्यक्तींना ऐतिह्ासिकता दिली, त्या सामान्य 
समजल्या जाणाऱ्या माणसांचा इतिहास कुणी कर्धा लिहिणार आहे का! 
काळाच्या पोटांत ही माणसं गडप होऊन गेली आहेत. आज त्यांचा 
मागमूस सुद्धां लागत नाही. पण तीं माणसं इतिहासाच्या हिशेबी त्यांच्या 
काळांत महत्त्वाची होती हे कुणालाच नाकबूल करतां यायचं नाही. 

माझ्या चारित्राकडे मी पाहिलं म्हणजे मला असं वाटतं, मी इति- 
हास निर्माण केला नाहीं. इतिह्ठास निर्माण करणारांना माझी मदतही 
झाली नाहीं. इतिहास निर्माण करणारांना माझ्याकडून प्रेरणाही मिळा- 
लेली नाहीं; पण जगाच्या इतिहासांत मला कुठं तरी जागा आहे. या 
“गांत मी वावरले आहे. माझ्या बरोबर वावरणाऱ्या व्यक्तींच्या चरित्रा- 
बर माझ्या चारेत्राचा परिणाम झाला आहे, आणि त्याचप्रमाणे जगाच्या 
व्यग्तारांत देखील थोडी ना थोडी तरी ढवळाढवळ घडून आली आहि 
भाणि म्हणूनच मी माझे हं चरित्र जगापुढं मांडायला तयार झार्ले आहे. 

१ 


वेणू वेलणकर 


इतिहासाच्या कसोटीला माझे चरित्र कदाचित्‌ उतरणारं नसेल, 
संशोधकांच्या दृष्टीनं त्याला एका कवडीची किंमत नसेल; पण माझं 
चरित्र मला माठं वाटते नि म्हणूनच त्याचा हा उतारा करून ठेवणं 
प्रला अप्रस्तुत वाटत नाहीं. 

अगदीं लहानपणापासूनच्या आठवणी कांद्दी साऱ्याच माणसांना 
असत नाहींत. मी देखील माझे बाळपण ज्यावेळीं आठवू लागतें त्या 
वेळीं स्वप्नातील आठवणीसारख्या एकेक गाष्टी माझ्या नजरेसमोर 
उभ्या राहातात. स्वम्तांतील गाष्टीही मला आठवतात नि बालपणांतील 
गोष्टीही मला आठवतात; म्हणून त्यांतील स्वप्नांतल्या कुठल्या नि बाळ- 
पणांतील कुठल्या यांचे साम्य सांगतां येत नार्ही. 

एक प्रसंग आठवतो-तो मात्र स्वम्तांतला खास नव्ह, घरांत मोठी 
आरडाओरड चालली होती. आई धाय मोकठळून रडत होती. शेजा- 
रच्या बाया येऊन तिला न्हाणीघरांत धऊन गेल्या. आंघोळ करून ज्या 
वेळीं ती आली त्यावेळीं मला उराशी कवटाळून टाहा फोडून रड 
लागली. मीही रडत होत; पण कां रडत होते हे माझे मलाच कळत 
नव्हतं. आई रडते आहि---तिला कांही तरी दुःख झालं आहे --एव्हृढी 
मोठी आई रडते म्हणून मला रडटूं येत होतं. मी मोठी झालें त्या वेळी 
मला कळलं, कीं मी त्या दिवशीं पितृसुखाला आंचवलं होते. 

मला वाटतं, या वेळीं माझं वय तीन चार वर्षाचे असावं. आठव- 
णींत असलेली ही ठळक गोष्ट घडल्यानंतर मी निरनिराळ्या गार्वी 
फिरत होते एव्हढंच आतां मला आठवतं. केव्हां प्रवास खटाऱ्यांतून 
केला होता, केव्हां आगगाडीतून केला होता आणि केव्हां मला कडेवर 
घेऊन माझी आई पार्यीही चालली होती. 

जुन्या आठवणी पडताळून पाहण्यासाठी या प्रवासांची हकीकत 
आईला विचारावी असं किती तरी वेळां माझ्या मनांत येई; पण ती 
होऊन जोपयत आपल्याला इकीकत सांगत नाद्दी तोपर्यंत आपण तरी 

९ 


मी उद्योगाला लागल 


तिला कां विचारावं या अभिमानाने मी आजतागायत हा प्रश्न विचार- 
ब्यासार्ठी कधींही तोंड उघडले नाही. 

या हकोकती कळून तरी मला काय करायचं होतं ? मी पितृद्दीन 
झाले, आईला दारोदार भटकावं लागलं, तिचे बरेचसे हाल झाले, 
एव्हढ्या गोष्टींची जाणीव जा पयत स्पष्टपणें होत हाती ता पर्यंत तपशी- 
लाचची पवी तरी मी कां करावी ? 

आईचा स्वभाव मोठा अभिमानी आहे. आज म्हणजे अशी फारशी 
सुखाची परोस्थाते आहे असं नाही, पण सुखदुःखाच्या गो्शे सांगणं 
तिला मुळींच आवडत नाहीं, माझे वडील वारल्यानंतर तिच्या आयु- 
प्याला जे एक प्रकारचे वळण लागलं त्यामुळे आम्ही एकमेकांना 
पारख्या झाल्यासारख्या होतो. तिनें जा पेशा पत्करला होता त्या पेशाच्या 
पार्यी दिवसाचे चोबीस तात ती गुंतून रहात असे. माझ्याकडे लक्ष 
द्यायला तिला पुरेसा वेळही नसे. त्यावेळीं माझा भार मलाच सहन 
करावा लागत असे, तीच संवय अंगवळणी पडत गेली आणि मी 
जन्माची मित्रहीन बनलें स्वतःचा विचार स्वतःच करायचा, सला मस- 
लत स्वतःचीच घ्यायची, मनाचा निश्चय ठरवायचा तोही स्वतःचा 
स्वतःच, अशारितीने मी जन्माची एकलकोौडी बनून राहिलें. 

माझे वडील वारले त्यावेळी आमचं स्वतःचं असं कांही सुद्धां नव्हतं. 
आईच्या माहेरची माणसं होती. पण तीह; आमच्या इतकींच दरिद्री 
होतीं. माझ्या वडिलांचे कुणी चुलत भाऊ वगेरे होते असं म्हणतात. 
अजूनपर्यंत मी त्यांना पाहिलं नाही. आणि यापुढं पाहाण्याची 
इच्छाही नाहीं. पण पहिल्यापासूनच माझ्या वाडेलांचं नि त्यांच वितुष्ट 
असल्यामुळें प्रसंगीं ते मला उपयागी पडतील अशी आशा करायला 
जागा नाही. 

आणि तशी कुणाचीच आशा माझ्या आईनं घरली नव्हती. स्वतः 
च्या पायावर उभं राहायचं तिनं पत्करलं होत खरं, पण ती एक ख््री 


यी 


क 


वेणू वेलणकर 


होती, अशिक्षित होती आणि विशेषतः असहाय होती. बायकांना, 
विरोषतः ब्राह्मणांच्या बायकांना स्वतंत्ररितीने करतां येण्याजागा जो एक 
धंदा होता तोच तिने पत्करला. माझ्या आईने आमच्याच गांवी पहि- 
ल्यांदा एक खाणावळ घातली. मी तेव्हां लहान होते. आमच्या घर्र 
पुष्कळ माणसं जेवतात, या पलिकडे आमचा उदरनिर्वाह कश्यावर 
होतो याची मला कल्पना नव्हती. 

खाणावळीचा धंदा पत्करल्यामुळे गावांतील बायका माझ्या आईला 
कमी लेखीत असत; नि तीही मानी असल्यामुळे ओळखीदेखीच्या 
बायकांशी देखील तिनं आपला संबंध तोडून टाकला होता. 

तालुक्याचं गांव ! तिथं खाणावळीच्या धंद्यांत मिळून मिळून असं 
काय मिळणार ? कसाबसा आमचा उदरनिर्वाह होत असे एव्हढंच. 

आई परिस्थितीशी झगडत होती--परंतु तिच्या या झगड्याची कल्पना 
मला नव्हती. डोजाऱ्यापाजाऱ्यांच्या मुलींबरोबर खेळायचं--मुलां 
बरोबर नव्हे--मुलांमुळीरनी एकत्र खेळणं ह त्या तालुक्‍याच्या गांवी 
मंजूर नव्हत. थोडसं शाळेत जायचे--शक्‍य तितकी शाळा चुकवायची 
आणि घरांतून जितकं दूर राहातां येईल तितकं दूर राहायचा प्रयत्न 
करायचा, हौच माझी दिनचर्या होती. आई देखील फारशी माझी 
चौकशी करीत नसे; म्हणजे माझ्याबद्दल तिळा कळकळ नव्हती असं 
नाही, पण तितक्‍या कळकळीनं चौकशी करण्याइतकी तिला फुरसतच 


नसे. खाणावळींत जीं दहा बारा माणसं जेवायला होतीं, त्यांच्या जेवणाची 
व्यवस्था करण्यासाठीं तिला सारा दिवस राबावे लागत असे. 


जेवणारे लोक होते त्यांच्याकडून पेसे वेळीं मिळत नसत, त्यामुळं 
देणकऱ्यांचे तगादे लागत. ते पेसे आले नाहींत म्हणजे जवण करीत 
असतांना चडफडत आह जे आपल्याशींच बोठे-केव्हां केव्हां मला 
उद्देशून बोले--त्यामुळं त्या वेळच्या आमच्या ग्रहृत्थितीची कल्पना मला 
आतां करतां येते आहे. 
ड 


मी उद्योगाला लागळं 


मला आठवण आहे, ते कुणीतरी कोटोतील कारकून असावेत. 
नाझर किंवा शिरस्तेदार असच कुणीतरी होते. ते वारंबार माझं कोतुक 
करीत असत, मी शाळेंत गेलें कीं नाहीं, अभ्यास केला कीं 
नाहीं, माझी प्रकृती, माझे कपडेलत्ते, वगेरे गोष्टींबद्दल विचारल्या - 
शिवाय त्यांचा एक दिवस देखील जात नसे. त्यांना माझ्याबद्दल एव्हढी 
कळकळ वाटे खरी पण त्या त्यांच्या प्रश्नांचा मला राग येत असे. मी 
शारळित जाईन किंवा न जाईन---या ग्रहस्थाला त्याचं काय होय ! प्रत्यक्ष 
माझी आई, ती कधी मला विचारीत नाही--आणि हवे माझ्या घरी 
जवायला येणोर ग्रहस्थ यांनीं काय म्हणून नसती चोकशी करावी १ 
त्यांच्या प्रश्नांना म्हणूनच मी अगर्दी तुटक उत्तरे देत असे. 
“ मी कशीही उत्तर दिलीं तरी त्यांनीं माझी चोकशी करायचं कधींच 
बंद केलं नाहीं ! मी फारच तुटकपणा दाखवला तर ते मला जबळ ओढून 
घेत, माझ्या डोक्यावरून हात फिरवीत, “ अशी उत्तरं देऊं नयेत 
म्हणून मोठ्या गोड भाषेत सांगत--पण मी कधींच बघलें नाही, चुकून- 
सुद्धां त्यांना कर्धी सरळ उत्तर दिलं नाही. 

मला चांगलं आठवतं, एके दिवशीं त्यांनीं माझ्या आईला विचारल, 
तेव्हां ती म्हणाली, '“'दळमद्री पोरगी, तिला स्वतःचं काय आहे! खाटते 
आहे, राबते आहे मी. जरा वयानं मोठी असती तर कामाला तरी 
राबवून घेतली असती. असं वाटतं, नसती पोर तरी बरं 'झालं असतं 
संकटंच यायची, त्यांत पोरं कशाला गळीं पड्डून राहतात देव जाणे. 

ते ग्रहस्थ म्हणाले, “ असं बोलूं नये सत्यभामाबाई. तुमची वेणू 
आहि हुशार पण तिला तुम्ही रीत लावीत नाहीं. मुलगी लहान आहि 
म्हणून काय झाले! लहानसान कामाला देखील नाहीं का हातभार लावा- 
यची ! पण ही लह्वानसान कामे क्शी करायची ह तुम्ही शिकवलं पाहिज,” 

त्यांच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. सारीरात्र मी 
बेछान्यावर विचार करीत तळमळत होते. आई आपणाला वळण 

ह 


ब्रेणू वेळणकर 


लावीत नाहीं, म्हणजे काय ! आणि लहानसान कोणती कामं आपण 
कराबींत ? रोज आई काय कामं करते हेंच मला मुळीं माहीत नव्हते. 
जेवायला हाक मारली, कीं थेऊन जेवायला बसायचे, या पलिकडे जवण 
कसं तयार केलं जातं याचीही मला कल्पना नव्हती. 

दुसऱ्या दिवशीं सकाळीं मी उठले आणि आई काय काय कार्म 
करते त॑ लक्ष लावून पाहूं लागलें. आई भल्या पाहाटे उठत असे. मीही 
त्या दिवशी लबकर उठले, ते पाहून आई म्हणाली, “'काय ग, लवकर 
कशाला उठलीस £! झोंप लागली नाहीं वाटतं रात्री ! कुठं दुखतं- 
खुपतं आहे का!” 

“६: कांही नाहीं होत. आपली उगीचच ! मी म्हट्लं, “तू कां 
उठतेस लवकर म्हणून मी उठले.” माझं उत्तर न ऐकलंसं करून आई 
कामाला लागली. 

मी जवळ जवळ मुकादमीच करीत होतें ग्हणा ना. उढल्यापासून 
आई काय करत याच्यावर माझं सारखं लक्ष होतं. आणि ते लक्ष ठेवीत 
असतांना त्यांतली कोणती कामं आपल्याला करतां येतील याचा मी 
अंदाज घेत होते. त्या दिवशीं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी सारी 
कामे लक्षपूर्वक पाहिलीं नि दुसऱ्या दिवशीं सकाळींच आई ज्या 
वेळीं तांदूळ निवडायला बसली त्यावेळीं मी जाऊन तिला मदत 
करू लागलें, 

आश्चर्यचकित होऊन आईने माझ्याकडे बघितलं, पण ती कांही 
बोलली नार्ही. निवडलेले तांदूळ घेऊन आई सैपाकघरांत गेली. आईने 
आणून ठेवलेली भाजी मी मागीलदारीं जाऊन धुऊन सपाकघरांत आई- 
जवळ आणून दिली. 

पुन्हां ती आश्चर्यचाकेत झाली. मी केरसुणी हातांत घेतली आणि 
केर काढायचा प्रयत्न केला. केरसुणी माझ्यापेक्षा देखील उंच 
होती. ती मला कांहीं केल्या सांबरेना. इंसत इंसत आईने केरसुणी 
माझ्या हातून घेतली आणि केर काढायला सुरवात केली, मला थोडंसं 

६ 


मी उद्योगाला लागरळ॑ 


वाईटच वाटलं; पण आपल्याला केर काढतां यायचा नाहीं हे॑आई 
केर काढीत असतांनाच मला पटलं आणि म्हणून मी दुसर कोणतं तरी 
काम करण्याकडे नजर वळवली. किती वेळ विचार करून पाहिला पण 
मी करतां येण्याजोगे काम कोणतंच आढळून येईना. भाजी चिरून ठेवावी 
असं एकदां माझ्या मनांत आलं होतं; पण विळी पाहिली म्हणजेच 
जिथं मला भीति वाटत होती तिथं भाजी चिरण्याचा प्रश्न कुठला १ 

ह्ञान करण्यासाठी आई निघून गेली असं पाहून मी सेंपाक घरांत 
बसलें, माझं डोकं सारखं भ्रमण करीत होतं. कोणतं काम करावं हँ 
सुचत नसल्यामुळं माझा जीव वळवळल्यासारखा झाला होता. आईचा 
मला राग आला. तिनं नार्ही का सांगू कांर्ही ? काम करायला मी तयार 
झाले आहे एव्हढं कळल्यावर तरी तिने कोणतं काम मी करावं तै दाख- 
वून द्यायला पाहिजे होतं. पण ते नाझर म्हणाले तंच खरं--मुलीला 
वळण कर्स लावावं है माझ्या आईला कळत नव्हतं हेंच खरं. 

आई आंग धुवून आल्यावर मीही न्हाणीवर गेलें. परकर चोळी बदढून 
पुन्हां एकदां माजघरांतला केर काढण्याचा प्रयत्न करूं लागलें. पुन्हां 
आई आली आणि तिनं खसूकन माझ्य़ा हातांतली केरसुणी काढून घेऊन 
केर काढायला सुरवात केली. तिने केरसुणी काढून घेतली त्यावेळीं ती 
आतां रपाटा देणार असंच वाटलं होतं, पण सुदैवानं तिने तसं कांहीं 
केलं नार्ही. 

केर काढून आई घरांत गेली असं पाहून मी पाट ठेवायला सुरवात 
केली. मी पाट ठेवीत असतांना आई शेजारी उभी राहून नुसती पहात 
होती. कांही पाट जड होते नि कांही हलके होते. कशीवशी मेटाकुटीनें 
मी आपलं काम उरकीत होतं. पाट ठेवून झाले त्यावेळी मला असं वाटल, 
कीं ते एका ओळींत कांही आले नाहींत. मी बाजूला जाऊन पाहिलं नि 
पुन्हां येऊन शक्‍य तितक्‍या सरळ रेषेंत ते पाट मांडले. 


पाण्याच्या इंब्याजवळ आहे तांब्रे भांडी भरून ठेवीत होती. तो एकेक 
तांन्या आणून मी प्रत्यक पाटाजबळ ठेवला. मी तांबे मांडीत 


७ 


वेणू वेटळणकर 


होते इतक्यांत नाझर आले आणि मी काम करते आहे असं पाहून 
म्हणाले, “' वाः पोरी, असंच कांही तरी काम करीत जावं. कांही तरी 
करायचे म्हणून मनांत आणलं म्हणजे आपोआपच काम समोर येतं. 


एकंदरींत माझ्या बोलण्याचा उपयोग झाला म्हणायचा. असंच हिला 
बळण लावा इं सत्यभामाबाई. 


सैंपाकघरांत आई चुलीजवळ काम करीत होती, तिथूनच म्हणाली, 
“६ तेचे तीच करते आहे, मी कांही सांगितलं नाही तिला. 

“६ ठीक ठीक, ” नाझर म्हणाले, '' तिचे तीच करीत असली तर 
मोठं कोतुक आहे म्हणायचं ! ” 

आईचे ते उद्गार कांही मला आवडले नाहींत. ' तिचं तीच करते 
आहे ' म्हणजे काय ? मी काम करीत होतें ते॑ आईला आवडत का 
नव्हतं ? पसंत कां नव्हतं ? ' तिचं तीच करते आहे. ' असं म्हणून तिने 
मला टोमणा दिला असं मला वाटलं. मी म्हणाले, “ हो माझं मीच 
करतें आहे. आहे सांगतच नाहीं मला कांदहीं--मग मी तरी 
काय करावं !” 

“६ खरं आहे ते, ” आई म्हणाली, “' काम करायच्या निमित्ताने 
आजची शाळा चुकवलीस. 

आईचा मला फार राग आला. मी जी तिथून तडक निघाले ती 
निजायच्या खोलींत जाऊन बिछान्यावर अंग टाकून रड्टूं लागलें, एव्हढं 
काम केलं त्याचं कांही चीजच नार्ही ! शाळा चुकवण्यासाठी का मी 
काम करीत होते. एव्हढ्या मोठ्या ग्रह्स्थानं सांगितलं म्हणून माझ्या- 
परीने मी प्रयत्न करून पाहिला, तरी आईने माझ्यावर असा आरोप 
करावा ! तेव्हांच्या तेव्हांच मी निश्चय केला, यापुढं आईच्या कुठल्याही 
कामाला कर्षीही हात लावायचा नाही, शाळेत मात्र अगदीं वेळच्या 
बेळेवर जायचं. 

दुसऱ्या दिवसापासून शाळेंत जाण्याचे काम मी अखंड सुरू केलं, 
नि एकही दिवस मी गेरइ॒जर राहिल्याची तक्रार येऊ दिली नाहीं, 

ट 


प्रकरण २ 
आम्हीं मुंबईला आला 


अर्शीच एक दोन वषे निघून गेलीं, त्या मुदतीत म्हणण्याजागं कांही 
झालं नाही. नाझर आमच्या खाणावळींतून निघून गेले होते. त्यांनी 
बिऱ्हाड केलं होतं. ते मधून मधून येतां जातां आमची चोकशी 
करीत असत. 
कांई। दिवसांनी तेही तिथून बदली होऊन निघून गेले. त्या वेळी 
खाणावळांत जी इतर मंडळी होती त्यांच्यापैकी कुणीच माझ्याबद्दल 
सहानुभूति बाळगणारी नव्हती. मी त्यांच्या खिजगणतींतद्दी नसे. केव्हां 
केव्हां एकादा ' हे आण, ते आण,' म्हणून मला हुकूम सोडी; पण आई 
त्यांना सरळ सांगत असे, कीं मुलीला कांही काम सांगायचे नाहीं. 
माझा एक समज ठाम झाला होता, कीं शाळेत जाणे आणि शिकणं, 
या पलिकडे मला दुसर काम नार्ही. नाझरांच्या मताप्रमाणे मी घरचे 
काम केलं पाहिज होतं. पण, मी नुसतं शिकावं, घरचे कांही काम करूं 
नये, अशी जोपर्यत आईची इच्छा होती तोपर्यंत घरचं काम करण्याचा 
प्रयत्न मी पुन्हां केव्हांच केला नाही. 
हळूहळू आमच्या खाणावळीतून माणसं कमी हाऊ लागलीं. 
गावांत आणखी एक दोन खाणावळी नवीन उघडल्या गेल्या होत्या 
त्यांच्यांत माणसांची वाटणी होऊं लागली आणि आमची खाणावळ 
जवळ जवळ बंद पडायच्या बेताला आली. 
९ 


वेणू वेळणकर 


एके दिवशीं रात्री आई मला जवळ घेऊन रडत बसली होती. मला 
उद्देद्दून ती केव्हांच कांही बोलत नसे; पण काय झालं कुणाला ठाऊक, 
ती त्या दिवशीं मलाच उद्देशून बोळूं लागली, म्हणाली, “' काय तुझं 
नशीब आहे पोरी देव जाणे ! अशी अनाथ पडलें ग्हणून हा खाणा- 
वळी'चा धंदा सुरु केला. नांतवाइकांनीं आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांनीं नांवं 
ठेवली त्याची पवी केली नाहीं ग्हणून आजवर दोन घास खायला 
मेळाले; पण आतां तेंही साधन जाणार असं दिसतं. काय करावे--कांही 
सुचत नाहींत झालं आहे. ” 

मला वाटलं, आपल्याला तरा कांहीं उपाय सुचचला असता तर तिला 
यावेळीं सांगितला असता. मी किती प्रयत्न करून पाहिला, पण मला 
कांहीं उपाय सुचला नाहीं. कांही तरी बोलायचं म्हणून मी म्हटलं, 
“८ ह आमच्याकडे जवायला येणारे लोक कोट कचऱ्यांत जातात तशी 
तू कां जात नाहीस!” 

हून्यपणाने हंसत आई म्हणाली, “' अग ते पुरुष आहित. बायका 
कोर्ट कचेऱ्यांत गेलेल्या कधीं पाहिल्या आहेस का!” 

माझ्या प्रश्नाबद्दल माझं मलाच इसूं आलं. “'मग आतां काय करायचे! 

आई माझ्या डोक्यावर हात फिरवीत होती. तिला काय वाटलं 
कुणाला ठाऊक, तिनं चटकन माझी हनवटी उचलली आणि माझं 
तोंड उचलून माझ्याकडे डोळे भरून पाहिले. आईला वाइंट वाटूं नये 
म्हणून मी हसतमुख राहण्याचा प्रयत्न करीत होते-पण कां कोण जाणे, 
मला 'चटूकन रडण्याचा हुंदका आला. मी रडते असं पाहून आईही 
रडूं लागली. 

रडत रडतच ती म्हणाली, “' देव काय मार्ग दाखवील तो खरा. 
प्राण गेला तरी कुणापुढं हात पसरायला मी जायची नाही, माझे नशीब 
मी हातीं घेतलं आहे, ती कांहीं झालं तरी दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहायची 
नाहीं. तुला काय वाटतं वेणू ! मुंबईला जाऊं या का आपण ! ” 

२१० 


आम्ही मुंबईला आळा 

6६ मुंबईला ! ” मी विचारलं, “' मुंबईला म्हणज कुठं!” 

६ तै खरं, ” आई म्हणाली, “' तुला काय कळणार मुंबई. मुंबईला 
म्हणजे असं, इथून बोर्टीत बसायचं आणि भलं मोठं एक गांव आहि 
तिथं जायचे. त्या गांबाला म्हणतात मुंबई, ज्याला पोटापाण्याला 
मिळत नाहीं अर्शी, सारी माणसं त्या मुंबईला जातात नि चांगली 
गबर होऊन देखील येतात. तेव्हां. आपण त्या मुंबईलाच जाऊं. 

“ असं १ ” मी टाळ्या पिटीत म्हटलं, “' जाऊं बरं--आपण 
मुंबईलाच जाऊं. ” 

आई आपल्याशींच बडबडली, “' हा देवाचा कोल मिळाला 
म्हणायचा ! 

आई काय म्हणाली हँ मला त्यावेळीं समजलं नव्हते. आपण मुंबईला 
जायचे, या कल्पनेने मी आनंदित झालें हाते. मुंबईला जायचे 
म्हणजे काय ? मुंबई कुठं आहे ? आमच्या गांवापेक्षां मोठी म्हणजे 
किती मोठी ! तिथं जाऊन आपण करणार तरी काय ? याची कोणतीच 
कल्पना मला नव्हती. 

असेच आणखी कांही दिवस गेले. मुंबईला जाण्याची गोष्ट त्यानेतर 
आईने काढली नाहीं. मला वाटलं, मुंबईला जायची आलेली लहर 
गेली. आतां कांही आपण मुंबईला जात नाहीं. मुंबईला जाण्यांत सुख 
होते कीं दुःख होते याची जरी मला कल्पना नव्हती, तरी एकंदरीत 
मला वाईटच वाटलं. 

दिवसंदिवस खाणावळींतील माणसं कमी होतां होतां एकदोधेच 
जवायला येऊं लागले होते. 

एके दिवर्शीाी आईनं खाणावळ बंद केली. एकदोन दिवस कांही 
न करतांच गेले, पण आई कांही तरी उद्योगांत होती. रोज ती कुठं 
ना कुठं तरी जात असे. कुठं जात असे, काय करीत असे, याची मला 
मुळींच कल्पना नव्ह्ती. पण एके दिवर्शी जेव्हां तिनं सामानसुमान 

११ 


येणू वेलणकर 


बांधायला सुरवात केली त्यावेळी मला वाटलं की आतां आपण 
मुंबईला जाणार. 

६ मुंबईला जाणार ' असं कांही आईनं सांगितलं नाहीं. मीददी 
विचारलं नाहीं. ती होऊन सांगेपर्येत कांही विचारायचं नाहीं, असंच मी 
ठरवलं होतं. 

एक दिवस आम्ही जायला निघालो, सामानसुमान घेऊन बोटीवर 
चढली; पण आपण कुठे जाणार, हं कांही आई बोलली नाहीं. 

तो बोटीचा प्रवास मला पहिलाच होता. एव्हढ्याश्या जागेंत किती 
तरी माणसं कोबलेलीं पाहून माझा जीव कासावीस झाला, मी 
बोटीच्या कठड्यावरून बाहेर पाहिलं, जिकडे तिकडे पाणीच पाणी 
दिसत होतं. आतां या पाण्यांतून आपण जाणार कुणीकडे, असा प्रश्न 
माझ्या मनांत उत्पन्न झाला. 

आमच्या होजारीं बसलेल्या एका बाहने विचारलं तेव्हां “ आपण 
मुंबईला जात आहों ' असं जेव्हां आईने सांगितलें तेव्हां माझा जीव 
खार्ली पडला. समुद्राचं पाणी पाहून घाबरून गेळेल माझा जीव, आपण 
कुठंतरी मुक्कामाला जात आहोत असं कळतांच, ठिकाणावर आला, 

बोट क्रितीतरी वेळ पाण्यांत होती. मधून मधून होड्या भरभरून माणसं 
येत, नि बोटीत चढत, तसतशी गर्दी वाढत होती. सार्रच माणसं मुंबईला 
जाणारी आहेत कीं काय, असा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला, पण कांही 
कांही माणसं ज्यावेळीं बोटीत येत त्याचवेळी उतरून जात असत, हे 
पाहून घराकडून निघालेली सारीच माणसं काई मुंबईला जात नाहींत, हँ 
मला कळून आलं. 

रात्र होत आली. माझा डोळा लागला. गी जागी झाले तेव्हां जिकडे 
तिकडे गडवड सुरू झाली होती. बोट चालायची थांबली होती. 
कठड्यावर डोकावून मी पाहिलं तो. मली मोठी भिंत समोर असलेली 
मला दिसली, दुसऱ्या ब्राजूकडे जसं पाणी दिसत होतं तसे मधून 

१२ 


आम्हीं मुंबईला आला 


मधून दिवे लकलकत असलेले दिसत होते. हा काय प्रकार आहे याची 
मला कल्पना येईना. 

तांबडा पोषाख केलेले कांही लोक एकदम तिथं आले आणि आमचे 
सामान उचलून घेऊं लागले, तेव्हां आई म्हणाली, ““* चल, आली 
मुंबई, आला बरे आपण आतां मुक्कामाला ! ” 

बोटीचा जिना चढून आम्ही वर गेला. तिथं बोटीबाहेर जाण्याकारितां 
जीं एक फळी टाकली होती तिच्यावरून आम्ही जमिनीवर गेला. तिथं 
माणसांची खच्चून गर्दी झाली होती. रस्त्यावर खांबावरून लावलेले उंच 
उंच दिवे पाहून मला फारच आश्चर्य वाटलं. 

एक गाडी करून आम्ही चाळू लागला. ती गाडीही मोठी चमत्का- 
रिक हाता. तिला एकच घोडा होता पण तींत बसायला जागा चांगली 
ऐसपैस होती. 

रस्त्यावरून आम्ही जाऊं लागलो त्या वेळी घोडाबिडा कांहीच नस- 
लेल्या केव्हढया तरी मोठ्या गाड्या घरघर आवाज करीत खूप वेगानं 
पळत असलेल्या पाहून मी घाबरून गेले, तशाच कांही लहान गाच्या 
अशाच आपोआप रस्त्यावर चालत होत्या. ते सगळे चमत्कारिक प्रकार 
पाहून माझा जीव डोळ्यांत आला. मुंबई म्हणजे एक फार मोठं गांव 
आहे, असं आईने मला सांगितलं होतं खरं --पण तें गांव एव्हढं अफाट 
असल अशी माझी कल्पना नव्हती. 

आम्ही एका मोठ्या घराशी येऊन थांबलो. सामानसुमान उतरून 
काढून घेतलं आणि तिथंच विडी फुंकीत असलेल्या एका गख्याच्या 
डोक्यावर देऊन आम्ही त्या घरांत प्रवेश केला. जिन्यामागून जिने 
चढून आम्ही जात होतो. 

आम्ही किती जिने चढून गेली याचा आम्हांला अंदाज लागला नाहीं. 
ज्या वेळीं आम्ही सर्व जिने चद्ठन गेलो त्या वेळीं जिकडे तिकडे सारी 
दारेच दारे लागलीं. आई प्रत्येक दाराजवळ जाऊन चौकशी करीत होती. 

१२ 


वेणू वेळणकर 


होवटी एकदांचा आमचा मुक्काम सांपडला आणि त्या दाराशी 
आम्ही सामान उतरून घेतलं. दार उघडण्यासाठी जे ग्रहस्थ आले होते 
ते साधारण दुर्मुखलेलच दिसत होते. मला वाटलं, आम्ही आल्यामुळं 
त्यांच्या चेहेऱ्यावर तशी छाया आलो असावी, पग पुढं मला कळून 
आलं कां त्यांचा चेहेराच तसा दुर्मुखलेला होता. 

ते माझे दूरच मामा होते. आईला पाहतांच ते म्हणाले, “ आलीस ! 
हे सामान किती आणलं आहेस बरोबर, तुम्हां दोघांचाच इथं 
समावेश कसा होईल, या काळजींत मी होता. इथं हें तुझं सामान कुठं 
ठेऊन देऊं आतां १ ” 

कांही न बोलतां आई आंत गेली, मीही तिच्याबरोबर आंत गेलें. 
आंतून एक बाई डोळे चोळीत चोळीत बाहेर आली. तिचा चेहरा 
दुर्मुसखलेला नव्हता तरी तिला पहातांच आपलेपणाची भावना कांही 
मनांत जाग्रत होत नव्हती. मला वाटलं, आम्हीं आलो हें पाहून तिला 
कांही आनंद झाला नाही. 

गोंदुमामांच्या घरी आम्ही मुक्काम ठोकला खरा; पण आम्हांला कांही 
फारशा लोभानं वागवलं जात नव्हतं. आईने आपला विचार त्यांना 
जेव्हां कळवला तेव्हां ते म्हणाले, “' ह तुझे करणे कांही. आपल्याला 
आवडत नाही. तिकड गांवी खाणावळ घातली होतीस, इकडे कांही 
कळत नव्हतं, तौपथयेत बरे होते. मी इथं हायकोटांत असतो. माझा 
दर्जा फार मोठा आहि. दूरच्या कां होईना --पण माझ्या बहिणीनं मुंपईत 
खाणावळ घातली आहि हें जर माझ्या ऑफिसांत कळलं, तर मला तोंड 
दाखवायला जागा रहाणार नाही. 

५: मग मी काय करु £? ” आईने विचारलं, “' दुसरा काय आधार 
आहि मला ! कुठं सेपाकिणींचे काम मिळेल का मला?” 

डोकं खाजवीत खाजवीत गोंदूमामा म्हणाले, “ते मी कसं सांगूं! 
* माझ्या बहिणीला सैपाकीण ठेवतां का? असं मी कुणाला कं 

शड 


आम्हीं मुंबहेला आलो 


विचारू !--”' बोलत असतांना ते त्या लहानश्या खोलींत येरझारा 
घालीत होते. मर्धेच थांबून ते म्हणाले, “' ऐकलंस, तुला एक सांगून 
ठेवतो; तू खाणावळ काढ कीं सेपाकीण रद्ा; पण तूं माझी बद्दीण 
आहेस म्हणून कुणाला सांगूं नकोस, माझ्या गांवची एक बाई आली 
आहे, असंच मी शजाऱ्यापाजाऱ्यांनां सांगितले आहे. तूं बहीण म्हणून 
सांगितलंस तर माझी फजिती होईल. 

त्या वेळीं आईने जो चेहेरा केला तो अजून माझ्या डोळ्यांपुढे 
दिसता आहे. 

त्या दिवशी दुपारी, मला तशीच गोंदूमामांच्या खालीत ठेवून आई 
कुठं निघून गेली, गोंदूमामांची बायको पदोपर्दी माझ्या अंगावर वसवस 
करून ओरडत होती, केव्हां एकदां या जागेतून जाता. असं मला झालं 
होतं. मला वाटलं, बरी सुखार्ची गावी होतो, कशाला आह या 
मुंबद्ेत आली १ 

संध्याकाळी जी आई आली ती निघण्याच्याच तयारीनं आली. सारं 
सामानसुमान गोळा करून आम्ही तिथून निघालो नि गाडीत बतून 
युन्हां आमचा प्रवास सुरू झाला. रस्त्यांतेने गाडी जात असतांना 
जीं दृश्ये दिसत होती, त्यांचा माझ्या मनावर चमत्कारिक परिणाम हद्दोत 
होता. आज मुंबईचे मला फारसे वाटत नाही; पण त्यावेळी रस्त्यावरून 
ज्ञाणाऱ्यांयणाऱ्या लोकांचा ती धांदल, घोड्यांच्या आणि बिन घोड्यांच्या 
गाड्यांचा ती पळापळ, आपोआप चालणाऱ्या भल्यामोठ्या गाड्यांची ती 
खरघर, त्या सवोमुळं माझा जीव अगर्दी घाबराघधुवरा झाला होता. 
आम्ही कुठं जात आहोंत, याचा मला पत्ता नव्हता नि माझ्या नित्याच्या 
रितीप्रमाण मी आईला विचारलं पण नाही. आमची गाडी एका मोठ्या 
चचढावावरून चालायला सुरवात झाली. 

तैं स्व साभान सुमान घेऊन आम्ही एका मोठ्या घराशी उतरली, 

हें घर गोंदूमामा राहात होते तसं खाोल्याखोल्याचे नव्हते. आमच्या 

१५ 


बेणू वेलणकर 


गांवच्या घरांसारखं होतं, पण बरंच मोठं होतं, त्या घराला दरवाजेच 
दरवाजे आणि खिडक्याच खिडक्या होत्या. 

गाडी त्या घराच्या पुढच्या दारानं न जातां मागल्या बाजूला नेण्यांत 
आली होती, सामानसुमान बाहेर ठेवण्यांत आलं. बाहेर असलेल्या 
नळावर आम्ही हात पाय धुतले आणि घरांत आलो. आम्दी आलेल्या 
पहातांच एक बाई हसतमुखाने बाहेर आली. भिंतीवर टांगलेल्या चित्रांत 
जहा बाया असतात तकी ही बाई दिसत होती. तिला पहातांच मला 
तिच्याबद्दल आदर वाटूं लागला. 

मला पाहतांच ती म्हणाली, “ ही मुलगी का तुमची, बाई ? काय 
हिचे नांव ? ” आईने माझे नांव सांगतांच तीं पुढं म्हणाली, “ वेणू 
का ? नांव तर माठ गोड आहे; पण अलीकडे कुणी ही असली नांवं 
ठेवीत नाहींत. कमला, विमला, प्रामिला, असं कांही नाव ठेवायचं की 
मुलीला ! बरं झालं, एक मुलगी घरांत आली. मुलगी व्हावी असं मला 
वाटे, पण देवानं ते भाग्य कांही अजून मला लाभू दिलंनाद्दी. ही 
मुलगी आली--बरं झालं ! बरं का वेणू, आतां आई ही नव्हे, तुझी 
आह मी बरं का ! मला आई म्हणत जा” तिनं ओढून मला आपल्या 
जवळ घेतलं आणि माझ्या हनवटीखाली हात घालून माझं तोंड वर 
करून माझ्या चेहऱ्याकडे पाहात म्हणाली, “' मोठी गोड पोरगी 
आहे.--नाही तर ही आमर्ची मुलं !--बर का वेणू, आज पासून मी 
तुझी आई! ” 

माझा हात धरून ती ज्या वेळीं मला घरांत घेऊन जाऊं लागली त्या 
वेळी माझं हृदय भरून आले. 

मी मागं वळून पाहिलं, तो. आईच्या डोळ्यांतून आसवं टपटप 
गळत होतीं. 


१६ 


प्रकरण २३ 
सला आई मिळाली 


ज्या घरीं आम्हीं येऊन राहिलो होतो त॑ घर एका सुखवस्तू श्रीमंत 
ग्रहस्थाचं होतं. ते पूर्वी कोणच्याशा सरकारी खात्यांत ऑफिसर 
होते. आतां त्यांनीं पेनशन घेतलं होत. बाईसाहेब या त्यांचं दुसरं 
कुटुंब होतं. 

बाईंसाहेबांना तीन मुलगे होते. तिघेही शाळेत जाणारे होते. 

घरच्या व्यवस्थच्या बाबतीत साहेब फारसं पाहात नसत, किंबहुना 
जेवणाखेरीज ते घरांत येत सुद्धां नसत, त्यांच्या घर्री येणाऱ्या जाणा- 
ऱ्यांची बरीच रहदारी असे; पग तीं कोण माणसं येत आणि कां येत 
याची त्या वेळीं तरी मला कांहींच कल्पना नव्हती. 


पहिल्या दिवर्शी माझा पाट सर्वाच्या पंगतीबरोबर मांडला त्या वेळीं 
बाईसाहेबांचे वडील चिरंजीव बाळासाहेब यांनीं तक्रार केली. त्यांनी जे 
शब्द उच्चारले त्यांतली वक्रोक्ति जरी मला कळली नव्हती, तरी ते उच्चार- 
तांना त्यांनीं ज्या प्रकारचा आविभोव केला होता, त्याचंच मला 
वाईट वाटलं. 

साहेब कांही बोलले नाहींत पण बाईसाहेब म्हणाल्या, “' तुमच्या 
पंगतीला मी तिचा पाट ठेवला आहे आणि तिथंच ती बसणार. असर्ली 
कुजकीं नासकीं बोलणी मी मुळींच ऐकून घेणार नाही. 

रे १७ 


वेणू वेळणकर 


बाळासाहेब संतापल आणि वाढलेल्या ताटावरून उठून निघून गेले. 
॥टावर बसावं कीं नाहीं याचा मी विचार करीत होर्ते, तै पाहून बाई- 
॥हिब मोठ्या प्रेमळपणे म्हणाल्या, “' तू बस हृ वेणू या पाटावर. राज 
[थेच बसायचे बरे तूं, बाळ गेला त्याचं कांही वाईट वाटायला नको 
एव्हढं, त्याला भूक नाही आज---म्हणून गेला तो निघून, 

मी जवायला बसले खरी पण मला अन्न गोड लागेना. भूक नव्हती 
'हइणून बाळासाहेब गेले नाहीत, हे मला उघड उघड दिसत होतं. पण 
ाईसाहेबांचा हुकूम म्हणून मी मुकाट्याने जेवत होतं. 

अधी जेवर्णी झाल्यावर साहेब बाईसाहेबांना म्हणाले, “' असं पहा, 
हिला उद्यापासून तुझ्याच पंगतीला धेऊन जवायला बसत जाना ! ही 
धुल कांही ऐकायर्ची नाहींत. उगीच त्या पोरीला तरी संकोच कां 
'हणून ? मी पाहता आहे मघापासून, ती नीटशी कांही जवत नाई. 
आज हा एक जवणावरून उठून गेला. उद्यां तिघेही जातील, 

६ शेले तर गेले, ” बाईसाहेब म्हणाल्या. ““ माझ्या घरांत सारे कांही 
झाझ्या शिस्तीप्रमाणं झालं पाहिजे, मी तिला माझी मुलगी म्हटल आहि 
ने मी तिला माझ्या मुलीसारखीच वागवणार. 

६ मोठी गेमत आहे तुझी, ” साहेब म्हणाले. “ लोक मुलगा व्हावा 
म्हणून नवस करतात; आणि तुला हा सोस. 

बाईसाहेब थोड्याशा रागाने म्हणाल्या, “ज्याची आवड त्याच्याजवळ, 
मांशी आवड आहे ही अश्ली आहे. ज्याला कुणाला पटत नसेल त्यांनीं 
पडवून घेऊं नये. 

जवणं झाली नि आई चुलीजवळ काम करीत होती तिच्या 
दवाजारी मी जाऊन बसले, आई इथं कां आली, या लोकांचं आणि आपलं 
नातं काय, याची मला कांहींच कल्पना नव्हती. आईला विचारावं 
असं माझ्या मनांत येत हात, पण नित्याची संवय आड आली. षण 
जाई जेव्हां बोर्ली तेन्हां बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. 

शट 


मला आई मिळाली 


आजूबाजूला कुणी नाहीं असं पाहून आई मला म्हणाली, “' ऐकलेस 
वेणे, इथं आपण परक्याच्या घरांत आलो आहोत. तीं श्रीमंत माणसं 
आहेत, आपण गरीब माणसं आहोंत. मी इथं आलें ती त्यांची सैपाकीण 
म्हणून. बाईसाहेबांचा स्वभाव मोठा प्रेमळ आहे. त्यांचं मन तुझ्यावर बसलें 
आहि खरं, पण आपण आपल्या पायरीनं वागलं पाहिजे, हं ध्यानांत ठेव. 
त्यांनीं कितीही मोठेपणा दिला तरी तूं माझी मुलगी आहिस---बरं 
सेपाकणीची मुलगी आहेस !--बाळासाहिब म्हणाले ते कांही खोटं नार्ही . 
आम्हीं या घरांत नोकर माणसं आहोंत. खरं पाहिलं, तर नोकर मी 
आहे, तूं नाहींस, तूं इथली पाहुणी,--पण धर्माची, सत्तेची नव्हे. 


समजलं मी काय म्हणते ते ! तेव्हां बाईसाहेबांनी किती जरी म्हटले, 
तरी आपल्या पायरीनं वागत जा.” 


आईच्या भाषणाचा अथे मला चांगलासा कळला नाहीं. 
धघममीची माणसं म्हणजे काय नि सत्तेची माणसं म्हणजे काय 
यांतला भेद मला कळत नव्हता. नोकरी म्हणजे काय आणि नोकरांनी 
वागायचे कसं, याचीही मला कल्पना नव्हती. आम्ही गांवीं होती. 
आमचा खाणावळ होती. त्यावेळीं आमच्या घरीं गडी होता, तो 
आमचा नोकर, असं म्हणत असत. तर्शी गड्यासारखी का आम्ही १ 
खाणावळ म्हणजे काय, घर म्हणजे काय, नि सेपाकीण म्हणजे काय, 
हृही मला चांगलेसे कळत नव्हतं. पण या लोकांपेक्षा आपली पायरी 
कांही तरी निराळी आहे, ती वागतात तसं आपण, वागू नये, एव्हढं 
मात्र माझ्या ध्यार्नी आलं. 

मी आईला विचारलं, “ आई, सैपाकीण म्हणजे ग काय ;” 

पदरानं डोळे पुशीत आई म्हणाली, ““ आतां कसं सांगू तुला! ही 
बाग, हे घर आहे त्यांचं-- म्हणजे साहेबांचे आणि बाईाहेबांचे. 
बाईसाहेब श्रीमंत आहित. भ्रीमंत माणसं स्वतः सेपाक करीत नाहींत, 
म्हणून सैपाक करण्यासाठीं त्यांनीं मला नोकर ठेवले आहे. जेवायला 

१९ 


वेणू वेलणकर 


घालून मला पगार देणार आहेत. नि तूं माझी मुलगी म्हणून मोहोबती- 
खातर त्यांनीं तुझाही भार सहन करण्याचं कबूल केलं आहे. ” 

आईच्या त्या भाषणावरून मला जरी चांगली कल्पना आली नाहीं 
तरी होती त्यापेक्षां आपली स्थिति बदलली. एव्हढं मात्र मला चांगलंच 
जाणवले. इथं आपण स्वतंत्र नादी, दुसऱ्याची ताबेदार आहोत निते 


दुसरे सांगतील तसं आपल्याला वागलं पाहिजे, अशी अंधुक कल्पना त्या 
माझ्या बालबुद्धीला जाणवली. 


बाईसाहेबांचे तिन्ही मुलगे मला तुच्छतेनं लेखीत असत. वारेवार 
कांहीं ना कांहीं तरीं कामं सांगत. हें आण, तें आण, इं नेऊन ठेव ते 
नेऊन ठेव, असे सारखे हुकूम करीत नि मी मुकाद्यानं ते पाळीत असे. 
पण मला असं काम सांगितलेलं जेव्हां बाईसाहेबांच्या नजरेला येई, त्या" 
वेळीं त्या मुलांच्या अंगावर खेकसून आरडत असत, त्या म्हणत, “' का 
रे तिला कामं सांगता ? दुसरी नोकर माणसं नाहींत का घरांत ! 
चांगले दोन गडी आहेत, माळी आहे. गाडीवाला आहे. काय सांगा- 
यचे असेल ते गड्यांना सांगा; पण माझ्या वेणूला जर कामे सांगितलीत 
तर ती गोष्ट माझ्या कामावर पडायची नाहीं, 

बाईसाहेब जरी असं बोलत असत तरी बाळासाहेब आणि त्यांचे 
भाऊ कांही आपला हेका सोडीत नसत नि मीद्दी केव्हां त्यांचा आज्ञा- 
भंग करीत नसे. 

मला मुद्दाम त्रास द्यावा असाच त्यांचा उद्देश असे. केव्हां 
केव्हां जरुर नसतांना मला उगीचच काम सांगत, म्हणजे मी तक्रार 
करावी, बाईसाहेबांना सांगावं नि मग माझा पाणउतारा करावा, असा 
त्यांचा उद्देश असे. पण मी तक्षी संधि त्यांना कधींच दिली नाही. 

आईचा स्वभाव फार सोशीक म्हणून तीही, बाळासाहेबांनी तिला 
कितीही त्रास दिला तरी, कांहीं बोलत नसे. ती मुलंच मोठीं त्रात्य होती . 
आपसांत सुद्धां मारामाऱ्या करीत असत. साहेब कुणाचीच कधी चौकशी 

२० 


मला आई मिळाली 


करीत नसत. कुणी दंगा करो, कीं मारामारी करो, ते कुणाला कर्षी 
ओरडलेले किंवा रागावलेले मला ऐकूं आले नाहींत. बोलायच्या काय 
त्या बाईसाहेब, पण मुलं त्यांचीं मुळींच ख्िजगणती धरीत नसत. 

बाईसाहेबांना माझा लळा फार लागला होता. तिथे आल्यापासून 
त्यांनीं माझी सारीच राहाणी बदलून टाकली होती. खणाची परकर चोळी 
नेसून मी घरांत आले, पण आतां माझ्या अंगांत रेशमी चिटाचे झगे 
आले होते. बाईसाहेबांवरोबर जात असे त्यावेळीं पायांत बूट-स्टॉकेंग 
देखील घालीत असे, त्या पोषाखांत मला पाहिलं म्हणजे आईचे 
हृदय भरून येई. 

खरं पाहिलं, तर तिला तो तसला पोषाख आवडत नसे. खणाची 
परकर चोळी तीच आपल्या सत्तेची-तीच आपल्या भाग्याची-ती आज 
टाकली नि रेशमी झग्यांची सवय लागली तर पुढं पुन्हां खणाच्या परकर 
चोळीवर येणे मला कठीण जाईल, असं ती म्हणे, 

पण पुन्हां खणाची परकर चोळी कां येईल, याची मला कांहींच 
कल्पना नव्हती. मी इथे आले ती कायमची आलें, अशीच माझी ठाम 
समजूत झाली होती. तिथून आम्ही जाऊं, असं मानायला कांहींच कारण 
नव्हते. मला वाटे, आईला है उगीच भय वाटतं. बाईसाहेबांची माझ्यावर 
एव्हृढी माया --त्या मला कशा घालवून देतील ! 

पण आई म्हणे, “' केव्हां काय होईल ह कुणी सांगावे ! गांवची 
स्वाणावळ बंद पडेल असं का मला पहिल्यांदा वाटलं दह्ोतं १ पण ती 
बंद करून इथे यावं लागलंच ना मला ! सैंपाकणीची नोकरी का होइंना 
पण ती चटकन्‌ मिळणं थोडंच सोपं असतं. ही अगर्दी सहजास्हर्जी 
मिळाली-एवढासुद्धां प्रयत्न न करतां मिळाली-म्हणूनच मला भीति 
वाटते. म्हणून म्हणते, आपली मूळची स्थिति विसरू नकोस. हे पर- 
क्याचे वैभव, चार दिवसाचे सोपस्कार, आज आहेत नि उद्यां नाहींत, 
म्हणून आपली जुनी आठवण ठेवून वागत जा म्हणजे झाले. 

२१ 


वेणू वेलणकर 


एकंदरीत आमचे दिवस मोठे आनंदांत जात होते. माझ्यासार्ठी 
मुद्दाम बाईसाहेबांनीं घरी शिकवायला मास्तर ठेवला होता. शाळेतही 
मी जात असं, साहेब जरी फारशी माझी चौकशी करीत नसत तरी 
त्यांना मी आवडत नर्स असं नाही. माझ्या शाळेतल्या अभ्यासाची 
मधून मधून ते चौकशी करीत असत. दारांत वेण्या विकायला आल्या 
तर आपण होऊन माझ्यासाठी विकत घेऊन देत. केव्हां केव्हां आपल्या 
बरोबर गाडींतून फिरायलाही नेत. पण बाईसाहेबांप्रमाणे त्यांनीं मला 
कधींही जवळ घेतलं नाहीं, कुरवाळलं नाही, की माझं कोडकोतुक 
केलं नाहीं. 


माझ्या मनाला तै जाणवत असे. साहेबांच्या मनांत माझ्याबद्दल थोडा 
ना थोडा तरी दुजाभाव आहे, याची जाणीव मला होत असे. 
मुलं तो दुजाभाव स्पष्ट करून दाखवीत पण ते दाखवीत नसत, इत- 
कंच नव्हे, तर बाईसाहेबांना बरे वाटावं म्हणून ते माझं कोडकौतुक 
करीत असल्याचं ढोंग करतात, असं मला वाटे, त्या कोडकोतुकांत 
त्यांचं अंतःकरण नव्हतं, हें मला त्यांच्या एकंदर चालचर्येवरून सम- 
जून येत असे. 


बाईसाहेबांची मात्र माझ्यावर फार माया असे. मी त्यांची मुलगी नव्हे 
असं कुणाला सांगून सुद्धां खरं वाटलं नसतं, इतक्या आपुलकीनं त्या 
मला वागवीत असत. मी जवळ जबळ आईची ओळख विसरून गेलें 
होतें असं म्हटलं तरी चालेल. आईची गांठ पडायची काय ती झोपा- 
य॒च्या वेळेला, त्यावेळीं तीही काम करून थकलेली, म्हणून मला 
नुसती जवळ घेऊन झोपी जात असे, कधीं ती माझ्याशी चार शब्द 
बोलली नाही. 


बाईसाहेबांबरोबर मात्र माझी सारखी टकळी सुरू असे. मी ज॑ 
जै कांहीं विचारी, त॑तं मला त्या समजावून सांगत. मी मुंबद्दत 
.$. 


मला आह मिळाळी 


आले त्यावेळीं अगदींच गांवढळ होते, पण थोडक्याच काळांत एक 
पक्की मुंबईकर बनलें, इतकी बाईसाहेबांची शिकवणूक माझ्या कामीं पडली. 


मुलांनी मात्र माझ्याशी उभा दावा धरला होता. कांही झालं तरी 
मला ते आपल्या तोलानं वागवीत नसत. विशेषतः बाळासाहेबांचा कांही 
कारण नसतां माझ्यावर भारीच राग अस. कांहीं ना कांही तरी कुरा- 
पती काढून मला त्रास द्यायचा हा त्यांचा नित्यक्रमच होता. त्यांनी 
माझ्याबद्दल असा राग कां धरावा, याची कल्पना त्या बालवयांत मला 
होत नसे. त्या घरूया एकंद्र व्यवहारांत मी इतकी रुळून गेलें शेर्ते, 
कीं है घर आपलं नव्हे, थं आपण परकी आहोत, याबद्दलची माझी 
आठवण सफाई बुजून गेली होती. 

आगि भ्हृणूनच मला बाळासाहेबांचा राग येत असे. मी त्यांना कर्धी 
उलटून बोलले नाहीं कीं कर्धी त्यांची अवज्ञाही केली नाहीं, असं 
असतां त्यांनीं मला त्रास कां द्यावा हेंच मला कळत नसे. 

बाळासाहेबांचे दुसरे दोघे भाऊ वयाने लहान होते, तरीह्दी ते माझ्या- 
पेक्षां वयानं मोठे होते. ते मला तितकासा त्रास देत नसत, पण बाळा: 
साहेबांची वागणूक कांही मुलखावेगळीच होती. बाईसाहेब समोर 
नसल्या म्हणजे कांहीं तरी कुरापत काढून मला मारायलादिखील ते कमी 
करीत नसत. पण त्याबद्दल मी बाईसाहेबांकडे कधींच चुगली केली नाहीं. 

मी चुगली करीत नाही म्हणूनच बाळासाहेबांचा माझ्यावर जास्त 
राग असे. एक दिवस ते अगदीं उघड उघड म्हणाले, “' आईच्या 
नकळत मी हिला इतका त्रास देतो, मारतो दिखील ! तरीही ही कार्टी 
आईला कांहीं कळवीत नाही. अगर्दी निगरगट्ट आहे. मारल्याचासुद्धां 
परिणाम होत नाई तिच्यावर ! 

ते त्यांचे उद्गार ऐकून मला आत्माविश्वास उत्पन्न झाला आणि 
म्हणूनच त्रास होत असतांही मी मुकाट्याने सहन करीत होते. 

२३ 


वेणू घेलणरर 


त्या भावंडांचा जरी मला त्रास होत होता तरी आमच दिवस 
सुखानं जात होते. कांही कसलीच वाण पडत नव्हती. 

पण आई म्हणाली ते कांहीं खोटं नाहीं. सारेच दिवस सुखाचे जात 
नसतात, हेंच खरं. त्या वेळेपर्यंत भाग्यादुभौग्याची जरी मला ओळख 
नव्हती तरी ज्यावेळीं बाईसाहेब आजारी पडल्या त्यांवेळीं आईच्या 
म्हणण्याची प्रचीती मला पटूं लागली. 

बाईंसाहेबांच्या आजारीपणांत मी एक प्रकारे पोरकी झाले. मला त्रास 
देण्याच्या कामी बाळासाहेबांना तितकाच चेव आला, आणि त्यांच्या 
अनुकरणानं इतर नोकरचाकर माणसंही मला डिवचूं लागर्ली. साऱ्या 
सुखावर विरजण पडल्यासारखं झालं. बाईसाहेबांची प्रकती दिवसेदिवस 
जास्त जास्त बिघडत चालली आणि एके दिवशी त्यांनी इद्दलोकची 
यात्रा संपवली. 

अशा रितीने मी अगदी सववस्वी पोरकी झालें. 


र्ड 


प्रकरण ४ 
नवी खाणावळ उघडली 


माणसं मरतात असं मी ऐकलं होत, पण मरण म्हणज काय, याची 
मला कल्पना नव्हती. माझ्या वडिलांच्या मृत्यूची मला मुळींच 
आठवण नव्हती त्यामुळं, बाईसाहेबांच्या मृत्यूने मला केव्हढा तरी 
धक्का बसला, 

वर्षमर आम्हीं त्यांच्या घरी राहिलो होतो. त्या वर्षाच्या मुदतीत 
बाईसाहेबांनीं मळा मुलीसारखं वागवलं हाते. 

त्यांच्या आजारीपणांत सदोदित मौ त्यांच्याजवळ असे. रार्ञजी झापा- 
यला सुद्धां आईजवळ जात नसे. एक क्षणभर देखील त्या मला आपल्या 
नजरेसमोरून दूर करीत नसत. 

मला आश्चर्य वाटे ते हेंच, कीं नातं नाही, गोतं नाही, ओळखसुद्धां 
अगदी नवी, असं असतांना या परक्या बाईनं माझ्यावर एवढे प्रेम कां 
करावं ? त्यांच्या आजारीपणांत मला त्यांची ती ओढ फार जाणवत असे. 

अगदीं त्यांच्या शेवटच्या घटकेपर्येत मी जवळ होते. प्राण सोड- 
तांना माझा हात त्यांच्या हातांत होता तो नंतर सोडवून घ्यावा लागला. 
मरणकालच्या यातनांची स्थिति प्रत्यक्ष पाहिल्यामुळे माझ्या मनावर 
जबरदस्त आघात झाला. 


मरणापूर्वी कांही वेळ त्यांची वाचा गेली होती. नुसत्या खुणेनं त्या 
मला बोलावीत असत. 


२५ 


वेणू वेलणकर 


कांहीतरी चमत्कारिक होणार, असं मला वाटलं --पण तै चमत्कारिक 
होणं म्हणज मृत्यू, है मला माहीत नव्हतं. 

त्यांचा प्राण निघून जातांच घरांत सर्वत्र हलकलोाळ झाला. नोकर 
चाकर माणसंही रड्डू लागलीं, कां रडतं आहे, हें कळत नसूनसुद्धां मीही 
हुंदके दे-देऊन रडत होते. . 

त्यांचे प्रेत ज्यावेळीं उचळून नेलं त्यावेळीं आईनं मला उचलून दूर 
नेलं-नि नंतर बाकीचे विधी झाले असं मला मागाहून कळलं. 

मृत्यू म्हणजे काय ! प्रेते म्हणजे काय ! त्याची उत्तरक्रिया म्हणज 
काय ! वगेरे प्रश्न मी ज्यावेळीं आईला विचारले त्यावेळीं ती धड 
बोलेना देखील. पण दुसऱ्या दिवशीं तिनं बरंचसं समजावून सांगितले. 
मेलेल्या माणसाला जाळून टाकतात, त्याचा मागमूस सुद्धां राहात नाहीं, 
है ऐकून मला मोठं चमत्कारिक वाटलं. आतां बाईसाहेबांची पुन्हां 
गांठ होणं नाहीं या कल्पनेनं मी भांबावून गेले होते. मला त्यांचा 
केव्हढा तरी मोठा आधार वाटत होता. त्यांच्या मृत्यूच्या दुःखापेक्षां, 
माझं पुढं कसं होणार याच भीतीनं मी अगर्दी घाबरून गेलें होते. 
बाळासाहेब माझा आतां छळ करतील, त्यावेळीं त्यांना दटावणार कुणींच 
नाही -_- साहेबांची वृत्ती मला माहीत होती-त्यामुळे मला आभाळ 
कोसळल्यासारखं वाटूं लागले, 

आई म्हणाली, ““ पाहिलेस. मी म्हणत होते त है ! याला म्हणतात 
भाग्य, चांगल सुखाचे स्थान मिळालं होतं पण तिथं देखील इश्वर 
समाधानानं राहूं देत नाही. आतां इथ किती दिवस निभावतील हॅ 
कांहीं मला सांगतां येत नाहीं. ” 

मला देखील तसंच वाटलं. भाग्य भाग्य म्हणून जे कांही म्हणतात 
त्याची त्यावेळीं मला कल्पना आली. 

दोन तीन आठवडे घरांत जिकडे तिकडे झुकझुकाट होता. कसेबसे 
रोजचे व्यवहार चालले होते. कुणींच कुणार्शी फारसं बोलत नव्हतं. 

२ 


नवी खाणावळ उघडठी 


साहेब अगर्दी सुन्न झाल्यासारखे झाल होते. मुलगे दिखील फारशी गड- 


बड करीत नव्हते. पण महिना होत आला तसतसा तो काळ नाहींसा 
होऊं लागला, नि बाळासाहेब आपला स्वभाव प्रकट करूं लागले. 

एके दिवर्शी जवायला बसलेल असतांच बाळासाहेब म्हणाले, “ ही 
कारटीच मुळीं पायगुणी आहे. मी आईला त्याचवेळी सांगत होता, की 
असल्या दळभद्र्था कारटीला तूं आपली म्हणू नकास, हिच्या पाय- 
गुणानेच आज आमची आई गमावली. ” 

साहेब कांही बालल नाहींत पण माझ्या मनावर त्या भाषणाचा पारि- 
णाम झाला. दुसरा घास माझ्या तोंडी जाईना म्हणून तशीच उठळे. 
साहेबांच्या ते ध्यानी आल असावे असं वाटतं, कारण थोड्या वेळाने 
तेही अरध्यांच जेवणावरून उठले. मागीलदारच्या नळाजवळ मी 
हुंदके टाकून रडत होते तिथं येऊन ते मला म्हणाले, “' उगी, उगी, 
पोरी, रडूं नकोस, झाल्या गेल्या गोष्टी कांही फिरून येत नाहींत. बाळा- 
साहेबांचं बोलणं कांही मनावर घेऊं नकोस, ” 

त्यांच्या बोलण्यानं मला समाधान वाटलं नाहीं, कारण ते त्यांचे भाषण 
अगर्दी रुक्ष होतं. त्यांत मायेचा ओलावा यत्किंचितही नव्हता. 

माझा सारा उत्साह नाहींसा झाला. बाईसाहेबांनीं दिलेल कपडे 
टाकून द्यावे आणि पुन्हा आपला जुना खणाचा चोळी परकर नेसावा 
असं पुन्हा पुन्हा माझ्या मनांत येई. पूर्वीच्या व्यवस्थेत कांही फरक 
झाला नव्हता. मी शाळेत जात होते, मास्तर शिकवायला घर्री येत 
होते. पण फिरायला जाणे मात्र बंद झालं होतं. साहेब रोज फिरायला 
जात असत पण त्यांनीं जातांना केव्हांही मला हांक मारली नाहीं नि 
मीही त्यांच्या बरोबर जाण्याची इच्छा कधी दर्शविली नाहीं. 

असेच आणखी कांही दिवस गेले. मला असं दिसून आले, कीं आई 
दुपारच्या वेळीं कुठं तरी बाहेर जाते. ती कुठं जात असे त॑ मला कांडी 
सांगून जात नसे. नि मला सांगणार तरी काय ! तिने कांही सांगितलं 
तरी ते कळण्याची पात्रता माझ्या अंगीं होती कुठं ! 

२७ 


वेणू वेळणकर 


एके दिवशीं रात्रीं मी माझ्या आईच्या कुशीला झोपी गेलें होतें. मी 
दचकून जागी झालें. कांहीतरी आवाज झाल्यासारखा वाटला म्हणून 
मी आजूत्राजूला पाहिलं, तो. आई बिछान्यावर नव्ह्ती. एक क्षणभरानं 
येऊन ती बिछान्यावर पुन्हां झोपी गेली, काय झालं म्हणून विचारावं 
असं माझ्या मनांत आलं होतं; पण विचारण्याचा धीर मला झाला नाहीं. 
आवाज झाला तो कुणीतरी कुणाला तरी मारलं असावं, रपाटा लगावला 
असावा, अशा प्रकारचा झाला. माझ्यापरीनं मी कल्पना करून पाहात 
होत; पण मला उलगडा होईना, दुसऱ्या दिवर्शी सकाळीं मी जागी 
झालें तो सामानसुमान बांधून जाण्याची तयारी झाली होती. 

ती मला 'चल' म्हणून म्हणाली नि आम्ही जायला निघालो. एक गाडी 
आणली होती. तींत, आमचे बरेच दिवस बाहेर लोळत पडलेलं सामान 
भरलं होतं. मी बाहेर आलें नि गाडींत बसलें, गडी माणसांनी विचारलं 
पण साहेब किंवा त्यांची मुलं यांनी कुणीच कांही चौकशी केली नाहीं. 
कदाचित्‌ मी जागी होण्याच्या पूर्वीच त्यांचं कांहीं बोलणं झालं असलं 
तर त॑ मला कळलं नाहीं. 

आम्ही तिथून निघाली त्यावेळीं मला कळलं, कीं आम्ही मलबार 
हिलवर राहात होतो आणि आतां गिरगावांत जात होतो. 

गिरगांबांत आम्हाला राहण्यासाठी एक स्वतंत्र जागा घेतलेली 
होती. मी पाहिलं तां ती जागा बरीच मोठी होती. इनमिन दोन माणसं 
आम्ही राहृणार आणि एव्हृढी मोठी जागा कशाला घेतली हैं मला कळेना. 

आमचं बिऱ्हाड थाटलं गेल, शाळेत जाणं बंद झाल्यामुळे मला 
चुकल्या चुकल्यासारखं वाटत असे. मधून मधून बाईसाहेबांची आठवण 
होऊन रडूं येत असे, पण मला रडूं येतं ह मी आईला दिसू दिलं नाही. 

आई दररोज दुपारी कुठं तरी जात असे आणि रोज कांही ना कांही 
सामान घेऊन येत असे, मोठीं मोठीं भांडीं, पाट, ताटे, वाव्या आण- 
थ्याचा तिर्ने सारवा तडाखा लावला होता. माझ्यापरीनं मी कल्पना 

२८ 


नवी खाणावळ उघडली 


चालवून पाहिली, त्यावेळीं मला वाटले, कीं खाणावळ काढायचा 
आईचा बेत असावा. आई कांही सांगत नाहीं म्हणून मीही विचारलं 
नाहीं. पण एके दिवशीं जेव्हां दारावर “ ब्राह्मणाची खाणावळ * म्हणून 
पाटी लावली गेली. त्यावेळी साऱ्या गोष्टींचा आपोआप उलगडा झाला. 

सुरवाती-सुरवातीला आई स्वतः जवण करीत असे, पण पुढं दोन 
आचारी ठेवण्यांत आले. वाढायचे काम आई आणखी आचारी मिळू- 
नच करीत असत. पण हळूइळू माणसं वाढू लागलीं आणि आचारी 
आणि वाढपी यांचीही संख्या वाढूं लागली. 

याच सुमाराला मी पुन्हां शाळेंत जाऊं लागलं होते, पण ही शाळा: 
माझ्या पूर्वीच्या शाळेच्या मानानं मला अगर्दी दरिद्री वाटे. मी पूर्वी 
ज्या शाळेंत जात असं तिथली मुलंही चांगल्या श्रीमंतांची असत. पण 
या शाळेंतर्ली मुलं अगदीं माझ्यासारखीच होतीं, म्हणज अगदींच दरिद्री 
होती असं नाहीं; पण पूर्वी ज्या प्रकारचीं मुलं मी पाहात होते त्यापेक्षां 
हीं मुलं कमी दर्जाची आहेत असं वाटे. त्यांच्या चालचलणुकींतही 
कांही तरी फरक होता. 

मास्तर देखील तसेच होते. पोषाखापासूनह्दी पूर्वीच्या मास्तरांत 
आणि यांच्यांत फरक होता---शिकवण्याच्या बाबतीतही फरक होता. 
पूर्वीचे मास्तर मुलांना वागवतांना अदत्रीने वागवीत असत. पण हे 
मास्तर, बाळासाहेब जसे पदोपर्दी निष्कारण माझ्यावर ओरडत असत, 
तसेच साऱ्या मुलांवर हुकमत चालवीत असत, आमचा जीव नकोसा 
करून टाकीत असत. 

त्या शाळेचा मला तिटकारा आला. त्याला आणखीही कारणं होती. 
बाईसाहेबांनीं दिलेले कपडे मी अजून टाकले नव्हते नि मी ज्या 
प्रकारचे कपडे घालीत होते त्या प्रकारचे कपडे घालणारी मुलं त्या 
शाळेत कवितच होती--किंबहुना नव्ह्ती म्हटलं तरी चालेल, सारी. 
मुलं पोषाखावरून माझी थट्टा करीत असत. 

२९ 


यैणू वेलणकर 


आमचे एक मास्तर आमच्या खाणावळींत जेवायला येत असत. 
त्यांनीं ही हकीकत ज्यावेळीं आईला सांगितली त्यावेळीं माझा पोषाख 
पू्वस्थितीवर न्यावा असं आईला वाटलं. पण रेशमी झग्यांची मला 
इतकी संवय झाली होती, की मी ज्यावेळीं पूर्वीप्रमाणे खणाची परकर- 
चोळी घालायचा प्रयत्न करूं लागलें त्यांवेळी ती अंगावर घालणं देखील 
मला दुःसद्द झालं. 

आईलाही वाटलं, कशाला पोषाखांत बदल करा ? ती म्हणाली, 
६६ देवाच्या दयेने चार पैसे मिळत आहेत. बाईंसाहबांनी जी संवय 
लावली आहि ती चाढू ठेवण्याची अनुकूलता असतां पोरीला उगीच 
दळिद्रांत कशाला वागवू ? ” 

मला आनंद झाला. खणाच्या चोळी परकरावर जाणं मला मनापा" 
सून पसंत नव्हतं. या शाळेत इतर मुलींपेक्षा मी खुलून दिसत होते. 
मी शाळेत येऊं लागलें म्हणजे सारे मुलगे, मुली माझ्याकडे टक लावून 
पाहात असत. कुणाच्या पायांत चपला असत तर कुणी अनवाणींच 
येत असत--पण मी बूट खडखड वाजबीत येऊं लागलें म्हणजे माझा 
मळाच एक प्रकारचा अभिमान वाटे. 

पोषाखानं दिखील मला मोठेपणा आला होता. खाणाबळबाईची 
मुलगी म्हणून बाकीची मुलं जरी माजी थट्टा करीत तरी मास्तरांची 
माझ्याशी असलेली वागणूक इतर मुलांपेक्षा निराळ्या प्रकारची अस. 
एक दिवस मास्तरांनी अगदीं भर वगोत सांगितलं. ते म्हणाले, “'मुलांना , 
स््षाणावळबाईची मुलगी म्हणून या मुलीची तुम्ही चेश करतां हें चांगलं 
नाही, कुणाचं भाग्य कसं उज्वल होत असतं इं सांगून सांगतां येत 
नाही, खाणावळ म्हणजे कांही कमी नव्हे. एव्हढा मोठा कोट्याधीश 
टाटा, त्याने अपोलो बंदरावर एक मोठी खाणावळ घातली आईहे-- 
तिळा ताजमहाल हॉटेल असं म्हणतात. हॉटेल म्हटलं म्हणजे ते 
आपल्याला मोठं वाटतं, पण ती खाणावळच आहे. कुणी सांगावं, उद्यां 

३० 


नवी खाणावळ उघडली 


ही पुलगी 'टाटाच्या खाणावळी' सारखी प्रचंड खाणावळ या गिरगांवांत 
उभी करणार नाही म्हणून ? म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अभ्यास 
करणारीं मुलं देखील मोठ्या नांवलेकिकाला चढली आहित-- 
हायकोटांचे जज्जसुद्धां झाली आहेत---”' 

मास्तरांच्या या बोलण्याचा सुपरिणाम व्हायच्या ऐवर्जी उलट दु्ष्परि- 
शामच झाला. मुलं मला * वेणू टाटा ? म्हणूं लागली आणि आमच्या 
दारावरून जातांना “ ही पाहा टाटाची खाणावळ म्हणून आमच्या 
दारांतील पाटीकडे बोट करून मला वांकुल्या दाखवू लागलीं. 

थट्टेने माणसाला राग येतो खरा. पण कांडी कांही थट्टा अश्या अस- 
तात, कीं त्यामुळे राग येण्याऐवजी अभिमानच वाटतो. टाटाच्या 
हॉटेलची जी कल्पना मास्तरनी सांगितली ती माझ्या डोक्यांत भिनली 
होती. पुढल्या काळांत आपण आईचा हाच धेदा पुढे चालवायचा 
आणि टाटाच्या हेटिलसारखं मोठं हुटेल काढून, आज थट्टा करणाऱ्या 
साऱ्या मुलांना तिथं फुकट जऊं घालायचं, असा मी मनार्शी निश्चय केला. 

ही शाळेंतली हकीकत मास्तरांनी आईला सांगितली, त्यावेळीं आईला 
आनंद झाला. मास्तर एवढ्या कळकळीने आपल्या मुलीची काळजी 
धेतात हई पाहिल्यामुळे तीही त्यांच्याबद्दल आदर बाळगू लागली. इतर 
क्षवणारांपेक्षां मास्तरांची काळजी जास्त घेतली जाऊं लागली. 

मास्तरांनाही तेंच हवे होतं, नि तेवद्यासा्ठींच त्यांनीं बुद्धिपुरस्सर 
ही हकीकत माझ्या आईला सांगितली होती. 

जसजसा आमच्या खाणावळीचा पसारा वाढत होता तसतसा 
आईच्या स्वभावांतही पालट होत चालला होता. पूर्वी ती एक शब्द- 
खुद्धां बोलत नसे. तीन वेळां प्रश्न करावा तर एकदां उत्तर देत असे. 
त्तीच माझी आई आतां तासचे तास एकेका माणसाबरोबर हुजत घालीत 
असलेली पाहून मला आश्चर्य वाटे. आईच्या स्वभावांत पायरीपायरीनं होत 


असलेला फरक व्हायचे कारण काय, याचा मी आपल्या मनाशी विचार 
करू लागलें, 


११ 


वेणू वेलणकर 


साहेबांच्या घरीं आम्ही होता. त्यावेळीं पुरुष मंडळींच्या बाजूला- 
सुद्धां ती फिरकत नसे--वाढण्याकरितां काय बाहेर यईल तेव्हढीच--- 
तीच माझी आई आतां चांगल्या मोठमोठ्या माणसांबरोबर जगाच्या 
व्यवहाराच्या गोष्टी ज्या वेळीं बोलूं लागे त्यावेळीं ऐकणारे जितके थक्क 
होऊन जात त्यापेक्षां माझ्या मनावर जास्त परिणाम होत असे. 

तो चळवळीचा काल होता. वर्तमानपत्रांतल्या होमरूलच्या चळव- 
ळीच्या हकीकती पंगतीवर राज सारख्या सुरू असत. कुणी काय केल, 
कुठं कोणतं व्याख्यान झालं, आज वर्तमानपत्रांत काय आलं आहे, 


या सर्वांचा पाढा वाचण्यास प्रत्येक जवणकऱ्याला खाणावळ ही एकच 
आवडती जागा असे. 


पंगतीवर निरनिराळ्या पक्षांच्या मंडळींची जी आपसांत भाडणं 
होत तीं मी लक्षपूर्वक ऐकत असें. त्या लोकांचे निरनिराळे गट 
होते. कुणी जहाल होते, कुणी मवाळ होते--नि दोघांची थट्टा 
करणारा जो एक तिसरा वर्ग होता त्याला हे जहाळ आणि मवाळ 
६ टवाळ? अशी संज्ञा देत असत. जहालांची आण मवाळांची चर्चा 
प्रसंगाला इतकी हात घाईवर येत असे, कीं जवणं अधी टावून ते 
आतां मारामारी करतील की काय, असं दिखील पाहाणाराला वाटूं 
लागे. इतक्या कळकळीनं ही चर्चा चाळू लागली म्हणजे मला असा 
प्रश्न पडे, कीं ही मंडळी इथं जवायला येतात, कीं भांडणं करा- 
यला येतात ? 

वस्तुस्थिति जरी अशी होती तरी त्या चर्चत माझं मन रमत असे. 
त्यांच्या भाषणांचा विषय हळूइळू मला कळूं लागला नि त्यामुळं 
वर्तमानपत्रे वाचण्याची मला चटक लागली. माझं तं वय वर्तमानपत्रे 
वाचून समजण्याइतकं नव्हतं. पण वर्तमानपत्रांतल्या विषयांची जी चर्चा 
इतक्या प्रशस्तपणानं ऐकूं येत असे तीमुळं बर्तमानपत्रांतला विषय मला 
सहज आकलन करण्याला कठीण जात नसे. दुसऱ्यांच्या चर्चेच्या अनु- 

२२ 


नवी खाणावळ उघडली 


रोधाने जरी मी वर्तमानपत्रांकडे पाहात अर्से, तरीद्दी हळूहळू मला 
स्वतंत्र विचार करण्याची संवय होऊं लागली. त्याचा परिणाम असा 
झाला, कीं पंगतीवर होणाऱ्या चर्चा सुरू झाल्या म्हणजे मीही त्यांत 
तोंड घालूं लागले. 

पाहिल्या पहिल्याने ती मंडळी माझ्याकडे दुर्लक्ष करीत असत. पण 
हळूहळू थट्टा करतां करतां असं होऊं लागलं, कीं माझ्याही प्रश्नांना 
त्यांच्या चर्चेतून उत्तरं मिळू लागलीं. या प्रकारामुळे माझा आत्मविश्वास 
बळावत चालला नि मी अशा चचांतून प्रामुख्याने भाग धेऊं लागलें. 

मला आश्चर्य वाटे ते हेंच, कीं आईसुद्धा या चर्चोतून सहज कानांवर 
पडतील ते शब्द पकडून मधे तोंड घालीत असे. त्यांत तिचं विशेष 
लक्ष अस असं नाही. परंतु जवायला येणाऱ्या मंडळींत आपुलकी 
उत्पन्न होण्यासाठीं त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टीत ती भाग घेत असे, 
असं ती मला सांगे. 

हळूहळू आमच्या खाणावळीची इतकी प्रगति होऊं लागली, की 
आमच्या खाणावळींत येणं हा एक प्रकारचा मान समजला जाऊं लागला, 


प्रकरण “ 
मी मालकीण होले 


अक्षा रितीने बराच काळ गेला. सांपत्तिक दृष्ट्या आमची स्थिति 
न्वांगलीच सुधारली होती. आम्ही श्रीमंतांत मोडे लागला होतो. दारिद्याची 
आठवण देखील आतां उरली नव्हती. 

बाईसाहेबांनीं ज्या प्रकारची शिस्त मला लावली होती, ती शिस्त न 
मोडतां माझं पुढलं आयुष्य त्या एकाच चाकोरीतून चालू राहिलं होतं. 

हृ्ली मी ज्या शाळेंत जात होते त्या शाळेत महाराष्ट्रीय मंडळी फारच 
थोडी असत. जी कांही होती ती आमच्यापेक्षा श्रीमंतीच्या दृष्टीने वरच्या 
दजीची होती. त्या मुलांना पोचवण्यासाठी मोटारी येत असत. मला 


डणीव वाटे ती हीच, कीं आपल्याला पोचवायला दिखील मोटार 
आली पाहिजे. 


ती उणीव भरून येणं अशक्य नव्हतं, पण मोटार ध्यायची कशा- 
साठीं ? मी शाळेत जाण्यापलिकडे मोटारीचा दुसरा कोणताही उपयोग 
नव्हता. म्हणून इच्छा असतां आणि अनुकूलता असतांही, आईनं 
केवळ माझ्यासाठी म्हणून मोटार घेण्याचे टाळलं, 

एक दिवस आमच्या गांवचे नाझर अचानक येऊन दाखल झाले. 
ने आतां नोकरीवर नव्हते, त्यांनीं पेनशन्‌ घेतलं होतं. हायकाटात 
कांही काम असल्यामुळे ते मुद्दाम मुंबईला आले होते. आईच्या खाणा- 
बळीची हकीकत गांबापर्यंत जाऊन पोचली होती. अर्थातच ते उतर- 

३्ड 


मी मालकीण होत 


ण्यासाठी आमच्याकडे आले होते. आमच्या खाणावळींत उतरण्याची 
व्यवस्था नव्हती---तरी जुन्या ओळखीला अनुसरून आईनं मुद्दाम 
त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून दिली होती. 

मला पाद्दतांच ते म्हणाले, “' वेणे, कारटे, बरीच मोठी झालीस 
कीं! आणि अगर्दी मडुम बनलीस ! कोकणांत गेलीस तर तुला किरिस्ता- 
नाची मुलगी म्हणतील. आपण ब्राह्मण लोक आहोत. हें असले कांडी 
बरं नाही. आतां या तुमच्या मुंबईत सारं कांही चालतं म्हणा---पण 
आमच्या डोळ्यांना कांही है चांगलं दिसत नाहीं, 

आई म्हणाली, “' देश तसा वेश आणि गुरु तसा उपदेश. मी 
खाणावळवाली म्हणून लोक मला कमी लेखतात, पेसा असला तरी चार 
मंडळींत माझा दर्जा कमी समजला जातो, आम्हां लोकांचं है असं आहे. 
नोकरीला मान आहे तो धंद्याला नाहीं. त्यांतून मी बायको माणूस, स्वतंत्र 
रितीनं धंदा करते, खाणावळीचा धंदा करते, म्हणून कुटुंबांतली चार 
माणसं मला बोलावीत सुद्धां नाहींत. माझ्यावर एक प्रकारचा बहिष्कारच 
या लोकांनीं टाकला आहे म्हणाना ! तेव्हां आपली माणसं आपल्याला 
ओळखत नाहींत मग त्यांची भीड तरी कशाला धरायची ! मुलीला जर 
दजी आला तर उद्यां ती आपले बस्तान चांगल बसवील. ज्या 
इंजिनियरसाहेबांकडे मी सैपाकीण होर्ते त्यांचीं मुलं ज्या शाळेत जात 
असत, तसल्याच शाळेंत हिला घातली. तुर्म्ही ऐकलं नाहीं ! फाडफाड 
इंग्रजी बोलते ! दाखवा बरं तुमच्या कोकणर्ची असलीं माणसं ! चार 
बुकं कांही पुरती येत नाहींत. त्या शाळेतल्या मास्तरांना आणून उभं करा 
आमच्या वेणू समोर आणि मग ऐका ती कसं काय बोलते ती --” 

तोंड फाटेपर्यंत आई माझी स्तुती करीत होती. आईने केलेली माझी 
ही स्तुती मी पहिल्यानंच ऐकली. गांवचे ग्रइस्थ आले आहेत म्हणून 
ती त्यांच्याकडे आपला बडेजाव मिरवीत होती. एव्हढं खरं, की त्य 
स्तुतीनं मी फुगून गेलें. मला वाटलं, कीं त्या खेडवळ माणसांपेक्षा 

२५ 


थैणू घेळणकर 


मी कुणीतरी चांगलीच मोठी आहे. त्या खेडवळ माणसांच्या आठवणी 
सुसट पुसट झाल्या होत्या, स्वझासारखी एक अंधुक अंधुक कल्पना 
नजरेसमोर येत असे, पण त्यानं गांवची माणसं कोणत्या प्रकार्र्ची 
आहित याचे स्पष्ट चित्र मला काढतां आले नसतं. 


आमची सुस्थिती पाहून नाझरांना फार आनेद झाला, मनाला वाटेल 
तं स्पष्ट बोलून दाखवण्याची त्यांची वृत्ती होती, ते म्हणाले, '“' असं 
पाहा सत्यभामाबाई, आजचा काळ असा आहे, चार पैसे ज्याच्याजवळ 
असतील ती माणसं या जगांत मोठीं ठरतात. तुम्ही धंदा खाणावळीचा 
करतां कीं चांभाराचा करतां, हे कुणीं पाहाणार नाहीं. तुमच्या स्वतःच्या 
मालकीचा बंगला नाहीं, तरी तो झालला पाहिला, कीं उद्यां कोंकणांत 
गेल्यावर सारे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचवतील. पाठीमागून 
निंदा करायला चुकायचे नाहीत--ती आम्हा लोकांची वृत्तीच आहे. 
तेव्हां एकंदरीत पाहातां चार पैसे तुमच्याजबळ असले तर ते तुमचा 
बडेजाव केल्याशिवाय राहाणार नाहीत. आणि त्या दृष्टीनं पाहिलं म्हणजे 
बाकीच्या गोष्टींकडे डोळेझांक करावी असंच मला वाटतं. ” 

नाझरांच्या बोलण्यामुळं मला काय वाटलं त्याची कल्पना मला 
आज देतां येणार नाहीं. तो आत्मविश्वास होता, कीं अभिमानाची लहर 
होती, ह सांगतां येत नाहीं. पण एव्हढं मात्र खरं, कीं माझं अंतःकरण 
फुलून गेलें. जुन्या आळखीचा एक माणूस येऊन त्यानं आपल्याबद्दल 
चार चांगले शब्द काढले, अशी गोष्ट पहिल्यानंच झाल्यामुळे माझ्याप्रमाणे 
माझ्या आईलाही बरं वाटलं. 


बाईसाहेबांच्या मृत्यूनंतर जरी त्या घराचा आणि आमचा संबंध 

सुटला होता तरी मला पुन्हां पुन्हां त्यांची आठवण आल्यावांचून राहात 

नसे. एकदां जाऊन आपले वैभव साहेबांच्या मुलांसमोर मिरवून यावं 

अशी लहर पदोपर्दी मळा येई, आईला मी ते बोलून दाखवलं नव्हतं, 
२६ 


मी माळकीण होत 


त्यांचे घर कोणत्या बाजूला होतं याची मला कल्पना नव्हती. बोलतां 
बोलतां सहज आईकडून मी त्यांचा पत्ता काढून घेतला नि एक 
दिवशीं भाड्याची मोटार करून त्या बाजूला गे, 


माझी निराशा झाली. ती मंडळी तिथून निघून गेळी होती आणि 
ती दुसऱ्या कुठं रहायला गेली याचाही तिथे राहायला आलेल्या लोकांना 
पत्ता नव्हता. 

माझी खेप फुकट गेली, तसंच मोटारीचे भाडंही फुकट गेल. 
माझ्या निराशेची ही हकीकत मी आईला सांगितली नाही. 

काय वाटेल ते करून या मंडळीचा पत्ता लावायचा असा मी निश्चय 
केला होता, खाणावळींत येणाऱ्या मंडळीपैकीं पुष्कळ मंडळी माझ्या 
र्‍चांगली ओळखीची झाली होती. त्यांच्याकडून त्यांचा पत्ता काढण्याचा 
मी प्रयत्न केला. पण मुंबईच्या अफाट सिंधूंतला तो लहानसा बिंदू 
मल्झ सांपडडून मिळणे शक्‍य नव्हतं, 

अंतःकरणाला तळमळ लागली होती पण तिच चरितार्थ होत नव्हता. 

श्रीमंतीतच जरी आज आमचे दिवस जात होते तरी गरिबीची आठ- 
वण जाऊं नये म्हणून आई केव्हां केव्हां मला कामाला लावीत असे, 
राविवारच्या दिवर्शी जेवणांत कांही तरी थाटाचा बेत होत असे. एकादं 
पक्वान्न असे, पंगतीवर ते पक्वान्न वाढण्याचं काम माझ्याकडे असे, 
एकाद्या रविवारी पकवान वाढायला जर मी न आलें, तर जेवणारी 
मेडळी एकच गिला करीत, 

हें वाढण्याचे काम करीत असतांना मला अभिमान वाटे. पण 
वाढण्याची गडबड चाळू असतांना जेवणारी मंडळी जी काव काव 
करीत, त्याने माझा जीव गांजूत गेल्यासारखा होई. मुद्दाम मला 
त्रास द्यावा अश्शी कुणाची इच्छा नसे. पण सतावून सोडण्यांत मात्र येत 
असे एवढे खरं. त॑ सतावणं कोतुकाचं होतं. 

२9७ 


वेणू वेळणकर 


पूर्वीची आठवण झाली म्हणजे मला या वाढण्याचं केव्हां केव्हां 
वाईट वाटे, नोकरासारखं मी काम करावं म्हणून बाळासाहेब ज्या वेळी 
इट्ट धरीत असत त्या वेळीं बाईसाहेब त्यांना मना करीत. म्हणून असलं 
हे काम करणं कमी दर्जाचं आहे अशी त्या श्रीमंतांच्या घरांत असतांना 
माझी कल्पना करुन दिली गेली होती. नोकर असतांना देखील--म्हणजे 
माझी आरे नोकर असतांना--तीं कामं मी केलीं तर माझ्या दर्जात 
जर बिघाड होत असे, तर आतांच हं असं कां वाटावे ! 

पुन्हा मला आठवण येई, ज्या दिवशी घरी कांहीतरी समारंभ असे 
त्या दिवर्शी अन्नशुद्धि वाढायचे किंवा पक्कान्न वाढायचे काम बाईसाहेब 
स्वतः करीत असत. त्यांना तो कमीपणा वाटत नव्हता. जे काम 
मालकिणीने केले म्हणजे कमदर्जाचं ठरत नाहीं, तेंच काम नोकराकडून 
सक्तीनं करून घेतलं म्हणजे कमदर्जीचे कां ठरावं, याची मीमांसा मला 
करतां येत नव्हती. 

आजही तसंच होत होतं. मालकिणीची मुलगी म्हणून मालक, या 
नात्याने मी. वाढण्याचे काम करीत होते. आणि म्हणूनच सारी माणसं 
माझं कोतुक करीत असत. तेंच काम वाढपी करीत होते त्यांचं कोतुक 
कर्षी कुणी केलं नाहीं, त्यांची चूक झाली तर सारी मंडळी त्यांच्या 
अंगावर ओरड. त्यांच्याविरुद्ध तक्रारी करी, पण मी जरी वाढण्यांत 
चुकले, हयगय केली, उशीर लावला, तरी माझ्याबद्दल प्रत्येक जण दया 
दाखवी. नव्हे--दुसरं कुणी घाई करीत असलं तर त्याला ते म्हणत, 
“६ अरे एव्हढीशी ती पोर-तुम्हां एव्हढ्या मंडळींना वाढते आहे, तर 
तिला शाबासकी द्यायच्याऐवर्जी असं अंगावर काय वसवस ओरडतां !” 

वाढप्यांत देखील माझ्या एव्हढाच एक मुलगा होता. तोही नव्हता 
का वाढीत ? मग त्याच्याबद्दल दया कां दाखवली जात नसे ? 

हे कोडे मला कधींच उलगडलं नाही. 

नाझर बरेच दिवस मुंबईला राहिळे होते. सर्व मंडळी घरच्या 

रट 


मी मालकीण होते 


एकाद्या वडील माणसासारखी त्यांना लेस्वात असत. तेही आमच्या- 
बद्दल नात्याच्या माणसाची जेवढी काळजी घ्यावी तेवढीच घेत 
असत, तितकंच कोडकौतुक करीत असत. माझ्याशी ते बोलूं 
लागले, की आईच्या तारिफेशिवाय दुसरी कोणतीच भाषा य्यांच्या 
तोंडून निघत नसे आईने काय कतेबगारी दाखवली होती याची पूर्ण 
कल्पना मला नव्हती. 

पण एके दिवशी आई त्यांना  जेब्हां मागल्या 
सगळ्या गोष्टी सांगू लागली, तेव्हां कांहीं कांहीं बाबीवर चांगलाच 
प्रकादा पडला. मुंबईबाहेरून पोट भरण्यासाठी मुंबईत आलेल्या एका 
बाईला एवढी मोठी खाणावळ चाळू करणे कधींच शक्‍य झालं नसतं. 
जवळ जवळ दोन वर्षे माझी आई साहेबांच्या घर्री सेपाकीण म्हणून 
राहिली होती. त्या वेळचा सारा पगार जरी तिनं साठवून ठेवला 
असता तरी तिला खाणावळ उघडण्याइतके भांडवल मिळणं शक्‍य 
नव्हतं. त॑ जं शक्‍य झालं तें त्या माउलीच्या कृपेमुळे, बाईसाहेबांची 
स्वतःची अशी कांही पुंजी म्हणून होती. त्यांतले एक हजार रुपये त्यांनीं 
मरण्यापूर्वी माझ्या आईकडे “ माझ्यासाठी ' देणगी म्हणून दिले हेते. 
त्याच भांडवलावर तिला ही खाणावळ उघडतां आली. 

ही हकीकत ऐकली त्यावेळीं नाझरांना फार वाईट वाटलं. ते म्हणाले, 
६६ कुठली कोण बाई, नात्यागोत्याची तर नव्हतीच नव्हती---मालकिणी 
म्हटल्या म्हणजे घरच्या नोकरांचा छळ करतात---तर उलट या बाईनं 
कुणाला न कळत गुपचुप एवढी मोठी हजार रुपयांची रकम दिली, हँ 
खरोखरच मोठं आश्चर्य आहे! " 

आई म्हणाठी, ''ती रक्कम त्यांनी 'मला' दिली नाहीं-वेणूला दिली. 
आणि खरं पाहिलं तर ही खाणावळ वेणूची आहे---माझी नव्हे. तिचे 
पेसे मी वापरले आहेत आणि म्हणूनच या खाणावळीबद्दल मला फार 
काळजी वाटत. खऱ्या हिशेबीं पाहिलं, तर इथं मी नुसती व्यवस्थापक 

२९ 


वेणू वेलणकर 


आहे, ही उद्यां मोठी झाली म्हणजे हिचा धंदा हिच्या ताब्यांत देऊन, 
आई म्हणून हिनं मला चार घास घातले तर खाऊन, मुकाट्यानं स्वस्थ 


एह्दीन--र्किवा तिची नोकर म्हणून काम करीन. ईं त्रह्मस्व आहे. ते 
प्रला नको आहे 


मला वाईट वाटले. ही हकीकत मी ऐकावी म्हणून आईने ती 
मुद्दाम नाझरांना सांगितली. विश्वासांत धेऊन कोणतीद्दी गोष्ट मला सांगा- 
यची आईची संवयच नव्हती म्हणूनच तिनं ही संधी साधली. 

मला त्यांवेळीं काय वाटलं हे मला सांगतां यायचं नाही; पण एक 
प्रकारचा अभिमान वाटला खरा. बाइसाहेबांची आठवण होऊन माझे 
हृदय भरून आलं. त्यांनीं मला आपली मुलगी म्हटलं होतं त॑वचन 
शेवटपर्यंत सार्थ केल.--- 

हे विचार माझ्या अंतःकरणांतून वावरत आहित तोंच आई माझ्या- 
कडे वळून म्हणाली, “ आणि हें पहा वेणू , हे बोलायचं नाही बरं 
कुणासमोर, हं एक गुपित आहे. बाईसाहेबांनी मला शपथ घातली 
आहे. त्यांच्या घरांतल्या माणसांना जर ही हकीकत कळली, तर बिचारी 
ती माउली आज मरून गेली आहे, तरी तिला शिव्या देतील. 

आईचं म्हणणं मला पटलं. तरी त्यावेळी माझ्या पोखुद्धीला असं 
वाटलं, “ कोण जातं आहे सहिबांना सांगायला ? ? नि ते मंबईत आहेत 
कीं नाहींत याचा तरी कुठं पत्ता होता !-- 

पुन्हां असं वाटलं, हं सांगायचं तरी कुणाला ? असं कोण जिवा- 
भावाचे माझं माणूस होतं, कीं त्याच्याकडे मी सांगणार होते ! कुणाला 
तरी सांगावे असं मला वाटत होतं खरं. या खाणावळीची मालकीण 
मी आहें, या वस्तुस्थितीचा मला अभिमान वाटला. कुणाजवळ तरी 
ती मालकी मिरवावी म्हणून मला उत्कंठा लागली, मग सांगा- 
यच कुणाजवळ !--पण लगेच आठवण झाली, कीं बाईसाहेबांनीं शपथ 
घातली आहे. त्यांनीं शपथ घातली असतां ही हकीकत सांगणं कांडी 

२७ 


मी मालकीण होत 


चरोबर होणार नाहीं. उद्यां मी मोठी झालं-म्हणजे सर्वोना कळणारच 
आह---मग आजच कशाला घाई ? 

तात्पुरतं का होईना, पण त्या वेळीं मी माझ्या मनाचे समाधान 
करून घेतलं; पण त्या दिवर्शी माझ्या स्वभावावर जो एक प्रकारचा 
परिणाम झाला, तो मात्र नाहींसा झाला नाही, या खाणावळीची मालक 
मी आह --आई मालकीण म्हणून मिरवते आंहे---पण ती खरी 
मालकीण नव्हे, नुसती माझ्या वतीर्ने व्यवस्था पाहाते अहि---या जाणि- 
वेनं माझं अंतःकरण एक प्रकॉरे फुढून गेलं होते. आई इतके माझे 
कोडकौतुक कां पुरवते, माझ्या कपड्या-लत्याकडे एव्हढ्या काळजीनं 
कां लक्ष देते, म्युनिसिपालटीच्या मिक्रार शाळेतून काढून तिनं मला 
बड्या लोकांच्या व्यवस्थेनं चालवलेल्या शाळेत कां घातलं, याचा सारा 
उलगडा मला झाला. या ज्या कांहीं गोष्टी घडत होत्या त्या आईच्या 
इच्छेने नव्हत्या; ही जाणीव मला ज्यावेळीं झाली त्या वेळीं आईच्या 
प्रेमाचा धागा माझ्या अंतःकरणांतून तुटून गेला, माझी जन्मदात्री आई 
जरी ही असली, तरी जीवनदात्री आई म्हणजे बाईसाहेबच, ह माझ्या 
अंतःकरणांत कायमऱचे बिंबून राहिले, 

आईबद्दलचा माझा आदर या विचारपरंपेरेने कमी झाला, असं मात्र 
नव्हे. पण या पूर्वीचा माझा आईंबद्दलचा जो लळा होता, माझ्यासाठी 
मुद्दाम ती मला एव्हढ्या श्रांमंती थाटांत ठेवते, हें समजल्यामुळं उत्पन्न 
झालेला जा अभिमान होता, तो संपला. 

माझ्या आयुष्याला इथून एक प्रकारे नवीन वळण लागलं. 


श्रै 


प्रकरण ६ 
सी भिजासखोर झालें 


त्या दिवसापासून माझा नित्याचा स्वभाव बदलला. या एव्हढ्या 
मोठ्या पसाऱ्याची मालकीण मी आहे, है वाटूं लागल्यामुळं माझ्या 
चालचलणुकींतही फरक झाला. तो फरक नोकरचाकर नि जेवायला 
येणारे लोक यांनाही जाणवू लागल्यामुळं ते तसं बोठूनही दाखवू लागले. 
एक बँकेतले कारकून मोठे बोलघेवडे असत. खाणावळींत पाऊल 
टाकल्यापासून परत जाईपर्येत त्यांच्या तोंडाचा नगारा सारखा वाजत 
राहिलेला असे, त्यांची येण्याची वेळही ठराविक होती. त्यामुळं त्यांच्या 
येण्यावरून बाकीचे लोक आपल्या टाइमाचा अंदाज घेत असत. ते आलि 
म्हणजे, * आली नवाची गाडी ' असा सवोच्या तोंडून उद्गार येई. 

त्यांच्या बोलण्यावरून माझ्या वृत्तीत फरक झाल्याची मला खात्री 
पटली. एक दिवस ते म्हणाले, “' हली तुमची मिजास फार वाढली 
आहे वेणूताई ! मला वाटतं, शाळेंत तुमचा नंबर वर गेला असावा, 
कांहीं बक्षीस मिळालं असावं किंवा एकादी स्कॉलरशिप मिळाली 
असावी ! काय, झालं काय तुम्हांला ! सांगाल की नाहीं ! ” 

मी विचारलं, “ मिजास वाढली आहे म्हणजे झाले आहि काय ! र 

त्यांनी उत्तर दिलं, “' ते तसं कांही सांगतां यायचं नाहीं. म्हणजे 
अमुक एक फरक झाला आहे असं कांही टिचून सांगतां यायचं नार्ही, 
पण फरक झाला आहे यांत मात्र दका नाहीं, जरा भाषण थोडंसं करारी 

डर 


मी मिजासखोर झाळें 


येतं. नोकरांना हुकूम करण्यांत जरा जरब जास्त वाटते. आम्हां लोकांची 
चौकशी करण्यांत देखील मोठेपणा आणल्याचा वास येतो. असे 
किरकोळ किरकोळ फरक आहेत; पण ते माझ्यासारख्याच्याच नजरेला 
दिसतात, नाणीं बारकाईनं पाहायची सवय आहे कीं नाहीं मला बॅकेत, 
तिथं बारिकसारिक नाण्यांतले बारिक सारीक दोष जसे मला चटूकन 


दिसून येतात, तशीं या मुंबईच्या बँकेच्या वातावरणांतलीं चालती बोलती 
नाणीं देखील मी चटूकन पारखूं शकतो. 


त्यांची पारख बरोबर होती यांत शंका नाहीं. त्यांनीं दाखवून दिल्या 
बर का होइना, पण माझ्यांत झालेला फरक मला जाणवू लागला. पुन्हां 
मूळपदावर यावं या निश्चवयानं जरी वागायचा प्रयत्न मी करूं लागलं 
तरीही अधिकाराची जाणीव माझ्या स्वभावांतून जात नव्हती. 

शाळेतल्या बरोबरीच्या मुलीदेखील असंच म्हणत असत. इली मी 
ज्या शाळेत जात होते ती निन्बळ मुलींचीच शाळा होती. तिच्यांत 
बराचसा भरणा खिश्चन आणि पारशी मुलींचा होता. त्यांच्या चाल- 
चलणुकीबराबर माझीही चालचलणूक बदलली गेली असल्यामुळं इतर 
शाळांतर्ली मुली-मुलं माझ्याकडे निराळ्या नजरेने पाहात असत. 
माझ्या शाळतल्या शिक्षकिणी बहुतेक यूरोपियनच असल्यामुळं आमचा 
सारा व्यवहार इंग्रजीतच चालत असे. मराठी मुलींत माझं इंग्रजी 
एकंदरींत बरंच चांगलं आहे असं मास्तरणीही म्हणत. इतर शाळेंतील 
मुलांशी बोलतांना, म्हणूनच, ज्यावेळीं मी इंग्रजी बोलत असे त्यावेळी 
तीं थोर्डीशीं लाजून मराठीतच उत्तर देत, आपल्या इंग्रजींत कांहीं चुका 
होतील नि ही मुलगी त्या चुका काढील नि त्यामुळे आपला नि त्या- 
बरोबरच आपल्या शाळेचा पाणउतारा होईल, या भीतीनं तीं माझ्यार्श 
मराठींतच बोलत असत. 

पण मी इंग्रजी बोलण्याचा माझा शिरस्ता कायम ठेवला होता. 
मराठीकडे दुर्लक्ष करण्यांत मला अभिमान वाटे. मराठी बोलतांनादेखील 

श्रे 


वेणू वेळणकर 


मधून मधून शक्‍य तितकं इंग्रजी घालून बोलण्याची मला जी संवय 
लागली होती ती इतर लोकांच्या दृष्टीनं जरी सदोष समजली जात असे, 
तरी मला मात्र त्याचा अभिमान वाटे. माझ्यामागे इतर मली जी चचा 
करीत असत ती माझ्या कार्नी येत नसे असं नाही, ' खाणावळ- 
वालीची मुलगी उगीच मिजास दाखवते. इंग्रजी बोलली तरी खाणा- 


वळवाली ती खाणावळवाली. ..? असं मला ऐकूं येईल अशा रितीनं 
बोलले जात असे. 


मी खाणावळवालीची मुलगी म्हणजे कांहीतरी कमी दर्जाची आई, 
असं लोकांनीं कां समजावं हा मला मोठा प्रश्न पडे. कांही कारकून 
होते, कांही वकील होते, त्यांची जीं मुलं होतीं त्यांना धड अंगभर कप- 
डेही मिळत नसत, किंवा वेळीं पुस्तकंही मिळत नसत, मी सवे दृष्टीनं 
सुखांत होति--समृद्धींत होतै---मग माझ्यापेक्षा कारकून आणि वकील 
यांचा दर्जा जास्त कां ! 

याचा उलगडा मला होत नसे. खाणावळीच्या धंद्याला लोकांर्नी 
नांवं कां ठेवावीत, याचं उत्तर मी कुणाकडून मागितलं, तरी माझं 
समाधान होण्याजोगे उत्तर कुणालाच देतां येत नसे. खाणावळीच्या 
धंद्यांत जर इतर कोणत्याही धैद्यापेक्षां चांगले पेसे मिळतात तर 
'खाणावळीचा धेदा कमी कां १ 

पूर्वीच्या आयुष्यांत माझ्या आईनं सेपाकणीचे काम केलं असलं-- 
आजही ती वेळप्रसंगी सेपाक करीत असेळ वाढीत असेल--- 
तरी तिचा दर्जा इतर कुटुंबांत सैपाक करणाऱ्या आणि वाढणाऱ्या 
चायकांपेक्षां कमी कां १? आपापल्या घरचे जवण ज्या बायका 
करतात त्या, त्या घरांपुरत्या खाणावळवाल्याच नाहींत का ! त्या 
बिचाऱ्यांना खाणावळवालीप्रमाणे त्या कामाचा मोबदलासुद्धां मिळत 
नाई---मग त्यांचा दर्जा मोठा कां आणि आमचा दर्जा लहान कां ? 
नोकरांनी काम करणं आणि मालकानं काम करणं, यांत दर्जाच्या नि 

शड 


मो मिजासखोर झाळ॑ 


विनयाच्या दृष्टीनं जो फरक केला जात असे तशाच प्रकारचा हाही 
फरक मला वाटला. 

शाळेतील जीवनांत कांहीं कांही मैत्रिणी जोडल्या जात होत्या, त्यांत 
जशा महाराष्ट्रीय होत्या तशाच पारशी आणि खिश्चनही होत्या, पण 
मला महाराष्ट्रीय जास्त जवळच्या वाटत असत, तै त्या मराठी बोल- 
तात म्हणून नव्हे---तर पारशी आणि खिश्चन मुली माझ्यापेक्षा जास्त 
सुबुद्ध होत्या--जास्त बुद्धिमान होत्या--तशा महाराष्ट्रीय मुली नव्हत्या 
नि म्हणूनच माझा वरिष्ट दर्जा त्यांच्याकडे मिरवतां येत असे-- एव्हद्या 
साठीच त्यांचा माझा स्नेहृ जुळून थेत होता. 

स्नेह्द जुळून येण्याच्या कार्मी समान बुद्धि, समान वृत्ती आणि समान 
दर्जी यांची आवशयकता आहे असं म्हणतात पण माझ्या बाबतींत 
याच्या अगदीं उलट होतं. मला ज्या मेत्रिणी पाहिजे होत्या त्यांच्याकडे 
मला माझा मोठेपणा मिरवतां येईल कीं नाहीं, याचा अंदाज मी 
आधीं घेत अर्से, खाणावळबाईची मुलगी म्हणून इतर मुली मला 
कमी लेखीत, त्यामुळंच अशाप्रकारची वृत्ती माझ्या अंगीं बाणली 
होती कीं काय, याची मला वरच्यावर शंका येई. 

माझ्या या मैत्रिणींच्या यार्दीत ज्या मुलीचे अग्रस्थान होतं त्या 
मुलीचे नांव सुलोचना असं होतं. तिचा बाप कापड दुकानदार होता. 
कारकून वकिलांचीं मल माझ्या प्रमाणंच तिलाही कमीदजोच्या दृष्टीनं 
पाहात म्हणूनच तिचा आणि माझा जास्त लोम जडला होता. दोर्षी- 
चीही तक्रार एकाच प्रकारची होती. तिचा बाप देखील चांगला श्रीमंत 
होता---तिला कमी लेखणाऱ्या कारकून बकिलांना त्यानं आपल्या दुका- 
नांत नोकर म्हणून ठेवलं असतं, इतका श्रीमंत होता. तरीही तिला लोक 
कमी लेखीत असत; म्हणूनच तिचीही माझ्याप्रमार्णे दर्जाच्या बाबतींत 
तक्रार असे. 

मी तिच्या घरी जात असे त्यावेळीं तिचे वडील तिच्यापेक्षांही 

४५ 


वेणू वेलणकर 


माझं कोतुक करीत असत. ते देखील गारिषीतून वर चढलेले होते. 
"तही आमच्यासारखे ब्राह्मणच होते. त्यांनाही दुकानदारीचा धंदा करीत 
असल्यामुळं त्यांच्या तोलाच्या आणि बरोबरीच्या माणसांकडून कमी 
लेखलं जात असल्याची जाणीव होती. माझ्याबद्दल त्यांना अभिमान 
वाटत असे तो यामुळंच. 


त्यांची मुलगी माझ्याइतकी अभिमानी नव्हती पग अभ्यासू होती. 
बुकांत तोंड खुपसून बसण्याची मला चीड असे. मी अभ्यास केव्हां 
करंत है कुणाला कळूसुंद्रां नये, याबद्दल मी खबरदारी घेत अर्से. 
: सदोदित उनाडणारी ही मुलगी वर्गीत वस्चा नंबर पटकावते ' असं 
लोकांनीं म्हटलं म्हणजे मला मोठा अभिमान वाटे नि म्हणूनच 
सुलोचंनेच्या वडिलांना माझ्याबद्दल अभिमान वाटे, 


सुलोचनच्या वडिलांचे नांव सदाशिवराव असं होतं. सार्वजनिक 
चळवळीत ते प्रामुख्याने भाग घेत असत, बहुजनसमाजाला त्यांची 
माहिती होती. वतेमानपत्रांतून निरनिराळ्या सभांच्या वेळी त्यांचीं 
भाषणं झाल्याचे रिपोर्ट ज्यावेळी प्रसिद्ध झालेले मी वाचले त्या वेळी 
माझ्या आईनं देखील सार्वजनिक चळवळींत असाच भाग ध्यावा, 
असच वर्तमानपत्रांतून तिच्या भाषणांचे रिपोर्ट यावेत, असं मला वाटूं 
लागलं. 

मला हे जे कांही वाटत असे त॑मी आईकडे कधींच बोलून दाखवलं 
नाही. नि बोडून दाखवलं असतं तरी त्याचा उपयोगही झाला नसता. 
'त्या काळांत बायका सार्वजनिक चळवळींत पडत नव्हत्या असं नाही; 
पण आपण अशा सार्वजनिक चळवळींत जाऊं लागला तर आपली 
उपेक्षा केली जाईल किंवा अपमान केला जाईल, ही भीति आईला 
वाटत असे--आणि ती तसं बोलूनही दाखवीत असे--म्हणूनच 
माशी इच्छा मी तिला कर्धी स्पष्टपणे बोठून दाखवली नाही. 

शद 


मी मिजासखोर झाळं 


सदाशिवरावांना माझ्या आईबद्दल मोठा आदर असे. अनाथ अपंग 
स्थितींत मुंबईसारख्या अफाट ठिकाणी येऊन तिनं आपल्या धंद्याचा 
जो जम बसवला आणि जे वजन निर्माण'केळं, त्याबद्दल ते तिची 
तोड फाटेपर्यंत स्तुति करीत असत. कोणताही धंदा करणाऱ्या माणसा- 
बद्दल त्यांचा फार आदर असे, तितकाच नोकरी करणाऱ्या माणसां- 
बद्दल तिटकारा. असे. 

स्वतेत्र वृत्तीची त्यांना फार आवढ होती. तशीच स्वतंत्र 
वृत्ती आपल्या मुलामुलींच्या ठिकार्णी बाणावी म्हणून ते सदोदित 
जिवापाड परिश्रम करीत. ते ज्या ज्या वेळीं घरी असत त्या त्यावेळीं 
आपल्या मुलांना ज्या गोष्टी सांगत त्यांत स्वतंत्र बाण्याने धंदा करून 
पुढे आलेल्या लोकांच्या हकीकती प्रामुख्यानं असत, 

त्यांचा धाकटा मुलगा जयंत नि त्याच्यापेक्षा एक-दोन वर्षानी मोठी 
असलेली सुलोचना, हीच त्यांची आवडर्ती मुलं होतीं, बाकीर्ची मुलं 
बहुतेक नेभळट होती. सांगितल्या कामाची नि घातल्या अन्नार्ची 
राहाण्यांत त्यांना समाधान वाटत अस. तेंच सदाशिवरावांना आवडत 
नसे. ते म्हणत, “' माझ्या मुलांनी माझा अपमान केला, मला सोडून 
निघून गेली तरी सुद्धां मला वाईट वाटणार नाही, पण त्यांनीं कांही 
तरी स्वतंत्र बाणा दाखवावा असं मला वाटतं; आणि माझ्या दुर्दैवानं 
या दोन मुलांखेरीज बाकीच्या मुलांत बाणेदारपणा कसा तो नाहीच, --- 
याचंच मला दुःख होतं.” 

आमच्या खाणावळींत येणारे बँकेच,छारक दिनूमाऊ हे सदाशिवरा- 
वांचे एक खेही होते. बँकेच्या व्यवहारामुळेंच त्या उभयतांची मेत्री 
जमून आली होती. दोघांचाही स्वभाव थोडथोडा चर्चेखोर नि स्वतंत्र 
आण्याचा असल्यामुळं दोघांचं मोठं मेतकूट जमलं होतं. 

आर्धीच सदाशिवरावांना माझ्या बद्दल अभिमान---स्यांतून दिबूभाऊ 
येऊन माझी तारीफ करूं लागले म्हणजे मला अधिकच लाजल्या 
सारखं होई. 


. 8). 


वेणू वेळणकर 


दिनूमाऊ म्हणायचे, “' देवदयेनं सत्यभामाबाईची स्थिति सुखासमा. 
घानाची झाली आहे. खरं पाहिलं तर या पोरीनं गाडीघोड्यांतून मिरवून 
दिवस काढायचे. असं जरी आहे तरी हातांत परात घेऊन ही वाढूं लागली 
म्हणजे मला मोठं कोतुक वाटतं आणि सत्यभामाबाईंच्या शिस्तीची तारीफ 
करावीशी वाटते. आतां हली इ्ली ही थोडीशी मिजासखोर होऊं लागली 
आहे--नाहीं असं नाहीं. मनुष्याचे वय जसजसं वाढू लागते तसतशी 
श्रीमंतीची जाणीव त्याला मिजास आणते. हा कांहीं मोठासा दोष आहे 
असं नाहीं. पण श्रीमंत असूनदेखील शालिन्य कायम ठेवलं तर त्याला 
विशेष शोभा येते, हँ या पोरीला अजून कळत नाहीं याचंच मला 
दुःख होते.” 

दिनूमाऊंच्या या भाषणाचा मला राग आला. मी म्हटलं, “' आतं 
स्पष्टच विचारते, काय माझी मिजासखोरी पाहिलीत त॑ आतां यांच्यासमोर 
सांगा ! रोज तुम्ही असंच ग्हणतां-मी विचारते---नि तुर्म्ही मला कांहींतरी 
उत्तर देऊन माझं समाधान करू पाहातां, आज कांही मी स्वस्थ बसणार 
नाही ! काय माझा दोष आहे तो मला कळला म्हणजे पुढे कसं वागावं 
एव्हढं तरी मला कळेल. तुम्हांला माहीतच आहे, कीं माझं सारे आयुष्य 
खाणावळींतच गेल. कुढुबवत्सल माणसांची घरं पाहिली, कीं मला त्यांचा 
हेवा वाटूं लागतो. आपलीं चारदोन माणसं-एकामेकांशीं मिळून मिस- 
ळून राहिलेली---तेव्हढ्याच चारदोन माणसांची वदळ-नि तेवढाच 
चिमुकला संसार पाहिला म्हणज आमच्या घरच्या रामरगाड्याचा मला 
तिटकारा येऊं लागतो. अशा ठिकार्णी वागायचं कसं, नि शालिन्य 
दाखवायचं कसं, हें तरी मला सांगाल, ” 

दिनूमाऊ हंसठे, सदाशिवराबद्दी इंसले, सुलोचनेनं मला इंसतां 
हंसतां चांगलंच खुबळलं. सर्वोनांच गंमत वाटण्याजोगं असं मी बोलले 
तरी काय, याचं माझं मलाच आश्चये वाटलं. 

दिनूमाऊ म्हणाले ““ असं पाहा वेणूताई, हे भद मोठे सूक्ष्म आहेत. 

ड्ट 


मी मिजासखोर झाळे 


मोठ्या चुका असल्या म्हणज त्या चटूकन दाखवून देतां येतात. पण 
माणसाच्या स्वभावांत जे सुहेच्या अग्रासारखे बारीक बारीक फरक होत 
असतात, ते तितके चटूकन दाखवून देतां येत नाहींत. चुकीच्या आणि 
खिळ्यांच्या आघाताने कदाचित जखमा होतील पण सुई बोचली तर 
तिने रक्तसुद्धां यायचं नाहीं. पण ती बारीकशी टोंचणी मात्र माणसाला 
चांगलीच जाणवते-तसं तुझं झालं आहि. यापूर्वी तूं वाढायला आलीस 
म्हणजे इतर वाढप्यांसारखीच एक “ मुलगी वाढपी ' आहे एवढच मला 
वाटे, पण आईच्या अनुकरणानं म्हणा किंवा लोकांच्या चिथावणीनं 
म्हणा, तुला अलिकडे मोठेपणाचा नसता आव आणिण्याची संवय 
लागली आहे. पूर्वीच्या वतनांत आणि आजच्या वतेनांत हा फरक 
किती झाला आहि, ह कांहीं मला हात पकडून दाखवतां यायचं नाहीं. 
पण तुझा तूंच आपल्या मनाशी विचार कर म्हणजे हा फरक तुला जाण- 
वेल. आणि जा तो तुला तसा जाणवला नाहीं, तर तुझ्या अंगीं सूक्ष्म 
बुद्धि नाहीं असं मी म्हणन-नाही तर मीच गाढब आहे म्हणून तूं 
म्हण --” असे म्हणून दिनुभाऊ माठमोठ्यानं हंसले. 

तो भद मला कळत होता--चांगला जाणवत होता---पण माझ्या 
स्वभावांत झालेला हा फरक दुरुस्त कसा करावा, हें मात्र मला 
कळत नव्हते. 

एक दिवस एक चमत्कारिक घटना घडून आली. 

सवोर्ची जेवणे झालीं होती नि एक ग्रहस्थ घाईघाईनं येऊन 
जेवायला बसले. मी जात झेते-तो. सहज माझी नजर गेली. मी 
थांबले, चांगलं निरखून पाहिलं नि म्हटलं, ““ कोण, बाळासाहेब ! ” 

ते बाळासाहेबच होते यांत शका नव्हती. पण मी नांवाने हाक 
मारली तरीही त्यांनीं उत्तर दिलं नाहीं. 


र 1 ९ 


प्रकरण ७ 
माझं वेभव कुणाचं ? 


मला वाटलं त्यांनीं मला ओळखलं नाहीं. मी घरांत जाऊन आईला 


सांगितलं तशी आई बाहेर आली. बाकीचे जेवणारे जेऊन गेले होते. 
एकटेच बाळासाहेब जेवत होते. 


आई येऊन समोर उभी राहिली असं पाहून बाळासाहेब म्हणाले, 
५६ एकूण ही “ तुमची ' खाणावळ तर ! आगि ही वेणू वाटतं ! केवढी 
मोठी झाली ! मी कांही तिला ओळखलं नाही --” 

आईनं विचारलं, “' साहेब कुणीकड आहत ! बाकीर्ची माणसं कुठं 
आहेत! ” 

बाळासाहेब वर न पाहतांच म्हणाले, “' आतां कुर्णींच राहिलं नाही. 
मुळखुटा एकटाच मी काय तो हयात आहे. नोकरी पहायला आलो 
आहे मुंबईला, 

€ म्हणजे गांवीं होतां वाटते अजूनपंयेत ! ” 

पाण्याचा पेला तोंडाला लावून गटागट पाणी पिऊन, पेला खार्ली 
ढेबतांना चांगलाच जोरानं आपटून बाळासाहेब म्हणाले, “' हो हो, गांवी 
द्वोतो अजूनपयत. पेन्हान घेतल्यावर फारां दिवसांनीं आमच्या बाबांना लहर 
आली होती शेतीची, शती करीत होते. नांगर सुद्धां धरीत होते स्वतः ! 
मलाही शेतीला लावायचा त्यांचा विचार होता. सारे आयुष्य साहेब 
म्हृणून मिरवल्यावर, म्हातारपर्णी शोती करणे चांगलंच जुगल असतं 

ष्‌ 0 


माझं वैभव कुणाचं ! 


त्यांना ! पण सारे आयुष्य आमच्या पुढं आहे याची त्यांना कुठं दाद 
होती ! ते साहेब झाले होते तस आम्ही साहेब होऊं नये का ! पण 
मॅट्रीक होतांच त्यांनीं मला दोतीला लावायचा बेत केला. मी साफ 
नाकारले. आमचची चांगलीच चकमक उडाली आणि मी गेलो निघून 
भटक्या मारीत ! एका सकसकंपनी बरोबर होतो बरींच वर्षे, दोतावरचे 
बेल चुकवले पण सर्कशींतलीं घोडींगाढवं खाजवायचं होतं ना माझ्या 


कपाळीं ? एक दिवस तार आली--कॉलऱ्यानं आमच्या घरची सारी 
माणसं मेली. 


पुन्हां एकदां बाळासाहेबांनी पाणी पिऊन घेतलं. 

: कुंपनी सोडली --मगांबी गेलो, होतं नव्हतं ते॑ विकून टाकलं 
आणि स्वतःची सकस कंपनी काढली. नशीब तिथंही माझ्या हात 
घुऊन माग लागलं होतं, त्या सर्कशीचेही बारा वाजले आणि आतां 
कुठं तरी कारकुनी मिळाली तर पाहावी, म्हणून पुनः मुंबईच्या उंबर 
त्यावर पाऊल ठेवलं. ही तुमची खाणावळ, हें मला माहित नव्हतं --” 

८६ आमची कसली ! आहे दै सारे तुमचंच आहे.'' माझी आई म्हणाली, 
“ दुसऱ्या कुठं राहायची साय नसली, तर इथं यऊन राहा. भरपूर 
जागा आहे इथं. तुम्हांला एक स्वतंत्र खोलीच देते. आपलं घर सम- 
जून रहा. कांहीं संकोच धरूं नका. किती झालं तरी आम्हीं तुमच्या 
अन्नावर वाढला आहोंत. आहे हे सार तुमचेच आहे, 

५८ आहे है सार तुमचंच, ' असं म्हणतांना आईने जो आविभोव 
केला, त्यावरून मला आईच्या मनांत त्यावेळी येणाऱ्या विचारांची कल्पना 
आली. खरोखर ह सर्व त्यांचेच होते. बाळासाहेबांच्या आईने दिलेल्या 
भांडबलावर ही खाणावळ थाटली होती. मला प्रश्न पडला, आईने हा 
औपचारिकपणा दाखवला, कीं खरोखरच पूर्वीची जाणीव तिला आहे १ 

बाळासाहेब म्हणाले, ““'एका अर्थी बरं झालं, तुमची भट झाली हँ! 
ही खाणावळ तुमची आहे, हँ मला माहीत नव्हतं. त्राहणाची खाणावळ 

५१ 


वेणू वेलणकर 


म्हणून पाटी पाहिली, नि इथ शिरलो, सामान अजून स्टेशनवर क्लोकरूममर्धे 
ठेवलं आहे. तुम्ही एवढा लोभ धरतां, मग नाही कसं म्हणू ? आमचे 
बाबा होते साहेब, रह्दात होते नेपियन्सी रोडवर, गांवच्या लोकांशीं कर्धी 
संबंध ठेवला नाहीं, बाबांच्या मित्रांना शोधून काढीन म्हटलं, तर या 
मुंबईत तरी कुणी सांपडतील असं मला वाटत नाहीं, असतील कुणी 
तसलेच मोठे साहेब. पण ते कसं वागवतील, याची बाबांच्या वागणुकी- 
वरूनच मला चांगली कल्पना आहे. कुणाचा तरी आघार मला या वेळेला 
पाहिजेच आहे. इथंच सामान घेऊन येता झाले ! ” 

आईचा हा चांगुलपणा कांही मळा पटला नाहीं. बाळासाहेबांबद्दल 
पूर्वीपासूनच माझं मन कलुषित झालेले होतं. आतांचं त्यांचं हे भाषण 
त्या जुन्या समजुतींत फरक करील अशा प्रकारचं नव्हतं. ज्या माणसाला 
स्वतःच्या बापाबद्दल आदर नाहीं, एवढया प्रेमळ आईचा नुसता उलेख 
सुद्धां जो करीत नाहीं, त्या माणसाला आई बळेच घरांत घेते आहे, हॅ 
कांहीं मला पटलं नाही. 

मी आईला जरी तसं बोलून दाखवलं नाही, तरी माझ्या चर्येकडे 
पाहून ती आंत आल्यावर म्हणाली, “' असं पद्या वेणू, मुळाला विस- 
रून चालत नाहीं. बरा असा, वाईट असो, पण मुलगा बाईसाहेबांचा 
आहे. आज संकटांत आहि. संकटे कुणावर येत नाहीत ! साहेत्रांची 
एवढी इस्टेट होती, पण आज त्यांचा मुलगा भीक मागायला घराबाहेर 
पडला आहे ना ! तूं आतां कांही लहान नाहींस, यंदा मेंटीक होणार आहेस. 
मंटीक झालेला मुलगा असला, तर तो नोकरीला लागून घरसंसार 
चालवतो. लहान वयांत तूं अभ्यास केलास, तुला संधि मिळाली म्हणून 
लहान वयांतच आज मोठ्या माणसांच्या पंगतीला बसलीस, तो मोठेपणा 
मनातं आणला पाहिजे. त्रास झाला तरीदेखील घटकाभर सोसला पाहिजे. 
पण बाई ग, मुळाला विसरून चालायचं नाहीं. मूळ विसरून कुणाचं 
कल्याण झालं नाही. मूळ न विसरल्यानं हाल ह्योतील, त्रास होईल, उप- 

५२ 


माझे वंभव कुणाचं ! 


सर्ग देखील होईल, पण अकल्याण खास होणार नाहीं, हें मी तुला 
बजावून सांगते. ” 

उभ्या आयुष्यांत इतक्या जिव्हाळ्याने आई माझ्याशी कधींच बोलली 
नव्हती. तिच्या तोंडून निघालेले उद्गार इथे लिहिलेले वाचण्यांत वाच- 
काला तिची कळकळ कळणार नाईही---पण पिळवटलेल्या अंतःकरणांतून 
निघालेले ते उद्गार मी या जर्न्मी तरी विसरणार नाही. 

मळा शरम वाटली. बाईसाहेब्रांच्या पेशावरच हे वेभव उभारले 
होतं, याची आठवण असतांना सुद्धां मला ते तसं वाटावं, याची माझी 
मलाच लाज वाटली. माझ्या कमकुवतपणाबद्दल मी मलाच दोष दिला. 
खरं पाहिले तर हँ “मी बोलायला हवं होते, या खाणावळीची मी 
मालकीण आहे, अक्षी जाणीव मला झाली होती ना? मग ती कृतज्ञता 
दाखवण्याचा खरा अधिकार माझा हाता, ऐं कसं माझ्या ध्यानी आले 
नाहीं ? मी म्हटलं, “ मला क्षमा कर आई. मी बोलले नाहीं, तरी तूं 
बाळासाहेबाना इथं ठेऊन घेतलंस याचं मला वाईट वाटत होतं-तुला 
ते कळलं नि तूं माझ्या डोळ्यांत अंजन घातलंस, हँ फार चांगलं झालं. 
हालअपेश झाल्या तरी चालतील, त्रास झाला तरी चालेल, पण मी 
बाळासाहूबांच्या आईविषयी कधींही कृतघ्न होणार नाही. ” 

माझी पाठ थोपटून आई म्हणाली, “ तरी म्हटलं माझी वेणू आहे. 

तिच डोळे ओले झालेले दिसले; माझ्याही डोळ्यांतून पाणी आल्या- 
बांचून राहिलं नाही, 

बाळासाहेबांनी आपलं बिऱ्हाड आमच्या घर्र थाटलं, जेवणाच्या 
वेळेखेरीज ते बहुतेक घरीं नसत. रात्रीं झोपायला येत तेव्हढेच. 
आपण काय करतो, कुठं जाता, नोकरीचा प्रयत्न कुठं करीत आहेंत, 
याचा कित्येक दिवस त्यांनीं थांगपत्ता लागूं दिला नाहीं. आईने किंवा मी 
त्यांना कांही विचारल नाही, 

आमच्या गांवचे नाझर आमच्या घरी येऊन रहात असत त्यावेळी 

५३ 


वेणू वेलणकर 


कुणी कांही तक्रार करीत नसे. पण बाळासाहेब येऊन राहिल्यापासून 
इनामदार-जेवणारांत थोडी थोडी कुजबुज सुरू झाली. मी आतां मुलगी 
या सदरांत राहिले नव्हते. एवढी मोठी वाढलेली मुलगी घरांत असतांना, 
एक परका तरूण सत्यभामाबाईनी आपल्या घरी आणून ठेवावा हॅ 
आईबद्दल अभिमान बाळगणाऱ्या जवणकऱ्यांना रुचलं नाहीं. दिनू- 
भाऊनीं तर एक दिवस आईला उघड विचारलं. तेव्हां ती म्हणाली, 
€ तुम्हांला माहीत नाहीं दिनूमाऊ, त्यांचे माझ्यावर अनंत उपकार 
आहेत. त्यांच्या कृपेनं आज हा एवढा खाणावळीचा पसारा थाटला 


गेला आहे. त्यांच्या प्रसंगाच्या वेळीं जर मी त्यांना हात दिला नाहीं तर 
देवाच्या घरी मी कृतभ़न नाहीं का ठरणार?” 


दिनूमाऊ म्हणाले, “ त॑ खरं आहे. पण थोडस लोकाचाराकडे 
पाहिले पाहिजे. तुम्ही एकट्या बाई माणुस, ही वाढलेली मुलगी घरांत, 
हा एक परका तरूण आलिला, वर्तेनानं फारसा सभ्य दिसत नाही, 
दिसतोही अगर्दींच मवाली-आणि म्हणतात आहेही अगर्दी व्हंगबॉड. 
कुठल्या सर्कशीत होता ! हीं नाटकासक्शीतलीं माणसं आम्हां सभ्य 
लोकांना तरी पाहिल्याबरोबर संडायास्पद वाटतात. उपकार असले तरी 
ते फेडण्याचे माग आहेत. दुसऱ्या कुठं तरी त्यांना स्वतंत्र खोली पाहून' 
द्या; पण तुमच्या घरी ठेऊन घेऊ नका. तुमची बेअबू होईल तसंच 
खाणावळीचंही नांव जाईल. लोक चचा करू लागले आहेत म्हणून 
मुद्दाम तुमच्या कार्नी घातल, आम्ही झाला तरी परकी माणसं. सत्तेनं 
तुम्हांला सांगतां यायचं नाहीं. पण इतके दिवस तुमच्या घरी जेवतो 
आहोंत, घरच्या माणसासारखंच तुम्ही आम्हांला वागवतां, म्हणून 
लोकांनी तुम्हांला नांबं ठेवलेली आम्हांला खपणार नाहीत म्हणून एवढे 
बोललो, पुढे तुमच्या तुम्ही मुक्‍त्यार आहांत. 

दिनूमाऊंच्या बोलण्यांत कठोरपणाच जास्त होता. आपल्या बोल- 
ण्याचा माझ्या आईच्या मनावर परिणाम व्हावा, तिनं बाळासाहेबांना 

ष्‌ ४ 


माझं वैभव कुणाचं ! 


आपल्या घरांतून दुसरीकडे कुठं तरी नेऊन ठेवण्याची व्यवस्था करावी, 
म्हणून ते शाक्य तितक्‍या तुटक वाणीनं बोलत होते. 

आईच्या मनावर त्या भाषणाचा परिणाम झाला. ती विचारांत 
पडली, ते गेल्यावर ती म्हणाली, “ तुला काय वाटतं वेणू ! ते म्हण- 
तात तसं करायचे का ? एकंदरींत त॑ कठीण आहि. आपल्या घरीं येऊन 
राहा म्हणून आपणच त्यानां सांगितल. आतां तुमच्यासाठी दुसरी खाली 
घतली आहे असं म्हणून दुसरीकडे त्यांना घालवून द्यायला असं कारण 
काय दाखवणार आपण ? इथली जागा आहे तशीच राहाणार, ते गेले 
तरी ती मोकळीच राहाणार आहे. त्यांना चमत्कारिक नाहीं का 
वाटायचं!” 

मला मोठा प्रश्न पडला. काय उत्तर द्यावं हें मला चांगलंसं सुचेना. 
तरीही मी म्हटलं,“'तें तुझं तूंच पहा आई. मला त्यांत कांही कळत नाहीं. 
त्यावेळी बाळासाहेब मला त्रास देत असत पण इथं आल्यापासून ते 
कर्धी माझ्याशी दोन शब्दसुद्धा बोलले नाहींत. औपचारिक कसं आहे, 
काय आहे, असे देखील कर्धी उद्गार काढीत नाहीत. किंबहुना मी 
त्यांचा ओळखीची आहे असं सुद्धां वाटत नाहीं; मग मी काय 
म्हणून त्यांच्याबद्दल तक्रार करू ! पण लोकांत कुजबूज चालली आहे हई 
मात्र खरं आहे. शाळेतसुद्धां मला ऐकू येतं. किचकटपणानं आडवेतिडवे 
डोळे मिचचकावून माझ्या बरोबरीच्या मुली खवचट प्रश्रही करतात. मला 
आश्चर्य वाटतं ते हेंच, कीं माझ्या घरच्या उठाठेवी या लोकांना कां ! 
माझ्या घरी मी दहा माणसं आणून ठेवीन. तिथं लोकांच कांही 
खर्चत तर नाहीं! 

:“अजून तुला पुष्कळ कळायचं आहे-वेणू.”' आई म्हणाली,''स्वतः- 
च्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं पण दुसऱ्याच्या डोळ्यांतलं कुसळ 
फुंकरायला लोक सदा टपलेले असतात. इतकंच नव्हे, तर नसलेली कुसळे 
शोधून काढायला अगर्दी डोळ्यांत तेल घाढून स्त होतात. 

५द्‌ 


वेणू वेलणकर 


भी ही अशी अनाथ अपंग. पुरुष माणसाचा आधार नाहीं. आपल्या 
पायांवर उभी राहणारी बाई पाहिली म्हणज या लोकांचे डोळे 
फाटतात. त्यांत हा खाणावळीचा धंदा. खाणावळवाल्यांबद्दल लोक काय 
बोलतात, काय म्हणतात, हे तुला एव्हांच कळायचे नाहीं. पण या 
अशा दिव्यांतून तावून सुलाखून बाहेर पडायचा मी प्रयत्न करते आई; 
नि तिथं बाळासाद्विबांच्या रूपानं हे माझं दुदैब उभं राहिलं त्याला मी 
तरी काय करूं! कसं त्याला जा म्हणूं £ स्वर्गीतून त्या बाइने माझ्या- 
कडे पाहिले तर ती काय म्हणेल £ ऐकलंस वेणू , काय व्हायचं असेल 
ते होईल पण त्या माउलीच्या आठवणीसाठीं तरी तिच्या पोराला मी 
माझ्या घराबाहेर घालवणार नाहीं. 

आईचा मला मोठा अभिमान वाटला. आजपर्यंत मला असं बाट, 
कीं माझी आई म्हणज एक व्यवहारी बायको आहे. पण तिला देखील 
अंतःकरण आहि, कृतज्ञतेची जाणीव आहे, हे पाहून माझे हृदय आने- 
दान भरून आलं. 

त्या दिवर्शी मी मुद्दाम सदारिवरावांना भटायला गेलें नि झालेली 
हकीकत त्यांना सांगितली. त्यांचंही मत जबळ जवळ दिनुभाऊसारखंच 
पडलेले पाहून मला वाइट वाटलं. सुलाचनेच्या आईला मी विचारलं 
पण ती ठाम असं कांहींच मत दइना. ती म्हणाली, “' जगाच्या व्यव- 
हारांत आम्हां बायकांनां काय समजतं ! पुरुषांची नजर मोठी तिखट 
असते. ते चोहोकडे वावरत असतात. चार टक्केटोणपे खायची त्यांना 
सवय असते. बऱ्यावाईट प्रसंगांतून मार्ग काढलेले असतात ते पुरुषांनी. 
बायकांचे काय-हाताला हात लावून त्यांच्यावरोबर चालायचे-- तशीच 
मी आपली चालतं. माझ्या मनाला वाटतं, कीं तुझी आई म्हणते तेंच 
बरोबर; पण हं बायकी मत हिशेबांत घेणार कोण £ आतांच यांर्नी काय 
सांगितलं ते ऐकलंस ना! वाढलेली मुलगी घरांत असतांना संशयास्पद 
वर्तनाचा माणूस घरांत आणून ठेवणं त्यांना पटत नाहीं असं ते म्हणाले, 

५६ 


माझं वैभव कुणाचं ! 


त॑ मलादेखील बरंचसं खरं वाटतं. यांतून माग काढायचं काम आहे 
तुझ्या आईचे. पुरुषी बाणा पत्करला आहे कीं नाहीं तिनं ! कुणा पुरु- 
घाच्या आधारावांचून आज लाखांचा व्यवहार करते आहे, ती आमच्या 
पेक्षां कांहीतरी जास्त बुद्धी आढ म्हणूनच ना ! तेव्हां मी तुला सांगते, 
तूं तिच्या निकालावरच अवलबून राहा. स्वतः यावर कांहीं मत देऊ 
नकोस कीं नको ग्हणूं नकास. तिची ती मुखत्यार आहे तशीच तिची 
ती खंबीर आहे. तूं यांचंही ऐकू नकोस आणि दिनूभाऊंचंही ऐकू 
नकोस. काय होईल तें पाहात स्वस्थ राहा म्हणजे झालं. ” 

सुलीच्या आईचं ते गुळमुळीत उत्तर ऐकून मळा तिटकारा आला. 
स्वतः विचार करायची या बाईला संवयच नार्ही का १ ' हे म्हणतात ते 
ही खरं, ते म्हणतात तेंही खरं, नि खखतःला वाटतं तेव्हढेच मात्र 
अनिश्चित अभ कां या बाईला वाटावं ! एव्हढी आज पांच सात मुलं 
झालेली कर्वीसवरती बाई ही, तिला एव्हृढ्याशा बाबतींत मत देतां येऊं 
नय !---' ते काय म्हणतात ऐकलंस ना? ? असं म्हणून हिनं स्वस्थ 
राहावं ! हिला कांहीं स्वामिमान नाहीं का ! 

हँ सवे भाषण चाललं असतां सुलोचना तिथंच होती. ती माझ्या- 
पेक्षा चांगली दोन वर्षानी मोठी होती. मी तिला विचारले, “' आतां 
तूंच सांग सुळे, हें सारे कांही तू ऐकलंस, तुला काय वाट्तं?” 

सुलोचना क्षणभर विचारांत पडल्यासारखी दिसली. मी पुन्हां विचा- 
रलं तेव्हां ती म्हणाली, “ यांत मी काय सांगावं बाई £ ही कोण कोण 
माणसं काय काय म्हणत आहेत तेच मला कळत नाहीं, तुम्ही त्यांच्या 
घरीं पूर्वी राहिलां होतां. एका काळीं ते तुमचे मालक होते, तेच 
प्रसंगीं आज तुमच्या घर्री येऊन राहिले तर लोकांना कां वाईट वाटावं 
हेच मला कळत नाहीं. लोकं नांवं ठेवतात हे मी ऐकते आहे. पण कां 
नांबं ठेवतात ते मला माहीत नाही. बाधा हे असं म्हणतात, आई ते 
तसं म्हणत. मी अजून चांगला विचार करून पाहीन आणि पुन्हां 

५७ 


बेणू वेलणकर 


क्षी तरी सावकादपणें आईबरोबर आणि बाबांबरोबर चर्चा करीन 
नि मग उद्यां तुला सांगेन, 

सुलोचनेचा तो दुबळेपणा पाहून मला तिची कौंव आली. स्वतंत्र 
बिचार करण्याची संवय मला लागलेली असल्यामुळे सुलोचनेन्या या 
परबुद्धीन चालण्याच्या वृत्तीबद्दल मला तिच्या आईचा जितका 
तिट्कारा आला तितकाच तिचा तिट्कारा आला, असं म्हटलं असतां 
वावगं होणार नार्ही. 

सुलोचना माझी जिवाभावाची मेत्रीण होती. पण ती दुबळी होती 
म्हणूनच माझी मेत्रीण झाली होती याची ज्या वेळीं मला आठवण 
झाली, त्या वेळीं तो तिट्कारा आपोआप नाहींसा झाला. 

आयुष्यांतल्या एका नव्या प्रांतांत आपल्याला आतां पाऊल टाकावं 
लागणार आंहे नि त्यांत खांचखळगे भर्यकर आहेत, ते पार होऊन 
जाण्यासाठी आपल्याला सावधगिरी बाळगली पाहिजे, एव्हढं मात्र मला 
या साऱ्या प्रसंगावरून कळून चुकले. 


ष्‌ र्ट 


प्रकरण ८ 
बाळासाहेब माझे नोकर झाले 


मी मनाशी निश्चय ठरवला --काय होईल ते होवो, कोण काय 
म्हणतील ते ग्हणोत-पण या वादळाला चांगलंच तोड द्यायचं. 

बाळासाहेबांचा दिनक्रम जरी पूर्वीसारखाच सुरू होता तरी लोकांच्या 
खजाळ्या मात्र भयंकर वाढल्या हत्या. भर पगं्तावर चचा करतांना 
माझ्यावर आणि माझ्या आईवर उघड उघड शिंतोडे उडवले जात 


होते.---मला संशय होता, की खाणावळींतर्ली नोकर माणसं देखील 
या कार्मी सामील हातीं. 


मी ऐकत होते. जवणार एक गृहस्थ म्हणत होते, “ अहा, इं 
असंच चालायचं. हा सारा कली माजला आहे. खाणावळाींचे कशाला 
नांव घेतां. मुंबईत बाहेर काय चाललं आहे, ते पाहा. एव्हढ्या एव्हद्या 
पोरी अगदीं एकेकठ्या फिरत राहातात कीं हो ! त्यांचे मित्र भसतात 
म्हणे ! कॉलेजांत शिकतात कीं नाही ! पोरापोरीना एकाच जागीं शिक- 
वतात तेव्हां मेत्री ही जडायचीच--तेव्हां असले ते मित्र घेऊन 
फिरायला गेल्याशिवाय जगतां कसं येईल अलिकडच्या पोरींना ! या 
पूर्वीच्या आमच्या आया आज्या होत्या त्यांचे कुठं मित्र नव्हत ते! 
त्यांना कुठं फिरायला जायला लागत नव्हतं ते! अहे काळ बदलला 
आहे. आम्ही तरी कुठं म्हणतो, अगदीं घरांतच गाढून राहा म्हणून; 
पण पोरीनी जायचं तर पोरीपोरींनी जावं. चांगल माणसासारस्व जावं. 

५.९ 


वेणू वेळणकर 


अहो तो काय पदर ! पुरुष पूर्वी उपरणं घेत असत. आतां त्यांनी त 
टाकले, तेव्हां या कारट्या आतां उपरण्यांसारवे पदर घेऊं लागल्या 
आहेत. आणि ते उडत असतात वाऱ्याने, स्स्त्यावरून मुली चाळू 
लागल्या म्हणजे मुंबईच एवढे मोठे स्स्तेदेखील लहान वाटूं लागतात. 
बाहेर जिथ असं आहे तिथं खाणावळीत काय ! तरी बरं. माधवाश्रम, 
एऐंपायर हॉटेल, आर्य-पथिकाश्रम यांच्यासारखी इथं राहायची सोय नाहीं. 
तशी सोय असती तर शेजारीं मर्टागटी होम उघडावे लागलं असते. 
काय करतां --चांगलं जवण असतं म्हणून इथं येतो एव्हढंच. डोळ 
झाकून चार घास गिळायचे आणि जायचं आपल्या कामाला. आपल्याला 
काय कर!यचं आडे या उठाठेवींशी ? 

दुसरा म्हणत होता, “' चुकतां आहांत तुम्ही मनोहरपंत, आपल्याला 
काय करायचं आहे, असं म्हणून चालायचे नाहीं. आपण इथं येती 
आहोंत--उद्यां लोक आपलं नांव घ्यायचे, मुंबईत कांही तोटा नाही 
स्वाणावळींना ---' 

तिसरा एक म्हणाला. ''तुरम्ही माणसं आहांत, कीं जनावरं आहांत ६ 
असा झाला काय अनर्थ, कीं अगदीं खाणावळ सोडण्यापर्यंत प्रसंग आला? 
कुणाचं चांगलं झालेले पाहावत नाहीं तुम्हाला, एव्हढेच खरं. इतिहास 
माहीत आहे का तुम्हांला ! त्यांच्या घरीच त्यांना पहिल्यांदा आश्रय 
मिळाला होता. आतां त्या बरिचाऱ्यावर प्रसंग आला. नको त्याला 
आसरा द्यायला? आगि त्या पोरीचं नांव कशाला गोवतां या भानगर्डीत ! 
ती कधी कुणा तुमच्या वाटेला गेली आहे ! कशी चोख आहे आपल्या 
अभ्यासांत ! माझ्या एका मित्राची मुलगी तिच्याच शाळेंत असते. ती 
तिची केव्हृढी तारीफ करते !--बरं, एव्हढं असून अभिमान बाळगते 
आहे का ती पोरगी ? एव्हढस॑ कुठं शिक्षण मिळालं तर ह्लींच्या 
पोरी शहोफारून जातात. पण ही पहा. गर्दी झाली की, स्वतः खोचण 
-खावून वाढायल[ सरसावते. छंमर माणसांची पंगत असली तरी क्षी 

"ही... 


बाळासाहेब माझे नोकर झाले 


कुणाची खोटी होऊं देत नाहीं. म्हणून मला त्या पोरीचा अभिमान 
वाटतो ---” 

जनूमाऊ म्हणाले, “' अरे, जेवणावर तुम्हांला दुसरं नाहींच का 
कांही सुचत ! कांहीं राजकारण बोला, म्युनिसिपालिटीच्या हकिकती 
बोला, नाही कांही सुचत तर नाटकासिनेमाच्या गोष्टी बोला. गटारं 
कश्याला उपसतां ही !--” 

पहिला ग्रहृस्थ म्हणाला, “' गटारं कां उपसता ? अहो, गटार 
आहित, त्यांच्यांत घाण होते, म्हणूनच ना उपसता ! इथं गटारं बांधार्वी 
कां ? बांधली तर त्यांत घाण करावी कां ! आणि घाण केली तर ती 
दुसऱ्याच्या नजरेला यायच्या पूर्वी साफ करून टाकू नये कां !---” 

तीं भाषणं ऐकून त्या लोकांची कॉव करावी कीं आपल्या मनाची 
करमणूक करून ध्यावी, हेंच मला कळेना, शून्यावर उभारलेले हे मनोरे 
आजूबाजूला सावली पाडीत होते, तरी देखील आज ना उद्यां कोसळून 
पडणार होते यांत संशय नव्हता, पण आज त्यांचा परिणाम होत होता. 

चढावाचं धोरण स्वीकारायचा मी नेश्चय केला--नि आईला 
तसं मी सांगितलंही. 

संध्याकाळीं बाळासाहेब ज्यावेळीं जेवायला आले त्यावेळीं त्यांना 
वाढायला मीच मुद्दाम गेलें. अथीतच त्यांच्या पंगतीला इतर मंडळी 
होती त्यांना मी वाढीत होतेच. वाढीत असतांना मी विचारलं, 
£ काय बाळासाहेब, कांही लागला का नोकरीचा सुगावा ? का रोज 
अजून अर्जच करीत आहांत £--” 

शेजारचे दुसेर ग्रहस्थ म्हणाले, “ अहो, नोकरी काय अशी वाटेवर 
पडली आहि ! बी. ए. एम्‌. ए. झालेल बसले आहेत फांक्या मारीत. 
परवांच एम्‌. ए. एलएल. बी झालेला एक मनुष्य-शाटे हॅन्ड टाइपिंग 
देखील येत होतं त्याला-तीस 'रुपयांवर राहिला आहे तीस रुपयांवर ! ” 

६१ 


वेणू वेलणकर 


& खरं आहे. ” बाळासाहेब म्हणाले, “' जिथं जावं तिथं सर्टिफिकिटं 
विचारतात. पूर्वी मी नोकरीच केली नाहीं कुठं, तर सर्टिफिकिट आणा- 
यचे कुठून ! मी म्हटलं, आतांच काय ती परीक्षा घ्या. पण कुणी ऐकत 
नाही. आतां एक उपाय योजला आहे. फेरीवाल्याचा धंदा करणार आहे. 

पंक्तिवरचे सगळे लोक मोठमोठ्याने खा खो करून इंसले. 

६ हृंसतां काय ? ” बाळासाहेब म्हणाले, ““ खरोखरच फेरीवाला 
बनणार आहे. परवां रस्त्यांत एका फेरीवाल्याशीं बोलत उभा होतो, 
त्याला विचारली त्याची कमाई नि मनाशी निश्चय केला, कारकून म्हणून 
दहा वर्ष राहीला तरी इतकी कमाई व्हायची नाहीं. मग कां फेरीवाल्याचा 
घेदा करूं नये ?--? 

८ अल्बत !” एक जण म्हणाला, “'त्यांतून विशषतः कापडाचा करावा, 
दगड्यांचा करावा. दुपारी जावे चाळीतून फिरायला-बजरं का-दुपारी 
जावं. व्यापारही होईल, चैनही होईल--- ” तो ग्रहस्थ मोठमोठ्यानं 
इंसला. मला अशी चीड आली होती, की जाऊन त्याच्या थोबार्डीत 
लगावावी. पण तो राग गिळून मी म्हटलं, '“दुपारी कशाला जायचं !--- 

माझ्या प्रश्नाने तो चमकला. “ ते॑असं आहि ” तो म्हणाला, 
६८ जवणंखाणं सारी झालेलीं असतात. दुपारच्या प्रहरी पुरुष माणसं 
नसतात घरांत-आणि बायकांना कपड्यांची विशेषतः हाव फार. 
पुरुषांना जशी परीक्षा असते तशी बायकांना थोडीच असते ! तेव्हां 
व्यापार करायला हीच वेळ--हो-हो-हवो! ” 

“६ असं का! ” मी जरा खोचून म्हटलं, “' इथंच तुमचं चुकलं. 
पुरुषांनाच कपड्याची पारख नसते. जुन्या काळच्या ध्या किंवा आजच्या 
ध्या-बायकाच कापड खरेदी करीत आल्या आहेत. आमची आई सांगत, 
कापडचोपड खरेंदी करायचे असलं तर पूर्वीच्या काळी लगड्यांची बासनं 
बांधून पुरुष घरी दाखवायला घेऊन येत असत. बायकाच त्यांच्या किंमती 
ठरवित, त्याच पसंत करीत. पुरुष नुसतं हमालाचे काम करीत. हर्ली 

८२ 


बाळासाहेब माझे नोकर झाळे 


तर बायकाच दुकानांत कापड घेतात. चांगली पारख असते त्यांना 
मालाची. उद्यां चला माझ्या बरोबर दुकानांत. तुम्ही कापडाची किंमत 
करा नि मी करते. दुकानदाराला सांगू परीक्षा ध्यायला . 

“६ नाही, तसं माझे म्हणणं नाहीं, ” तो ग्रहृस्थ म्हणला, ““बायकांन 
देखील कापडाची परीक्षा असते; नाही असं नाही. पण साऱ्याच बायका 
कुठं इतक्या हुषार असतात ! भोळवट बायकाच नेहमींच्या जगांत जास्त 
आढळतात. त्यांना फसवायला फेरीवाल्यांनी चाळींचाळीतून फिरलं 
म्हणजे बरं साधतं. फसवल्याशिवाय कांही व्यापार होत नाही. अहो 
व्यापारी एवढे जे भ्रीमंत होतात ते काय मोठ्या सचोाटीनं ! तुम्ही उगीच 
विपर्यास केलात माझ्या बोलण्याचा. तसं कांही म्हणण्याचा माझा 
उद्देश नव्हता. 

भाषणाचा पूर्णविराम झाला. पुढं कुणीच कांहीं बोललं नाही. 

बाळासाहेब ज्यावेळीं आपल्या खोलींत जाऊन बसले त्यावेळीं मी 
तिथं गेले. मी आलेली पाहतांच ते दचकले. मी विचारलं, ““ खरोख- 
रच का फेरीवाल्याचा धंदा करणार आहांत ? ” 

“आहे असा विचार-पण फेरीवाला व्हायला देखील भांडवल पाहिजे. 
दुसरं असं आहे, मनांत पुष्कळ येतं; पण कोणतीही जगाविरुद्ध गोष्ट 
करायला माणसाच्या अंगी बेछूटपणा असावा लागतो. आचरटपणानं मी 
आयुष्य घालवलं आहे. मला वाटतं, तेवढा बेछूटपणा माझ्या अंगीं 
आहे. पण जसजसा विचार केला तसतसं वाटलं, कीं उपास करावे लागले 
तरी बेहत्तर-पण इंजिनीयरसाहेबांचा मुलगा फेरीवाल्याचा धंदा करतो 
आहि, असा बभ्रा व्हायला नको. 

५६ मग काय करणार आहांत. ! ” 

£ तोच विचार करतो आई. आज एवढे महिने तुमच्याकडे राहिलो, 
तुम्ही आपलेपणानं वागवतां आहांत म्हणून संकाच न धरतां राहिलो. 
पण मन खाल्ल्याशिवाय राहात नाहीं, इतक्या दिवसांच्या जवणाची मी 

६२ 


वेणू वेळणकर 


तुम्हांला एक दमडी सुद्धां दिली नाही. मला नोकरी मिळाली म्हणजे 
सारी फेड करून टाकीन. पण नोकरीच मिळत नाहीं त्याला मी 
तरी काय करू? ” 

६ बुरं नोकरी मिळाली तर पत्कराल का? ” 

“६ तेवढ्यासाठींच तर आलो आहे ना इयं?” 

“६ तुम्ही पाहतां आहांत, कीं हा आमच्या खाणावळीचा पसारा दिव- 
सैंदिवस वाढत चालला आहि. सांरे व्यवहार आई पहाते--ती तशीच 
खंबीर आहे म्हणून ' तिला सारं जमून जातं---पण तिने इतके कष्ट 
करावे असं मला वाटत नाहीं. इथली व्यवस्था पहायचे काम पत्करतां 
का ! जेवून खाऊन दरमहा पन्नास रुपये पगार देतां येईल असं आई 
म्हणते. राहण्याची जाग आहेच ही--ती कांहीं हिशेबांत घरायची नाहीं. 
बाटले तुम्हांला तर इथं रहा. वाटलं तर दुसरीकडे रहा-- 

बाळासाहेब विचारांत पडल्यासारखे दिसले. ते पाहून मी पुन्हां विचा- 
रलं, “ कां? अगदी संकोच धरू नका. पन्नास रुपयांची नोकरी मिळणं 
देखील कठीण आहे हलींच्या दिवसांत. 

£ खरं आहे. खरं आहे. ” मान खाली घालीत बाळासाहेब म्हणाले, 
“६: घण जरा विचार पडतोा--” 

6 विचार कसला पडता. कफेरीवाल्याचा धंदा करणार होतां ना 
तुम्ही ? कापडाची गासडी पाठीवर मारून चाळीचाळींतील जिने उलथ- 
णार होतां ना तुम्ही ! मग खाणावळीची व्यवस्था पाहायला संकोच 
कसला वाटतो तुम्हांला ! आतां एवढं मात्र खरं, कीं व्यवस्था आई ठेवते 
तशी राहिली पाहिजे. तितक्याच करड्या अमलानं वागलं पाहिजे. 
नोकरांशी बरं का ? जेवायला येणाऱ्या लोकांशी तितक्‍याच प्रेमळपणानं, 
तितक्‍याच कळकळीनं वागले पाहिजे, आई कशी वागते हें पाहीलं 
नसलंत, तर चार पांच दिवसपर्यंत नुसते पहात रहा नि नंतर 

६४ 


बाळासाहेब माझे नोकर झाळे 


पत्करा. आतांच नका उत्तर देऊं पाहिजे तर. सगळा विचार करून 
नंतर काय तै ठरा. 

उत्तराची अपेक्षा न करतां मी तिथून निघून गेलें. माझं मलाच मोठं 
समाधान वाटलं. आईला ही हकिकत मी मागाहून सांगितली. आईला 
कांहींच न बिचारतां मी आपल्या अधिकारांत ही गोष्ट केली होती; पण 
आईनं देखील माझी योजना ऐकून जेव्हां माझी पाठ थोपटली, तेव्हां 
माझा आनंद गगनांत मावेनासा झाला. | 


ष्‌ ६५ 


प्रकरण ९ 
सी मिरवू लागलें 


दुसऱ्या दिवशीं सकाळी बाळासाहेब माझ्या आईजवळ आले आणि 
म्हणाले, “काल वेणूताईनीं मला सांगितलं ते तुम्हांला विचारूनच?---” 
आईनं मान हलवली त्यावेळीं ते पुढे म्हणाले, “' मला वाटतं 
एकदां प्रयत्न करून पहावा, ह्या धंद्याची मला कांही कल्पना नाही. 
इथ मी जेवायला येतो. खरा पण व्यवस्था कशी ठेवली जाते इं 
मी पाहिलं नाही. व्यवस्था ठेवणं म्हणजे काय करणं, याचा देखील मला 
अजून अंदाज येत नाहीं. अशा परिस्थितींत मला नोकरी द्यावी असं 
तुम्हांला वाटतं का? ” 

त्यांचं माषण अगर्दी ओशाळवाण्या पद्धतीनं चालले होतं. मला 
त्यांची कींव आली, आई काय उत्तर देते याकडे माझं लक्ष हेत. माझ्य! 
आणि तिच्या विचारांत फरक पडता तर--पण तशी वेळ आली नाही. 

आई म्हणाली, “' ब्यवस्था ठेवणे म्हणजे तसं पाहिलं तर कठीण 
नाही ---पण बारकाईनं विचार केला तर तितकंसं सोपं नाहीं. हजार 
प्रकारचीं हजार माणसं इथे येतात. प्रत्येकाच्या तक्रारी वेगवेगळ्या. 
प्रत्येकाच्या संवई वेगवेगळ्या, अशा साऱ्या माणसांशी त्यांचीं मनं न 
दुखखवतां वागायचं म्हणजे एकंदर्रीत बिकट काम आहे. त्याला थोडा 
असुमव लागतो. पण डोकं शांत ठेवलं, शब्द गोड ठेवला नि 
अविचार केळा नाहीं म्हणजे त्यांत मुळींच कांहीं कठीण नाहीं. पण 

५६ 


मी मिरवू लागरळे 


एवढे एक मात्र झाले पाहिजे-वेणू म्हणाली तेंच खरं-तुम्ही चार सहा 
दिवस नुसतं पहात जा, त्यावरून तुम्हांला अंदाज येईल. ” 

बाळासाहेब अस्वस्थ झाल्यासारवे दिसले, कामाचे जोखीम त्यांना 
कळत असावं म्हणूनच ते विचारांत पडले. आई पुढं म्हणाली, “' कां! 
विचारांतसे पडलांत ? ” 

£ तसं कांही नाही '' बाळासाहेब म्हणाले, “' कुठं तरी नोकरी 
करायची हं जेव्हां ठरलं, तेव्हां ती नोकरी कशी करायची हं सांगायला 
भिऊन कांही चालणार नाहीं. सर्क्शींत मी कांही दिवस घालवले 
आहित. वाघ, सिंहृ आणि अस्वलं यांच्याही सहवासांत राहिली आहे. 
तेव्हां इथे तितकंसं कठीण जाईल असं वाटत नाहीं. 

बाळासाहेबांच्या त्या भाषणाला आई इंसली आणि म्हणाली, “' वाघ 
तिंहांना वागवणं सोपं पण ही. माणसं फार कठीण-ऱ्यांतून भूकाळु 
माणसं तर फारच कठीण, कशा एकेकाच्या एकेक तक्रारी असतात 
याची कल्पना तुम्हांला यायची नाहीं. हे इजारी माणसांचं कुदुंब, मी 
आज इतकीं वष चालविर्त आहे. कुटुंबांत चार माणसं असलीं, तर 
माणूस कातावून जातं. चार मुलं हट्ट करूं लागली तर आदळ आपट 
करतात. इथं का आदळ आपट करून भागणार आहे एक इान्द वांकडा 
गेला तर माणसं चुटकीसरशी निघून जातील. या मोठमोग्या खाणावळी 
चालल्या आहेत-पण तिकडे न जातां माझ्या खाणावळींत एवढी माणसं 
येतात, तीं कां, एवढं नीट लक्ष लावून पहा म्हणजे झाले--' 

त्या दिवसापासून बाळासाहेब जवळ जवळ कामावर रुजू झाले. पैसे 
देण्याघेण्याच्या कामावर दोन कारकून होते. ते आईच्या हाताखालीं काम 
करायला नाराज नव्हते. पण हा कुणी बाहेरचा माणूस मॅनेजर म्हणून 
गेतो आहे हँ जव्हा त्यांना कळलं, तेव्हां त्यांच्यांत चुळबुळ सुरू झाली. 

बाळासाहेब निबुद्ध नव्हते. आठ दिवसपयंत त्यांनी सारख निरीक्षण 

६७ 


वेणू वेळणकर 


चालवलं होतं. आठ दिवसांनंतर आईन चार्ज सोडला आणि बाळासाहेब 
व्यवस्था पाहूं लागले, 

कारकुनांच्या कारवाया सुरू झाल्या, जेवायला येणाऱ्या लोकांना 
चिथावणी द्यायची त्यांनीं सुरवात केली. उगीचच खुचपटं काढून 
लोक बाळासाहेब्रांशीं भांडण करूं लागले. मिळालेला उपदेश पूर्णपणे 
अमलांत आणण्याची बाळासाहेबांनी तयारी ठेवली होती, असं त्यांच्या 
वर्तनावरून दिसलं, कुणी कांहीं बोलले तरी त्याच्या उलट उत्तर म्हणून 
करायचं नाहीं, अगदीं तोंडांत खडीसाखर ठेवल्यासारखे बोलायचं, अशी 
शिस्त ठेवल्यामुळे त्या कारवायांना कांही यद आले नाही. 

आईला विश्रान्ती मिळूं लागली आणि तेवढ्यामुळंच तिला माझ्या 
योजनेबद्दल अभिमान वाटला. पन्नास रुपये मनेजरला देणे म्हणजे तिच्या 
हातचा मळ होता. दानधर्माठा देखील पन्नास रुपये ती सहज काढून देत 
असे, सत्तेच्या नोकराला पन्नास रुपये पगार द्यायला तिला मुळींच 
कठीण गेलं नाहीं. पुन्हां पुन्हां तिला वाईट वाटे, ते एकाच गोष्टीबद्दल. 
ती मला म्हणे, ''देवाच्या घरीं हे कसं रुजू होईल हें कांही मला कळत नाही, 
आम्हीं त्यांच्या घरीं नोकर होतो. खरं पाहिलं तर त्यांच्याच भांडवलावर 
हा धंदा उभारला आहे. अगर्दी तोंडदेखलं बोलायचं म्हणून नव्हे-पण 
या खाणावळीची मालकीच जिथं त्यांची आहे, तिथं त्यांना दरमहा पन्नास 
रुपये दिले म्हणजे कांहीं मोठंस॑ झालं असं नाहीं. तूं पन्नास रुपयेच 
का म्हटलेस ? ” 

आहईेच्या त्या भाषणाचं मला इंसूं आलं, “कां!” मी म्हटलं, ''तुझ्या 
मनांत जास्त द्यायचे होते का ! जास्त देणं तुला अशवक्य नाहीं हे मला 
माहीत आहे; पण कुणा माणसाला केव्हां आणि किती पेसे द्यावे, हँ 
ठरवावं लागतं, पन्नास रुपये देखील देऊं नयेत असं पहिल्यानदा माझ्या 
मनांत हेतं. इथं जेवणं फुकट मिळतं आहे, रहायला जागा फुकट 
आहि. बाळासाहेबांसारख्यांच्या हातांत पन्नास रुपये खेळूं देणं देखील 

८ 


मी मिरवू लागल 


इष्ट नाही. पण अगदींच वाईट दिसतं म्हणून मी पन्नासाचा आंकडा 
सांगेतला. 

आई माझी पाठ थोपटून म्हणाली, '* आतां मला कांही भीति 
चाटत नाहीं. आतां मी मेले गेळे, तरी माझी खाणावळ कांही बेद 
होणार नाही. ” 

आईच्या उद्वारांचे मला कोतुक वाटलं. मी बरी. ए.; एम्‌. ए. 
होण्याची स्व बाळगून बसले होते आणि मी तिची खाणावळ चाल- 
वीन म्हणून आई अपेक्षा करीत होती ! 

थोडासा विचार करून मी पाहिला-त्यावेळीं मला वाटलं, बी. ए.; 
एम्‌. ए. होऊन तरी मी काय ध्वजा लावणार! चांगलेस लिहितां येत नार्ही 
तरी सुद्धां हा धंदा आईनं एवढ्या मोठ्या प्रमाणांत चालवला. जागेचं 
भाडं दोनशे रुपये होतं. महिन्यांत चांगला दह्या हजारांचा व्यवहार 
होत असे. एव्हढा मोठा धंदा चालवणारे पुरुष तरी कितीसे अहित? 
अभिमानासाठी म्हणून बी. ए. व्हायचं पण आईचाच धंदा पुढं चाल- 
वायचा, असा मी त्याचवेळी मनाशी निश्चय केला. 

बाळासाहेत्रांना मनेजर नेमल्य़ापासून कुत्साकुमारी चवताळली होती. 
भर पंगतीवर वाटेल तर्शी अचकट भिचकट विधाने करून माझी टवाळी 
करणं, हा आमच्याच घर्री जवणारांचा विषय होऊन बसला होता. 
शाळेत देखील बाजूबाजूनं माझ्या कानांवर अशाच गोष्टी येत, पण 
ऐकायला मला फुरसत नव्हती. माझी परीक्षा जबळ आली होती. 
नापास व्हायचं नाहीं असा मी निश्चय केला होता. हली मी वाढायला- 
ही फारशी जात नस. 

मी वाढायला जात नसे ती मी अभ्यासांत गुंतून रहात असे म्हणून, 
पण त्याचाही बिपर्यास करण्यांत येत होता. कुणी कांही बोललं तरी 
त्याच्याकडे दुलंक्ष करायचं, अशी मी प्रतिशञा केली होती. 

एकदांची परीक्षा झाली नि मला हायसं वाटलं, रिझल्ट लागायला 

६९ 


वेणू वेटणकर 


अवकाश होता म्हणून कुठं तरी बाहेरगांबी जावं असा विचार केला. 
आई म्हणाली ' कोकणांत गांबीं जावं तर सुलोचना पुण्याला बोला- 
वित होती. कोकणांत जायचं तर आईबरोबरच गेल पाहिज होतं नि 
आई गेली असती तर खाणावळीची व्यवस्था कशी राहिली असती हं 
खात्रीने सांगतां आलं नसतं. 

बाळासाहेब पूर्ण सहनशीलपणानं जरी वागत हाते, कुणाची कांही 
तक्रार येऊ देत नव्हते, तरी समोर आई उभी होती म्हणूनच हँ सार 
होत होत. आईच्या गेरइ॒जरींत त्या टवाळ लोकानी बाळासाहृबांना 
कसं सतावलं असतं हृ कांही सांगतां आलें नसतं. 

मी सुलोचनेबरोबर पुण्याला निघून गेलें. 

मुंबई सोडण्याचा माझा पहिलाच प्रसंग होता. इवलंसं माझं आयुष्य 
पण ते सार मुंबईतच गेलं होत. कोकणच्या लहानपणच्या आठवणी 
आतां जवळ जवळ स्वझासारख्या वाटत होत्या, मुंबईबाहेर जग आहे 
याची मला कल्पनासुद्धा नव्हती. इतिहास भूगालांतून गांबां्ची नांबं 
वाचली म्हणजे मनांत येई, का. ही असलीं गांब॑ एकदां पाहून याव. 
पुरुष असतें तर गेलें असते देखील. इतक्यांत चांगली दह्या वेळां जाऊन 
आले असते. 

मी सुलोचचनेबरोबर जायला निघाले तेव्हा आई म्हणाली, “' पुण्याला 
जाते आहेस पण सांभाळून रह्दा. जग है इथून तिथून सारखंच आहे. 
इथं जशी टवाळ माणसं आहेत तर्शी तिथे आहेत. दुसरी कुणी आई 
असती तर तिने आपल्या मुलीला पाठवलंसुद्धां नसते--पण मला कांही 
तसली भीति वाटत नाही, कां वाटावी ! एवढ्या मोठ्या मुली, या 
एवढ्या वाढतात म्हणून त्यांना मुली म्हणायचं---पण आमच्या जुन्या- 
काळच्या हिशेर्बी पाहिले तर तुला कुणी मुलगी म्हटलं नसतं. माझीच 
गोष्ट घे, तूं झालीस त्यावेळीं मी चोदा वर्षांची होते. तुम्हा मुलींना हॅ 
सांगून सुद्धां खर वाटायचं नाही. अकराव्या वर्षी माझें लग्न झाल. दृ्ली 

१9० 


मी मिरवू. लागळं 


दिसते आहे का कुणी अकरा वर्षाची मुलगी लग्न झालेली ! बाराव्या 
बरषीपासून माझ्या आंगावर प्रपंच पडला नि चोदाव्या वर्षी मी आई 
झाले, आई झाली, कीं मुलगी कांहीं लहान रहात नाहीं. तुला तरी आतां, 
मला वाटतं, हं सतरावं वरीस, या तुझ्या वयांत मी उघडी पडलें. संसार 
संपून गेला. त्यानंतरचे दिवस किती कष्टांत काढले हे कशाला आतां 
तुला सांगू ! तूं तेव्हां लहान होतीस म्हणूनच बरं होतं. कांही कळत 
नव्हतं तुला. पण एक बरं होतं, का लहानपणी तुझा स्वभाव हट्टी 
नव्हता. तसं असतं तर मला कुठंतरी जाऊन जीव द्यावा लागला 
असता. अजूनही तसाच राहिला आहे--इतके दिवस कधीं बोलले 
नव्हते पण आज बोलण्याची वेळ आली म्हणून सांगतं, तूं ही 
अशी होतीस म्हणूनच माझ्या हातून हा एवढा धंदा झाला. कसा छळ 
करीत होते लाक माझा, ते तुला सांगून सुद्धां कळायचं नाही. 
जसजसं मला यश येत होतं तसतसा माझा छळ वाढत होता. तुला 
कांही कळूं देत नव्हते. माझं दुःख माझ्या पुरतं. तुला कशाला दुःखांत 
वाटेकरी करू १ अजूनही कांही कमी छळ होतो आहे असं नाही पण 
आतां ते अंगवळणी पडलं आहे. कांहीं वाटत नाहीं त्याचं. तेव्हां म्हणते, 
एकदां बाहेरची हवा पाहून ये. कोकणांत गेलो असता आपण तर बरं 
झालें असतं पण तूं नको म्हणतेस--फार जावंसं वाटतं मला, जुन्या 
माणसांना एकदां मटून आले असते ---” मी हंसत आहे असं पाहून आई 
म्हणाली, “' हसतेस कां ! श्रीमती आली आहे ती मिरवायला जातें, 
असं का वाटलं तुला १ अगर्दी तेवढ्याचसाठी कांही नव्हे पण लोभा. 
लाभाची माणसं असतात त्यांना आपल्य़ा चांगल्या दिवसांत तरी भटल्या- 
शिवाय राहूं नये. काय सांगावं ? केव्हां कसा प्रसंग येईल तो. मिरवायला 
म्हणून नव्हे--पण चांगलं चाललं आहि तोपर्यंत केव्हांतरी एकदां गांवीं 
जाऊन आले पाहिजे --” 

साऱ्या आयुष्यांत आई पहिल्यानं मागल्या ह॒किकती माझ्याकडे बोलली. 
मला वाटलं, हा वेळपर्यत बोलायला तिला फुरसतचच झाली नव्हती. 

७१ 


बेणू वेलणकर 


बोलावं असं वाटण्याइतकी विश्रांती तिच्या आयुष्यांत कधींच 
मिळाली नव्हती. बाळासाहेब आल्यापासून नुसती चुटपुटती नजर 
ठेवण्यापलिकडे ती व्यवहाराकडे फारसं पाहात नसे. बाळासाहेबांनींही 
आपली नोकरी चोख बजावण्याचा उपक्रम केला होता. मला वाटलं, 


बाळासाहेबांच्या स्वभावांत फरक पडला. ' अंगावर जोखीम पडल 
म्हणजे माणूस आपोआप वळणावर येतं ) असं म्हणतात---त्याचा 


प्रत्यय आला. शक्‍य तेव्हढं करून बाळासाहेबांच्या कारभारांत एकसुद्धां 
शब्द न टाकण्याचा आईने प्रघात ठेवला होता. अगदीं तिच्यापर्यंत 
तक्रारा आली तरच ती तोंड घालीत अत. असं असल्यामुळं बाळा- 
साहेबद्दी सदा सावध असत. 

आतां सर्व काही सुरळीत चालले होतं; अशी खात्री झाल्यामुळे मी 
सुलोचनेबरोाबर पुण्याला निघून गेळे, चांगली सहा आठवडे तिथं होते. 
परीक्षेचा रिझल्ट लागायच्या आर्धा थोडे दिवस मुंबईला आलें. 

पुण्याला गेलें तेव्हां पहिल्या पहिल्याने वातावरण बदलल्याने जरा बर 
वाटले. पण पुढे कंटाळा येऊं लागला. गजबजलेल्या घरांत राहण्याची 
संवय, चार-दोन माणसांच्या घरांत ज्यावेळीं राहावे लागलं त्यावेळी 
अगदी ओकं ओकं वाटूं लागलं. 

आम्ही सुलोचनेच्या चुलत्याकडे गेलो होतो. त्यांना कसलीझी 
नोकरी होती सरकारी. घर्री तीन चार माणसं होती, तरी मुलाबाळांचे 
छेंढार मात्र बरंच होत. तीं अशी किरकिरीं मुलं होती, कीं कांई सांगतां 
सोय नाहीं. दिवस उजाडल्यापासून रात्री झोपी जाईपर्यरेत सारखी रडा- 
रड, मारामाऱ्या चालल्या असत. सुलाचनेच्या चुलतीला ती मुलं कांही 
आवरत नसत. तिच चुलतेही विक्षिप्त होत. तेही आल्याबरोबर मुलांना 
मारायचा सपाटा सुरू करीत असत, त्यामुळे माझा जीव कातावून 
गेला नि म्हणूनच मुंबईला आलें तेव्हां मला हायसं वाटल. 

रिझल्ट लागला नि मी पास झालें. 


७२ 


भप्रकरण १० 
मी सावध झालें 


मी कॉलेजांत जाऊं लागल्या पासून माझी थट्टा करणाऱ्यांना ऊतच 
येऊं लागला. कालेजांतल्या मुली माझ्याबद्दल कांही सहानुभूती बाळग- 
ताल अशी माझी अपेक्षा होती पण ती खोटी ठरली. जातिभेदाबद्दल 
चाहकडे ओरड केली जाते; पण एका जातीचीं माणसं देस्वील, केवळ 
खाणावळवालीची मुलगी आहे म्हणून, माझा हेटाळणी करू लागर्ली. 
---विशेषतः ज्या भुटी पदवीधर होण्याच्या अगर्दी बेताला आल्या 
होत्या--त्या मुर्लासुद्धां माझी हेटाळणी करूं लागल्या, ह पाहून मला 
आश्चर्य वाटल, 


शिक्षणानं मन सुसंस्कृत होतं, मनोभ[मिकेचा दर्जा उच होता, पाहा. 
ण्याची दृष्टि व्यापक होते, अशी माझी कल्पना होती ता फोल ठरली, 
शिक्षणाच्या परिणामाबद्दलचा माझा विश्वास डळमळू लागला. खाणा- 
वबळींतील लोकांनीं माझी थट्टा केली तरी त्याबद्दल मला कांही वाटत 
नसे, बोलून चाळून उनाड लोक. कुटुंबवत्सल नसलेली माणसंच बहुतेक 
खाणावळींत येतात. तेव्हां त्यांची वात्ति तशी असली तर त्यांत कांही 
आश्चर्य नव्हतं. 


मी त्याला उपाय केला होता. कॉलेजांत जाऊं लागल्यापासून मी 
संध्याकाळच्या वाढण्याच्या कामांतला बराचसा भाग मुहाम होऊन 
७२ 


वेणू वेलणकर 


माझ्या अंगावर घेतला होता. काहीं दिवसपर्यंत हा उपाय चांगला लागू 
पडला असं मला वाटलं. पण त्यांतही फाटे फुटूं लागले. 

एक दिवस एक कॉलेजांतला विद्यार्थी पंगर्तीवर म्हणाला, “ही मोठी 
गंमत आहे बुवा. यापूर्वी आमच्या वेणूताई फारशा वाढायला येत नसत 
पण बाळासाहेब मॅनेजर झाल्यापासून--विदषतः आतां त्यांच्या मनेज- 
रीचे बस्तान चांगलं बसल्यापासून-वाढण्याची परीक्षा देण्यासाठी की 
काय कोण जाणे, त्यांनीं हल्लीं वाढायचा नित्यक्रम सुरू केला आहे.!?? 

दुसरा उद्गारला, “' अरे चुकतास गोविंदा, वाढलेल्या मुलींनी वाढा- 
यचे नाहीं तर मग वाढायचं कुणीं ? ” 

ही कोटी झाली वाटते !” पहिला उद्गारला, "फार वाढलं आहे हली 
हे कोट्या करण्याचे वेड-विदेोषतः असल्या खजाळ कोट्या करण्याचे. 
मी अगदीं गर्भारपणं चची करीत होतो त्याच्यावर पाणी ओतलंस ---''. 

हातांतलं भाडं त्याच्या पानांत ओतून रागानं निघून जावं असं मला 
वाटत होतं. पण मी आत्मसंयमन केलं नि वाढतांना हंसून म्हटलं, 
५६ तुम्ही अगदीं नवीन येतां वाटते इथं, गोर्विद्राव ! ” 

गोविंदराव बेडरपणे म्हणाल, ““ नवीन कां ! आज चांगला तीन वष 
येतो आहे. 

“£ मग मी पूर्वीपासून वाढीत असतें याची आठवण बुजाली वाटतं १ 
पर्रक्षेच्या अभ्यासाच्या वेळीं माणसाला थोडी मेहनत करावी लागते हं 
तुमच्यासारख्या कलिजच्या विद्यार्थ्यीच्या तरी ध्यानी आलं पाहिजे 
होतं १? 

मी अगदीं शांतपर्ण बोलत होतें. यत्किचितही चिडल्यासारस्वं 
दाखवल नाहीं त्यामुळें तो ग्रहस्थ ओशाळला. 

कांहीं दिवसपर्यंत पंगतीवरची थट्टा बंद झाली, पण एक पंगत 


थोडीच होती ! या ना त्या पंगतीवर अज्ञीच कुणी ना कुणी कांही तरी 
खजाळी चालवीत असत. 


> ह$ 


मी सावध झाले 


बाळासाहेबांच्या वृत्तीत हृ्ी फरक पडत चालला होता. त्यांची 
राहणी बरीच बदलली होती. पूर्वीचा गवाळेपणा जाऊन जरा ठाकठीक 
नि नीटनेटकं राहण्याचा उपक्रम त्यांनीं सुरू केला होता. संध्याकाळी 
फिरायला जातांना बाळासाहेब अगदी अपू-ढु डेट डेस करून जात असत. 
त्याचं जरी मला कांद्दी वाटलं नाहीं, तरी त्यांच्या खोलींत एक दिवस मी 
गेलें असतां टॉोयलेटच्या जिनसांची जी लयलूट झालेली दिसून आली 
ती पाहून मला एकंदरींत बरे वाटलं नाहीं. मी खोलींतून बाहेर पडा- 
यला आणि बाळासाहेब तिथें यायला गांठ पडली, मी जरा आओशाळल्या 
सारखीच झालें. त्या माझ्या ओशाळण्याचा त्यांनी विपरीत अथ केला 
अत्तावा. ते म्हणाले, “' काय पाहात होतां वेणूबाई--! ” 

मी दचकले, यापूर्वी ' वेणूताई ' म्हणणारा ग्रहस्थ आज ' वेणू- 
बाई ) कां म्हणतो ? मलाही तततंच उत्तर देण्याची लहर आली. मी 


म्हटलं, “ कांहीं नाहीं; नुसती तुमच्या खोलीची पाहाणी करीत होते 
बाळाभाऊ ! 


“६ बाळाभाऊ ? ” बाळासाहेब उद्गारले. 

6 वेणूबाई ? ” मी जरा खोचून म्हटलं. 

५(मग काय आढळून आलें त्या पाहाणींत !”? बाळासाहेबांनी विचारलं. 

मधले दोन उद्गार तसेच राहून गेले, मी बाळाभाऊ कां म्हटलं 
नि त्यांनीं वेणूबाई कां म्हटलं, याचं निराकरण व्हायचं राहून गेलं. 

“ पाहाणींत बरंच दिसून आलं. ” मी खांचून बोलले, “' तुमच्या 
थाटांत बराच फरक होतो आहि. ही क्रीम्स, ब्रश, कंगवे, ब्रिलियेटाइन्स 
वगेरे वगेरे बऱ्याच नव्या जिनसा आल्या आहेत. नि एक प्रकारच्या 
नाहींत, चार चार प्रकारच्या क्राम्स, तीन चार प्रकारचीं ब्रिलियेटाइन्स, 
केसपावडसं, असा हा पारीबाळींना शोभणारा थाट तुमच्या खोलींत कां? 

6: कोणत्या नात्यान तुर्म्ही हा प्रश्न करीत आहांत ? ” बाळासाहे- 
आनी विचारले, 

७५९ 


वैणू वेलणकर 


६६ मी प्रश्न करीत नाहीं, तुमच्या प्रश्नाला मी उत्तर दिलं. ” 

५६ उत्तर दिलंत खरं ---पण त्याबरोबर प्रश्न केलातच कीं. वेणूबाई, मी 
तरुण माणूस आहे---सर्कशींत राहिल्यामुळे यूरोपियन माणसांशी देखील 
माझा संबंध आला आहे. त्यांचं अनुकरण करण्याची मला तिथें सवय 
लागली होती. तिथे ज्या वेळीं मी मॅनेजर म्हणून मिरवत होतो त्यावेळी 
असल्या साहेबी थाटांत मला राहावं लागत हात. मधले दुःखाचे दिवस 
आले त्यावेळीं फाटक्या धोतर-कोटावर भागवीत होतो; पण आतां चार 
पेसे हाती आल्यावर मी दुःखांत दिवस कां काढावे ? 

६६ असं काय सुख आहि या वस्तूंपासून ? पोषाव करा, चांगले 
उंची कोट इंवे तर करा--पण या क्रीम्स नि फेसपावडसेबर जो पेता खर्च 
करतां, त्याच्या बाचून काय अडलं आहि. ! ” 

बोलतां बोलतां माझा आवाज चढा झालेला पाहून बाळासाहेब स्तन्थ 
झाले, घरच्या एकाद्या वडील माणसाने घरांतल्या एकाद्या विद्यार्थी 
मुलाला जसं अधिकारानं बोलावं, तसा माझ्या नकळत माझा स्वर 
बदलत जात होता. मला हें कळले, पण अंतःकरणांतली भावना मला 
आवरतां आली नार्ही. 

“ तुम्हाला आवडतनार्ही का?!” 

£ माझ्या आवडीचा काय संबंध आहे!” 

“६ कां बरं--मी तुमचा नोकर आहे. तुम्हांला आवडत नाहींत त्या 
गोष्टी करणे माझ्या हिताचं होणार नाहीं, याची मला पूर्ण जाणीव आहे. 
तुम्हाला आवडत नसेल तर उद्यांपासून हई सार रंगरोगण बेद करतो. ” 

“६ तुमचे तुम्ही मुखत्यार आहांत. काय वाटेल ते करा ” असं म्हणून 
मी खोलीच्या बाहेर गेलें. 

मी माझ्या खोलीत जाऊन आरामखुर्चीवर पडले हाते, इतक्यांत 
बाळासाहेब तिथं आलें. ते आले हें जरी मला कळले तरीही मी न 

७६ 


मी सावध झाले 


कळल्याचा आव आणून पुस्तक वाचीत बसले होते. बाळासाहेबांनी 
एकदां खाकरून खाकरून पाहिलं. 

आतां ढोंग चालू ठेवणे शक्‍य नव्हतं म्हणून मी वर पाहिलं आणि 
म्हटलं, “' काण बाळासाहेब ! काय आहे!” 

बाळासाहेबांनी शेजारची खुर्ची पुढं आढली आणि बसतां बसतां ते 
म्हणाले, “ माफ करा--तुमच्या अभ्यासांत मी व्यत्यय केला-पण कांही 
कांही संवयी माणसाला लागलेल्या असतात त्या कांही तोडतां येत नाहींत. 
तुम्हांला वाटत नाहीं असं? 

५ माझ्या वाटण्याचा काय संबंध ! तुम्ही जांपयंत आपलं काम चोख 
बेजावतां तोपयत तुम्ही कुठली क्रीम्स लावतां, कीं कुठली ब्रिलियेटाइन्स 
बापरतां कीं न वापरतां, हें पाहण्याची मला जरुरी नाही. 

“ते खरं आहे?' बाळासाहेब म्हणाले, “पण तुम्हांला रुचत नाहीं ती 
गोष्ट मी करण वाजवी होणार नाही, इतकं कळण्याइतकीा मला अक्कल 
अहि. त्यांतूनही विशेषतः तुमचं-म्हणजे वेणूबाई प्रत्यक्ष तुमचे---मनही 
माझ्याबद्दल बिघडावं असं मला केव्हांही वाटणार नाहीं. 

: बरे मी असं विचारते; आजपर्यंत तुम्ही मला वेणूताई म्हणत होतां 
नि आज तुम्हांला ही वेणूबाई म्हणायची लहर कुठून आली!” 

अगर्दी नाजुक हंसून बाळासाहेब म्हणाले, “ते असं आहे. आजपर्यत 
मला ही जाणीव नव्हती. अगदीं पूवीच्या पद्धतीनं बोलायचे म्हणजे मी 
नुसतं वेणूच म्हटलं पाहिजे होतं. पण इथं लोक वेणूताई म्हणत आहेत 
त॑ ऐकलं, म्हणून तसं म्हणत राहिला. पण हल्लीं मला आठवण होऊं 
लागली, कीं तुम्ही मालक आहांत नि मी नोकर आई. तो दजा बाळ- 
गला पाहिजे म्हणून नित्याचं विशेषण टाकून चांगली शोभेल अशीच 
हांक मारायचे ठरवलं. 

मी कांही न बोलतां स्वस्थ राहिलें, बाळासाहेब सारख माझ्याकडे 
पाहात होते. त्यांच्या नजरंत जो चेचलपणा आला होता तो पाहून 

१9५9 


वैषू वेलणकर 


'क्षणभर मला भय वाटले, त्यांचे अंगविक्षप असे कांही चमत्कारिक होत 
होते, कीं चटकन ते पुढं होऊन माझा हात घरतील कीं काय, अशी 
भीति मला वाटली. विजेसारखी ही कल्पना माझ्या मनांतून चमकून गेली. 

बाळासाहेब जात नाहींत असं वाटून मी म्हटल, '“' कांही काम 
आहि का! ” 

“ नाहीं, नाहीं, ” बाळासाहेब चांचरत उद्गारले, “' बसलो. इथे 
क्षणभर तर तुमची हरकत आहि का? तुम्ही इतका परकेपणा बाळगला 
नाही म्हणून म्हणता-एकटंच तिथे खोलींत बसायचे, जवणारे यायला 
अजून अवकाश॒& आहे, तेव्हां म्हहलं॑ घटकाभर इथं बोलत 
बसेन, एव्हढंच, ” * 

मी पुस्तक उचलून हाती घेतलं आणि म्हटलं, “' मला अभ्यास 
करायचा आहे, मग मला वेळ व्हायचा नाहीं, वाढायला जायचं 
आहे ना! ” 

6 कशाला वतुर्म्ह वाढतां नि लोकांच्या टीकेला कारणीभूत होतां ! 
काय वाढपी नाही आहेत ? कामं सगळीं सुरळीत चालली आहेत. मधे 
तुम्ही अभ्यासांत होतां त्यावेळीं तुम्ही वाढीत नव्हतां, म्हणून कुठं 
अडलं ? मला वाटतं, है वाढप्याचे काम करणं तुम्हा आतां बंद करावं. 
आपलं मी सुचवता आहे एव्हढंच. बाकी तुमच्या तुम्ही मुखत्यार 
आहांत. काय बरं, काय वाईट, हई तुमचं तुम्हाला चांगलं कळतं 
आहे--?” मी कांहींच उत्तर देत नाहीं असं पाहून “' बरं येतो तर” 
असं म्हणून बाळासाहेब निघून गेले. 

त्या दिवसापासून मी बाळासाहेबांच्या बाबतीत चांगलीच सावध 
राहाण्याचा निश्चस केला. 


ख्ट 


प्रकरण ११ 
सी इन्स्पेक्टर बनलें 


त्या दिवसापासून बाळासाहेबही माझ्या बाबतींत फार सावध राहूं लागले. 
माझ्या वर्तनांत मी कोणत्याही प्रकारे फरक होऊं दिला नाही. अगदीं 
थोडासा फरक जरी दिसला असता तरी खाणावळींतील काकदृष्टि 
लोकांच्या नजरेत तो चटूकन भरला असता, नि आर्धीच माझी बद- 
नामी करण्यासाठी टपलेल्या त्या लोकांच्या हाती चांगलंच हत्यार 
मिळाल असते. 

बाळासाहेबांशी ज्या प्रकारे मी पूवी बोलत असे-तशीच बोलत होर्ते, 
जसे हुकूम द्यायच तसेच देत होते, वेळप्रसंगी चापणे किंवा तंबी देणं 
पूर्वीप्रमाणेच सुरू होतं. 

बाळासाहेबांना मॅनेजर नेमल्यापासून आहे खाणावळीच्या व्यवहारा- 
कडे पूर्वीहतकी लक्ष देत नसे. मधून मधून यायचं, जुन्या ओळखीच्या 
माणसाशी चार खुशालाच्या गोष्टी बोलायच्या, कुर्णी बिलं दिलीं नस- 
तील त्यांना सामदामाचे दोन शब्द ऐकवायचे, यापलीकडे आई फारसं 
काम करीत नसे. दिवाणजी सवे हिशेब ठेवीत असत. आईला जरी 
जमाखर्चाच्या पद्धतीची शिस्तवार माहिती नव्हती तरीही दिवाणर्जीनी 
सांगितलेल्या हिदोबांवरून आदा नि खच तिच्या चांगलाच लक्षांत येत 
असे. हल्लीं कांहीं महिने हिशेब तपासण्याचे काम तिनं माझ्यावर 
सोपवळ होतं --म्हणजे ती माझ्यावर सर्वस्वी अवलंबून असे अस 

७९ 


वेणू वेलणकर 


नाही-तर पहिल्यानं हिदोब मी तपासायचे नि नंतर तिला ते समजावून 
द्यायचे, नि मग शेवटचा शेरा तिनं मारायचा, 

चालू महिन्याच्या हिशेबाने दिवाणजी अस्वस्थ झाले होते. महिन्या- 
वर यणाऱ्या लोकांचा हिदोब बरोबर होता, पण दररोज किरकोळीनं 
जेवायला येणाऱ्या माणसांच्या हिशबांत कांहीतरी अफरातफर होते आहि 
असा संदय आल्याचे दिवाणजीनी मला सांगितलं. ही गाष्ट आम्हीं 
आंईपर्यंत जाऊं दिली नाहीं, पण आम्हीच तपासाला सुरवात केली. 

कोलिजचे दोन तीन दिवस बुडालं तर फारसं नुकसान होण्या- 
जोगं नव्हतं म्हणून मी गैरहजर राहून नजर ठेवण्याचे ठरवलं. मी 
गैरहजर राहिलें याचा थांगपत्ता बाळासाहेबांना लागू दिला नव्हता. 
दिवाणजी या कार्मी मला मदत करीत होते. वेळेवारी जेवायला येणारी 
माणसं किती आहेत नि रोखीचे पेसे किती येतात, एवढंच भी पाहाणार 
होते. रविवारी मी नजर ठेवून पाहिली होती पण त्या दिवशीं एक 
पेचीसुद्धां चूक सांपड्डून आली नव्हती म्हणूनच मला असं करावं लागलं. 

दिवाणजींचा संदय खरा होता. अफरातफर होत होती नि तीही 
चांगली व्यवस्थितपणे. किरकोळीनं जवायला येणारी माणसं इतकी 
होतीं, कीं राज चार पांच रुपये घटवणं कांही अदाक्य नव्हतं--नि तसंच 
होत होतं. तीन दिवसपयेत मी पाळथ ठेवली नि खात्री करून घेत- 
ल्यावर पुन्हां तीन चार दिवस पूर्वीप्रमाणे चाळू दिले. 

चोरी करतांना बाळासाहेबांना पकडण्याचं माझ्या मोठं जिवावर आलं 
होतं. चारचौघांसमक्ष तर राहोच पण नुसत्या दिवाणजींसमक्ष देखील ते 
पकडले जावे, हे मला बरं वाटत नव्हतं. दिवाणजींना मी त्या दिवशी 
गैरहजर राहायला सांगितले नि मी दिवाणजींच्या कामावर बसले. 
कॅदवर मी बसलेली पाहून बाळासाहेब हंसत हंसत म्हणाले, “ वाः 
तुम्ही आतां है काम देखील करूं लागलांत वाटतं. ! ” 
मीही तसंच हंसत उत्तर दिलं, “' पडेल ते काम नको का करायला? 

८० 


मी इन्स्पेक्टर बनलें 


दीन दिवसांच्या रजसाठी बदली माणूस; ठेवणे दिवाणरजींनांही राक्‍य 
नव्हतं नि मलादी जरूरी वाटली नाही. 

५६ मग मी नसतं का केलं ते काम १ ” बाळासाहेबांनी विचारलं. 

६: सर्व कामं शिस्तीप्रमाणं झालीं पाहिजेत, ” मी म्हटलं, “' बुडालं 
एक दोन दिवस कॉलेज तर फारसं काहीं नुकसान होत नाही--नि 
मलाही ग्हटलं एकदां हे काम समजेल, 

त्यादिवशी हिशेबांत अफरातफर झाली नाहीं; पण दुसऱ्या दिवशीं 
बाळासाहेबांना मोह आवरतां आला नाहीं, मला संदय आहे-त्यादिवशी 
त्यांनीं दोन-तीन माणसांच्या पेशांच्या बाबतींत हातचलाखी केली 
असावी. पण मला खात्री नव्हती. मात्र दुसऱ्या दिवशीं लबाडी बरोबर 
उघडकीस आली. 

बाळासाहेबांची हातचलाखी मला कळली आहि असं मी त्यांना दिसू 
देलं नाही. जितकी मी गैरमाहिती दाखवण्याचा प्रयत्न करीत होते 
तितके ते फसत हाते. मला वाटलं, ते डाव टाकून पाहात होते. मी 
अगदीं वेड्याचे सोंम घेतलं होतं. हिदोबांत मला कांही कळत नाही; 
बाळासाहेब म्हणतील तें खरं-- ते म्हणतील तसा हिशेब मी लिहून घेते 
आई---अश्ी जसजशी त्यांची खात्री होऊं लागली तसतशी त्यांची हात- 
चलाखी वाढू लागली, नि त्या दिवर्शी त्यांनीं सहा रुपये बारा आणे चोरले, 

दुपारी सगळी आवराआवर झाल्यावर बाळासाहेब आपल्या 
खोलींत आराम करीत होते. मी गड्याकरवीं त्यांना बोलावणे पाठवलं, 
माझ्या खोलींत पाऊल टाकतांना ते अगदीं दहंसतमुखानें आले. त्यांनीं 
कांही तरी निराळाच कयास बांधला असावा असं त्यांच्या मुद्रेवरून 
दिसून आल. 

£ कां बोलावणं झालं ! ” त॑ हंसतं हंसत म्हणाले--त्यांच्या ह्ाता- 
कडे माझी नजर गेली, सोन्याची साखळी असलेलं सोन्याचे रिस्टवांच 
त्यांच्या हातांत झळकत होतं. 

द्‌ टर 


वेणू वेळणकर 


मी म्हटलं, “' वाः हे घड्याळ केव्हां घेतलंत ? ” 

हू घड्याळ होय?” बाळासाहेब जरा चांचरतच म्हणाले, ““ जुनंच 
आहि ते-बाबांच्या वेळचं, पडून राहिलं होतं टुंकेंत. वापरतो आहे झाले. 
दृ्ली पोषाख थाटामाटांत करता कीं नाहीं --त्याला शोभेसं घड्याळ 
इवं कीं हातांत--- 

मी टक लावून त्यांच्या चेहेऱ्याकडे पाहात होते त्यामुळे ते अस्वस्थ 
झाले नि म्हणाले, “ कां ! काय झालं! 

“६ ते आपल्या मनालाच विचारा ! ” मी म्हटलं. 


५६६ मनाला काय विचारायचं ! माझं असंस्कृत मन मला कांहींच 
सांगत नाहीं, 


५६ असंस्कृत मनंच निमळ असतात. सुसंस्कारानं बुद्धि प्रगल्भ होते; 
नि मग त्या बुद्धीला हातचलाखीचे खेळ खेळावेसे वाटूं लागतात. नाही!” 

बाळासाहेब बावरल्यासारखे झाले. मला कांहीतरी संशय आला आह 
अश्शी अटकळ त्यांनी बांधली असावी. ते म्हणाले. “' इतकी प्रौढ 
भाषा मला कळत नाही. मी मूळचा साधारण अशिक्षित-त्यांतून 
सर्कशीसारख्या गबाळ नि मवाली लोकांत वागलेला-इथं आलो तो 
खाणावळींत--असली प्रोढ भाषा मला कशी कळावी ? 

:£ ठीक आहे, ” मी खुर्चीत सरसावून बसून म्हटलं, “' अगर्दी 
साध्या भाषेंत सांगते. ऐका. तुम्हाला किती पेशांची जरूरी आहे? ” 

५६ मला पेश्शांची जरूरी ! ती कशाला !” 

“६ मी अगदीं सरळ सरळ विचारते, पन्नास रुपये ह्या जरी तुमचा 
पगार असला नि तो तुम्हाला पुरत नसला नि तुम्हाला पैशांची जरूर 
लागली, तर आईला सांगितले असतंत तर तिनं कधीं नाहीं 
म्हटलं नसतं. ?” 

बाळासाहेब फार अस्वस्थ होऊन म्हणाले, “' पण मला पैश्याची 
जरूरी लागली असं तुम्ही कशावरून म्हणतां ! * 

८२ 


मी इम्स्पेक्टर बनलं 


मी म्हटलं, “' हें पाहा, बाळासाहेब, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठे 
आहांत. तुमच्यासमोर मी एक पोरच आहे. पण आज कित्येक वषे 
आमच्या घरी हजारांनी व्यवहार चालला आहे. अगदीं अशिक्षित 
असलेली माझी आई, बायकोमाणूस असून हे सगळं चालवते आहि. 
मी तिची मुलगी आहे. मीद्दी कांही या व्यवहारापासून पारखी राहिलेली 
नाहीं. आईकडे मी कांही बोलले नाही, मला संशय आला म्हणून 
मी माझी खात्री करून घेतली आहे. तुम्ही कितीही चुकवाचुकवी 
करण्याचा प्रयत्न केलात तरी त्याचा कांही उपयोग होणार नाहीं, या 
पेक्षां जास्त स्पष्टपणे बोलायला मला भाग पाडूं नका. ” 

बाळासाहेब बराच वेळ स्तब्ध बसले. मी सारखी त्यांच्या चेहऱ्याकडे 
टक लावून पाहात होते. त्यांच्या मनांत मोठी खळबळ उडालेली त्यांच्या 
चेहेऱ्यावर दिसून आल्यावांचून राहिली नाही. 

एक मोठा सुस्कारा टाकून बाळासाहेब म्हणाला, “' असं पाहा वेणू- 
बाई, मोह मोठा कठीण आहे. मी सर्कशींत होतो त्यावेळीं डोअरवर 
पेसे खायची संबय मला लागली होती--सर्कशीचा काय किंवा नाटकाचा 
काय--मॅनेजर म्हटला, कीं तो पैसे खायचाच. त्याने पेसा खाला नाही 
तर त्याच्या हाताखालची माणसं त्याला नाहींसा करून टाकतील. त्या 
सवीचा मोठा कट असतो. ती जुनी आठवण जागी झाली --- बाळा- 
साहेब तिथंच थांबून थोडा वेळ विचार करून म्हणाले, “ती. जुनी संवय 
जागी झाली. हा प्रकृतिधर्म आहे. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं लहान आहांत 
असं तुम्ही म्हटलंत, पण कांही झाले तरी तुम्ही मालक आहांत. मला 
वाटते, झाल्यागेल्या गोष्टी विसरून गेलेलं बरे, सत्यभामाबाईच्या कानावर 
न जाईल तर यापुढं अशी गोष्ट होणार नाहीं, असं मीं तुम्हाला वचन 
देतो. पण एव्हढं खरं, मला पन्नास रुपये दृ्ली पुरत नाहींत. तुम्ही मला 
हिशेब विचाराल पण तो मला देतां यायचा नाही. मी चेन करतो 


आहे यांत दोका नाहीं. पण मी कांही वायफळ चैन करीत नाहीं. सक- 
“5 


वेणू वेलणकर 


शींत होता मी. जगांतली सगळ्या प्रकारचीं माणसं सकशींत असतात. 
त्यांच्या सहवासानं कांही कांही खोडी लागल्या आहेत मला. ही जीभ मोठी 
कठीण आहे. एकदां चटक लागली जिभेला म्हणजे ती आवरणं मोठं 
मुष्कील असतं, म्हणजे मी कांही व्यसन करता असं नाहीं; पण कुठल्या- 
तरी चांगल्याशा हॉटेलांत जाऊन मिलिटरी फूड खाल्याशिवाय मला 
समाधान वाटत नार्ही, इथलं जवण चांगलं असतं यांत दाका नाहीं; 
पण त्यानं माझं समाधान होत नाहीं, म्हणून मधून मधून बाहेर 
जातो. कार्नेलियासारख्या हॉटेलांत जायचं म्हणजे पेसेही तसेच द्यावे 
लागतात नि केव्हां ओळखीची चार माणसं भेटली म्हणजे त्यांना नाहीं 
म्हणतां येत नाही, असा या मोह्यांत सांपडली आहे. मी---” 

ते बोलायला चाचरत आहित असं पाहून त्यांचा उद्देश ओळखून 
मी म्हटलं, “'तुम्हांला पैशांची जरूरी लागेल त्यावेळीं माझ्याकडे मागणी 
करा. पण त्याला कांही मर्यादा पाहिजे. कुठं जाऊन झक मारायची असेल 
तर एव्हढं करा, दारू पिऊं नका. मी चांगली नजर ठेवीन. दारू प्याय- 
ल्याचे जर माझ्या नजरेला आलं तर मी काय करीन ते आज सांगत 
नाही.---समजलं ? आज तुम्हीं सहा रुपये बारा आणे चोरलेत £--” 
बाळासाहेब एकदम दचकले, “' बरोबर आहे ना माझा हिदोब (ते 
ठेवून द्या तुमच्या जवळ आणि पुढं जेव्हां जरूर लागेल तेव्हां माझ्या- 
कडे मागत चला.” 

बाळासाहेब आपल्याशीच पुटपुटत होते, “ सहा रुपये बारा आणे ! 
सहा रुपय बारा आणे ! ! ” 

५६६ कां ! चुकला का माझा हिदोब ” ? मी विचारलं. 

“६ इतका बरोबर हिशोब पकडलात म्हणूनच मला आश्चर्य वाटलं ! ” 
बाळासाहेब म्हणाले, “ ठीक आहे-आज पासून ठरले---”" 

6 काय ठरलं ? ” मी पुन्हां विचारलं. 

: काय ठरले ! ” बाळासाहेब गुळमुळीतपणे उद्रारले, 

८४ 


मी इन्स्पेक्टर बनर् 


£ काय ठरलं तमी सांगत ऐका, ' मी दरडावून म्हटलं, 
* तुम्हाला पन्नास रुपये पगार मिळतो ---रोज तुर्म्ही हॉटेलांत गेलांत 
तरी तुम्हाला दोन रुपयांपेक्षा जास्त पेसे लागणार नाहींत, एव्हढा 
अंदाज मला आहे. साठ रुपयांत तुमचं भागलं पाहिजे -पण तुम्हांला 
इतर खच आहित तेंही मी विसरले नाही. माझ्याकडून वेळोवेळीं 
घेतलेल्या रकमेच्या रूपानं तुम्हाला तीस रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळणार 
नाहींत, माझ्या पॉकेटमनीमधून मी हे देणार आहे. समजलं ? यापेक्षां 
जास्त पैसे द्यायचे म्हणजे मला आईला विचारावं लागेल. ” 

बाळासाहेब अगर्दी गर्हिवरून आले. तो गर्हिवर खरा होता, की 
खोटा होता हं मला त्यावेळीं सांगतां आले नसतं; पण त्याचा माझ्या 
मनावर परिणाम झाला. 

नुसते ' थँक यू ' म्हणून ते माझ्या खोलींतून निघून गेले. 


८५ 


प्रकरण १२ 
सी कॉलेजांत गेलें 


सुलोचना माझ्याबरोबरच पास झाली नि माझ्याच कालिजांत 
येऊं लागली. तिची माझी मेत्री पूर्वीप्रमाणेंच कायम होती. पण कॉले- 
जांत जाऊं लागल्यापासून आणखी एक मेत्रीण मला सांपडली होती. 
पण ती महाराष्ट्रोय नव्हती. गुजराती होती. तिचे नाव होतं जमनांवेन. 
तिचा बाप एक कापडाचा मोठा व्यापारी होता. 

तीही व्यापाऱ्याची मुलगी असल्यामुळं माझ्याबद्दल तिचा विरोध नसे. 
सुलोचनेनं पूर्वीचं नात प्रामाणिकपणाने चालवलं होतं-पण जमना- 
बेनची आणि माझी जी मैत्री जुळली ती मी महाराष्ट्रीय 
असून धंदेवाइकाची मुलगी होते म्हणून, कालेजांत ज्या बहुतेक मुली 
येत होत्या, त्या कुणी वकीलांच्या, कुणी डॉक्टरांच्या, कुणी सरकारी 
नोकरांच्या, अशा होत्या. व्यापाऱ्यांच्या कुर्णीच नव्हत्या, मी व्यापाऱ्याची 
मुलगी आहे, असं जमनाबेन म्हणत असे पण तें सुलोचनेला पटत नसे. 
५ खाणावळीचा धंदा म्हणजे कांही व्यापार नव्हे ' असं सुलोचनेचं म्हणणं 
नि जमनाब्रेन मला व्यापाऱ्याची मुलगी म्हणण्याचा आग्रह घरी. तिचं 
म्हणणं असं होतं, खाणावळ हा अन्नाचा धंदा---तिचा बाप करीत 


होता तो वस्त्राचा धंदा. त्या अन्नवस्त्राच्या संबंधानं आमची ही मेत्री 
जमली होती, 


मी जमनाबेनच्या घरीं जात अर्से त्यावेळीं तिची आई मला मोठ्या 
८६ 


मी कॉलेजांत गेळ 


आदरानं वागवी. ती म्हणे “' तुम्ही महाराष्ट्रीय लोक मोठे बुद्धिवान, 
पण नोकरी करायची तुम्हांला होस फार. फार तर बकिली, डाक्टरी 
कराल पण व्यापारांत कधीं पडणार नार्ही. व्यापारांत पडलांच--तर 
कापडाच्या किंवा स्टेशनरीच्या. दोन्ही धंदे एकंदरीत सुरळीत चालण्या- 
जोगे. कॉटन मार्कटमधे जाऊन जगाच्या व्यवहाराच्या उलाढाली कर- 
ण्याची कुबत असूनही तुम्ही मागे राहतां--कच खातां --नि म्हणूनच 
दरिद्री राह्वातां. आमच्या घरी एव्हढी संपत्ती आहे ती कांही नुसती 
कापडाच्या धंद्यावर नव्ह. एकाद्या संध्याकाळी येऊन पाहा, कसं सारखं 
टेलिफोन चाललेलं अपतं, 

कॉटन मार्केटच्या उलाढालीची हकीकत ती सांगूं लागली, म्हणजे 
देहभान विसरून जाई. 


सुलोचनेला त्या बोलण्याचा कंटाळा येत असे. तिला राजकारणाचं 
मोठंच वेड होतं. वतेमानपत्रांतल्या गप्पा मारणं तिला बरं वाटे. केसरी 
अमुक म्हणतो, क्रॉनिकलचे असं मत पडतं, नि व्हाइस आफ इंडिया 
असं म्हणतो; या तिच्या रोजच्या गप्पा असायच्या, सुलोचनेच्या 
या वतमानपत्री गप्पांचा जरी मला तिट्कारा नसला तरी कंटाळा येई. 
केसरी असं म्हणतो नि लोकमान्य तसं म्हणतात ' पण तूं काय म्हणतेस ? 
म्हणून तिला विचारलं तर कांही सांगतां येत नसे, ती म्हणे, “ या 
राजकारणाच्या गोष्टी ही वतमानपत्रे आहेत म्हणून आपल्याला कळतात. 
या बाबतींत मत द्यायचा अधिकार आपला नाहीं. 


मला ते पटत नसे. ज्या विषयांत आपल्याला मत द्यायचा आअधि- 

कार नाही किंवा जा विषय आपल्याला समजत नाही ---किंबा ज्या 

विषयाचा आपल्याला उपयोग नाही-त्याची चर्चा करणे मला आवडत 

नसे. मी तिला विचारी, '' ही राजकारणाची चचा केल्याचा आपल्याला 

फायदा काय ! ” तिला त्यावर उत्तर कांहींच देतां येत नसे, मला वाटे 
८७ 


धैणू वेळणकर 


नुसती फॅशन म्हणून ती राजकारण बोलत असे, या पलीकडे तिला 
त्यांत गम्य नव्हतं, किंवा कळकळही नव्हती. 

जमनाबेनच्या घरी मी वारंवार जात अस. तिच्या बापाची नि 
माझी गांठ क्वचितच पडे. सहवासानं मला गुजराती चांगले बोलतां यऊ 
लागलं होतं म्हणून मी गुजराती वाचायलाही सुरवात केली. 

घरी गुजराती वतमानपत्र घेऊन मी वाचू लागले-- विशेषतः व्यापारी 
बातम्या वाचू. लागलें-म्हृणजे कित्येक जण माझी थट्टा करीत असत. 
चोरून कोणती गोष्ट करणं मला आवडत नसे. वर्तमानपत्र वाचायचं 
म्हणजे चांगली मी ऑफिसांतल्या खुर्चीवर बसून वाचीत असे. 

त्यांत एक दुसराही उद्देश होता. बाळासाहेबांना होणारा मोह अना- 
वर होऊं नये म्हणून शक्‍य तेव्हढे करून ऑफिसांत बसायचं मी 
ठरवलं होतं. 

कांही दिवसांनी ही थट्टा हळूहळू मावळत चालली. मी फारशी बोलत 
नसे किंवा फारसं कुणाला उत्तरद्दी देत नर्स, त्यामुळे लोकांत माझं एक 
प्रकारचे वजन बसलं होतं, कुणी थट्टा करून म्हणत असत, कीं मी पोक्त- 
पणाचा आव आणतं म्हणून-पण कुणी माझी तरफदारीही करीत असत. 

दिनूमाऊ म्हणत, “' पहिल्यापासूनच या पोरीला मोठेपणाचा आव 
आणण्याची संवय आहि ?--माझ्याकडे वळून ते म्हणत, “' आतां 
गुजराती वतेमानपत्र वाचू लागलीस का ! नि तेही व्यापारी पान ! 
काय समजतं आहि तुला ! का उद्यां दाअर बाजारांत जाणार आहेस, कीं 
हुंड्या पटवणार आहेस-कीं सटोडिया बनणार आहेस ? ” 

त्यांची टकळी सारखी सुरू असे. मी कांही उत्तर देत नसे. 
तितक्‍्यांत आई आली तर ते म्हणत, “' मोठी होतां होतां तुमची ही 
पोर बरीच शिष्ट बनू लागली आहे. मला 'ह तुमचे वळण आवडतं. 
सवोशी अगदी सारखेपणानं वागायचं तुमचं बळण जर ही चालवील 
तर मला तेव्हढंच बरे वाटेल--पण ही शिष्टपणाचा आव आणण्याची 
संवय एव्हांपासून लागणं कांही बरं नाही, ” 

८८ 


मी कॉलेजांत गेळं 


अशीं भाषणं ऐकून मला मोठं कोतुक वाटे. आपल्यांत कांही तरी 
“फरक होतो आहे---नि तो लोकांच्या नजरेत भरण्याइतका आहे, याची 
साक्ष पटल्यामुळं मला एक प्रकारचा आनंद होई. 

माझ्यांत हा फरक कां होतो आहे याची कल्पना जरी आईला 
नव्हती तरी बाळासाहेब मात्र त्या बाबतीत पूर्ण जागे होते. त्यांनीं एक 
प्रकारे माझी भीति घेतली होती. एकाद्या वरिष्र्शी नोकराने वागावं 
तसं ते माझ्याशी वागत होते. खरं म्हटलं तर, आई मालकीण होती. 
पण आईशीं वागतांना ते घरांतल्या एकाद्या वडील माणसाशीं-म्हणज 
आई, मावशी, चुलती अश्या कुणा वडील बाईर्शी-जसं वागावं तसे वागत. 
पाहाणाराला वाटे, कीं हे कुणी आमच्या नात्याचेच असावेत. पण माझ्या 
समोर ते जास्त अदञ दाखवीत असत. 

दररोज येऊन एकदां तरी माझ्या खोलींत हजेरी द्यायची, हिदोबा- 
ठिशेबाची चर्चा करायची नि मग निघून जायचं, असा त्यांनी क्रम 
ठेवला होता. 

कांही दिवसांपूर्वी त्यांच्या डोळ्यांत दिसणारी विशिष्ट चमक त्यांच्या 
डोळ्यांत मधून मधून दिसे-नाहीं असं नाही--पण ती अगदींच 
क्षणमात्र. आली आली, गेली गेली, असं व्हायचे. तरी ते माझ्या 
«यानांत आल्याबांचून राहात नसे. 

एक दिवस सुलोचना मला भेटायला माझ्या घरी आली होती. 
बाळासाहेबांना काय लहर आली कोण जाणे; पण त्यावेळीं त्यांनीं येऊन 
माझ्या खोर्लीत ठाणं मांडलं. 

सुलोचना राजकारणाच्या गोष्टी बोलूं लागली नि त्यांत त्यांनीं तोंड 
घातले. गांधींच राजकारण भ्रष्ठ, की लोकमान्याचं राजकारण श्रेष्ठ, असा 
तो विषय होता. दोघांचीही मोठ्या जारजोरानं चचो चालली होती नि 
मी श्ञांतपणानं ती ऐकत होते. 

मी कांहींच बोलत नाहीं असं पाहून बाळासाहेब म्हणाले, “' तुम्ही 


८९ 


वेणू वेलणकर 


कां स्वस्थ वेणूबाई ! ?--( त्या दिवशी त्यांनीं मला एकदां जँ 
६ वेणूबाई ? म्हटलं तो दृष्ट त्यांनीं सारखा चाळू ठेवला होता. पण 
त्यानेतर त्यांना ' बाळाभाऊ' म्हणण्याचा धीर मात्र मला झाला नाहीं. ) 

मी हंसून म्हटलं, “' ज्या विषयांत आपल्याला कांही कळत नाही 
त्या विषयांत उगीच तोंड घालणं मळा आवडत नाहीं. मी वर्तमानपत्रे 
वाचते-पण त्यांतळे राजकारण कर्धा वाचीत नाहीं. ” 

“६ [तेच्या डोक्यांत एकच वेड शिरलं आहि, ” सुलोचना म्हणाली, 
६६ [तिला व्यापारी व्हायचं आहे, पेढ्या काढायच्या आहेत, संदे खेळा- 
यचे आहित, बाजार काबीज करायचा आहे नि व्यापाराच्या जोरा- 
वर हिंदुस्तानला स्वराज्य मिळवून द्यायचं आहे. 

सुलोचना मोठ्यानं हंसली नि बाळासाहेबही हंसले. 

मला कांही ते आवडलं नाहीं. दोघांनीं जसा कांही कट केला होता. 
एकाच दिवसांत दोघांची जशी कांही गट्टी जमल्यासारखी झाली होती, 

ती निघून गेल्यावर बाळासाहेब मला तिच्या घरचा पत्ता विचारू 
लागले. मी विचारलं, “' तिला कां नाही. विचारलात पत्ता ? तुम्हाला 
काय करायचे आहे तिच्या घरच्या पच्या्शी ? जाणार आहांत वाटतं 
तिला भेटायला ! तिच्या घरी तिची आई आहे, बाप आहे, भावंडं 
आहित. इथल्याइतक्या मोकळेपणानं तिथं राजकारणाची चचचा करतां 
यायची नाहीं. येतेच आहे की ती इथे---मग करा इबी तेव्हढी राज- 
कारणाची चर्चा! ” 

बाळासाहेब वरमल्यासारखे झाले. मी जरी रागावून बोलत नव्हते 
तरी माझ्या बोलण्यांत खचच होती, थोडी अधिकारवाणी होती. 
बुद्धिपुरस्सर मी तसं बोलत होते. बाळासाहेबांच्या मनावर माझ्या 
बोलण्याचा परिणाम व्हावा अशी माझी इच्छा होती. तसा परिणाम 
झाला कीं नाही ईं मात्र मला कळलं नाही. 

९० 


भी कॉलेजांत गेलं 


बाळासाहेबांनी विचारलं, “' तिचे लग्न ठरलं आहे वाटत? ” 

६ कुणाचे ! ” मी म्हटलं, “ सुलोचनेचं का ? मी असल्या चांभार- 
ऱचौकरा करीत नसते. ठरले लग्न तर केव्हां तरी होईल नि तुम्हा- 
आम्हाला आमंत्रणंही येतील. ” 

मी गप्प राहिले, बाळासाहेबही गप्प राहिले; पण तिथून उठून गेल 
नाहींत. मी वतमानपत्र वाचीत होतें. 

किती तरी वेळ झाला तरीही बाळासाहेब निघून जात नाहीत असं 
पाहून मी म्हटलं, “ कांही काम अहि का?” 

गंभीरपणे बाळासाहूब म्हणाले, “'हा !”' 

दोघंही बराच वेळ स्तब्ध राहिलो. बाळासाहेबांनी बोलायला सुरवात 
केली, सुरवाती पूर्वी ते जरासे खाकरळे--जस कांही ते आतां व्याख्या- 
नच देणार होते. 

बाळासाहेब म्हणाले, “' माझ्या बोलण्याबद्दल वैषम्य वाटून घेऊं 
नका. कुटुंबांतल्या एकाद्या माणसाइतकीच तुम्ही माझ्याबद्दल काळजी 
घेतां, याबद्दल मी तुमचा फार आभारी आहि, मला इथं परकेपणा 
वाटत नाहीं हृ जरी खरं असलं, तरी स्वातंत्र्याचा अभाव मात्र जाण- 
वल्याशिवाय राहात नाहीं, स्वतंत्र बिऱ्हाड करून राहावं असं आतां 
मला वाटूं लागलं आहे. ” 

६६ मग तुम्हाला नोकरीही दुसरी पाहावी लागेल. ” मी ठासून 
सांगितले. 

“ ही अट आहे का ! ” बाळासाहेब म्हणाले, “' सत्यभामाब्राई 
असंच म्हणतात का! ” 

“८ आई काय वाटेल ते म्हणेल, पण ही 'माझी' अट आहे. ती माझी 
अट पाळायला मी आईला भाग पाडीन. इथं नोकरी करायची तर 
तुम्हाला इथंच राहिले पाहिजे. तुमच्यावर माझा विश्वास नाही, बाहेर 

९२१ 


वेणू वेळणकर 


गेलांत तर तुम्ही बिघडल्याशिवाय राहाणार नाही अशी माझी खात्री 
आहि---नि तुम्ही बिघडू नये अशी माझी इच्छा आहे. ” 

८ कां १ ११ 

“६ तुमच्या कल्याणासाठी, 

पुन्हां दोघंही बराच वेळ स्तब्ध राहिलो. ““ मी सत्यभामाबाईना 
विचारू का £! ” बाळासाहेबांनी अधीरपणानं विचारलं. 

“ विचारा हवे तर ! ” मी म्हटलं, ““ पण आईकडून तुम्हाला हेंच 
उत्तर मिळेल अशी मी खबरदारी घेईन. आई माझ्या राब्दाबाहेर 
जाणार नाहीं. 

बाळासाहेबांची मुद्रा बदलली. त्यांचा चेहेरा भेसूर झाला. तारवट- 
लेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहात ते म्हणाले, “' काय झालं माझं 
अकल्याण झाले म्हणून ! यापूर्वी कुठं झालं होते माझं कल्याण ! तसं 
पाहीलं तर माझ्या आयुष्याचा सत्यनादह झाला आहे. काय आज्ञा आहि 
आतां मला £! मला हं सुख दुखं लागलं आहे. असं वाटतं, पुन्हा 
'गटारांत लोळावं. कशासाठी मी चांगुलपणानं राहावं ? कुणासाठी 
कुणाच्या समाधानासाठी ? 

मी म्हटलं, “' माझ्या-आमच्या ! तुमच्या अन्नावर आम्ही वाढली 
आहोत, उघड्या डोळ्यांनी तुमचे अकल्याण झालेले पाहणं आम्हाला 
कसं बरे वाटेल ! ” 

५ हू झाले तुमचं बोलणं, बाळासाहेब तितक्‍याच निष्ठुरतेनं बोलले, 
५६६ घण माझ्या मनाकडे कोण पाहातो आहि! नुसतं जवण-खाण, घटका- 
भर हिंडणं, येऊन पुन्हां कामाला लागणं, म्हणजे कांही आयुष्याचं सार- 
सर्वस्व नव्हे. मनुष्य ज कांही उपदृव्याप करतो, नोकरी चाकरी करतो, 
ती जितकी स्वतःसाठी असते तितकीच दुसऱ्या एकाद्या जीवासार्ठी 
असते. असा एक जिवाभावाचा जीव, आपल्याशी समरस होइल 
असा कुणी दुसरा जीव, सोबती म्हणून-सुखदुःखाचा वाटेकरी म्हणून--- 

९२ 


मी कॉलेजांत गेळं 


मिळाला पाहिजे असं कुठल्या तरुणाला वाटत नाहीं ? तारुण्याच्या ऐन 
म्यौदेवर मी आली आहे. जसजसा काल जाता तसतसं वाधक्य जवळ 
येऊं लागलं आहे !--” ते थांबले. त्यांनीं एक सुस्कारा टाकला. 

त्यांच्या बोलण्याचं मला भय वाटूं लागलं. “ जाऊंदे, ” बाळासाहेब 
म्हणाले, ““ माझं बोलणं तुला कळणार नाहीं. तूं अजून पोर अहिस. 
माझ्यासारखी संकटांतून गेली नाहींस. माफ कर, मी तुला तूं म्हणतो 
म्हणून; पण दुसरा शब्दच माझ्या तोंडी येत नाहीं. अहो-जाहो म्हणणं 
आतां मला दुःसह होऊं लागलं आहे--- 

त्यांनी टवकारून माझ्याकडे कांहीं वेळ पाहिलं, अंतःकरणांतून जरी 
मी घाबरले होते तरी शाक्य तितका गेभीरपणाचा आव आणण्याचा 
प्रयत्न करीत होते. पण मला भीति वाटली-मागल्या प्रसंगाची आठवण 
झाली--मी अगदीं सावध राहिले होर्त. 

पण काय बाटलं कुणास ठाऊक, बाळासाहेब एका झटक्यासरशीं 
खोलीतून निघून गेले. 

मला हायसं वाटलं. 


९३ 


प्रकरण १२३ 
सुदिक्षणाचे अनुभव येऊं लागले 


त्या दिवसापासून बाळासाहेब माझ्याशी ज्या पद्धतीनं वार्गू लागले 
ती पद्धतच मोठी विलक्षण होती. एकादं कुलंग कुत्रे जसं धन्याच्या मागून 
हिंडते, तसेच बाळासाहेब माझ्या बाजूनं फिरत असत, ' नको ' म्हणणं 
माझ्या जिववर येई. अगदीं इमानी नोकरसुद्धां धनिणीची सेवा 
बजावायला तयार नसेल इतक्या तत्परतेनं ते माझ्या सेवेला हजर असत. 

एकदां मी कॉलेजांत जायला निघाळे असतां त्यांनीं वाहणादेखील 
पुढं आणून ठेवल्या तेव्हां तर मला धक्काच बसला, 

खाणावळींतल्या लोकांच्या त॑ नजरेला आलं. कित्येक इंसले, कित्येक 
खाकरले नि कित्येकांनी डोळे फाडले; पण बाळासाहेबांच्या मुद्रेत एवढा 
सुद्धां फरक झाला नाही. निर्विकार चेहऱ्याने मी कॉलेजांत निघून गेले. 

कित्येक दिवस असा क्रम सुरू होता नि तो बंद करणं मला अद्वाक्य 
होऊन बसलं होतं-ऱत्याबरोबरच लोकांची चाललली थट्टा बंद करणं 
तितकंच अदाक्य झालं होतं. 

काय होईल तै होवो, कुणाच्या थट्ठेकडे किंबा टायल्यांकडे लक्ष 
द्यायचे नाही, असा मी मनाशी निधोर केला. 

मला निनावी पत्रे येऊं लागली. त्यांत अचकट विचकट मजकूर 
लिहिलेला असे. नुसता बाळासाहेबांचा संगरेंध जोडला असता तर मला 
फारसं अप्रस्तुत वाटलं नसतं; पण खाणावळींत जेवायला येणाऱ्या, 

९४ 


सुशिक्षणाचे अनुभव येऊं लागले 


परिचेत नसलेल्या, अशा कित्येक फॅशनेबल विद्यार्थ्योशी संबंध जोडून 
ज्यावेळीं मला पत्रं येऊं लागली त्यांवेळीं मी भांबावून गेळे, काय 
करावं है सुचेनासं झालं. 


मी तीं पत्रे कुणाला दाखवली नाहींत-सुलोचनेकडेसुद्धा त्या बाबर्तीत 
कांही बोलले नाहीं. आईकडे गोष्ट काढण्याची तर सोयच नव्हती. 

हा प्रकार सहन करणं आतां माझ्या शक्तीब्ाहेरचं झालं होते. खाणा- 
चवळीच्या भिंतीवर असंच कांहींतरी अचकट विचकट लिहून जाहिरनामे 
लावलेले ज्यावेळीं दिवाणजींनीं पाहिले, त्यावेळीं मी ही गोष्ट आईच्या 
कार्नी जाऊं न देण्याबद्दल दिवाणर्जींना बजावलं, 

बाळासाहेबांचा आणि त्यांचा जरी समेट झाला नव्हता तरीही, 
आपलें काम चोख बजावायच या बाण्यानं, ते बाळासाहेबांच्या 
वर्तनाकडे दुर्लक्ष करीत होते. त्यापुढं बाळासाहेबांनी पैशाची अफरातफर 
केली नाहीं. 

दिवाणरजींच्या नजरेला जेव्हां हे जाहिरनामे आले तेव्हां त्यांनीं पाळत 
ठेवण्यास सुरवात केली. एकेकदा तर त्यांनीं रात्रीच्या रात्री जागून 
काढल्या. 

एका रात्रीं गुन्हगार सांपडला. आश्चर्याची गोष्ट ही होती, को 
ज्या कांही विद्याथ्यीचीं नावं घेऊन माझ्यावर आरोप करण्यांत आले 
होते त्याच विद्यार्थ्याच्या टोळक्यांतला हा एक विद्यार्था होता---म्हणजे 
त्याचं नांव घेऊन देखील त्यानंच आरोप केले होते; दे जेव्हां मला दिसून 
आलं तेव्हा मी आश्चयचकित झाले. पाहाटे चार वाजतां येऊन त्याने 
हा जाहिरनामा चिकटबला होता. दिवाणरजीनीं त्याला मुद्देमालासहू 
पकडलं, नि मला जागं केलं, दिवाणजींनीं, संभावना करण्याचे जेव्हढे 
कांही शिष्ट-अशिष्ट प्रकार आहेत, त्या सगळ्या प्रकारांनी त्याची 
संभावना केली. 

९५ 


वेणू वेळणकर 


त्याला माझ्यापुढे आणून दिवाणजी म्हणाले, ““ एव्हढ्यानं भागायचं 
नाहीं, वेणूताई. तुमची चप्पल कुठं आहे तुमच्या चप्पलनं मी याला 
चांगला बडवणार आहे, ” 

दिवाणजीचं ते म्हणणं मला आवडलं नाहीं, मी त्यांच्या हातून 
चप्पल काढून घेतांना म्हटलं, “' आपल्यासारख्या वडील माणसांनी 
माझ्या चप्पलला हात लावणे बरं नाहीं, ” 

निगरगट्टपणें तो विद्यार्थी म्हणाला, “' बाळासाहेबांनी चपला आगून 
पुढ्यांत ठेवल्या तर चालतात वाटतं ? ” 

मला तिरमिरी आली नि त्यासरशी मी दिवाणजींच्या हातून काढून 
घेतलेलं चप्पल त्याच्या डोक्यावर मारलं. 

५६ आहाहा ! ” तो विद्यार्थी उद्गारला, '। आज मी धन्य झालो. 
माझ्या वलभेची चप्पल आज माझ्या डोक्यावर बसली ! ” 

५ मंड तर नाहीं ना हा ! ” मी उद्गारले, 

५६६कसल) मॅड !” दिवाणजी म्हणाले, “ अहो हं काव्प़ आहे. तुम्ही 
ओळखत नाहीं या विद्यार्थ्याना, मी यांना चांगळे ओळखतो. लेकाचे 
बायके आहित बेटे बायके, सकाळींच उठून वेणीफणी करून हँगिंग 
गाडेनवर पोरींच्या मार्गे जातात, त्यांच्या चपला खातात नि खुष 
होऊन कॉलेजांत, का शाळेंत, का कुठं तरी जातात. ” 

मी त्या विद्यार्थ्याला विचारलं “ तुम्ही कलिजांत जातां का ! ”" 

५६८ हो, जात होतो, ” तो म्हणाला, “'पण आतां अभ्यास करायला 
सुचत नाही. मी वेडा झालो आई--” 

“६ असं पहा दिवाणजी, *' मी म्हटलं, “' ह्या वेडा झाला आहे. 
याला ठाण्याला पाठवण्याची व्यवस्था करा, तिथं राहिला कांहीं दिवस 
म्हणजे येईल ताळ्यावर, ” 

तो कुठलीशी एक कविता गाऊं लागला अर्स पाहून त्याला दिवाण- 
जींनी बाहेर लोटून घालवलं, 

९६ 


सुशिक्षणाचे अनुभव येऊं लामले 


जवायच्या वेळीं निळेजासारखा तो आला. दिवाणजी त्याल बॉल- 
वून देत होते पण मी इन्‌कार केला. मी म्हटलं, “' असल्या माकढचे- 
षाची मला पवा वाटत नाहीं. काय चालायचे आहे ते खुशाल चालू द्या. ” 

मी बेफिकिरी दाखवली खरी, पग ती गोष्ट माझ्या मनाला 
लागल्याबाचून राहिली नाहीं, त्या दिवशी संध्याकाळी मी जमनाबेनच्या 
आईला भेटायला गेलें नि झालेली सारी हकीगत तिला सागितली. ती 
म्हणाली, “' ह्या प्रकार कांही नवा नाही. माझ्या जमनालादेजील अशी 
पत्रं येत असतात. ती मळा आणून दाखबते. वेडे आहेत म्हणून सम- 
जावं नि खस्थ राहावं । ” 

त्यावेळीं सुलोचनेलाही तोंड फुटलं. ती म्हणाली, “: अगदीं ठराविक 
अक्षरांत लिहिलली अश्शी कांही पत्र मला येतात. त्यांत अचकट विच- 
कटपणा नसतो. मी ती सगळी पत्र जपून ठेवली आहेत. आईल्स किंबा 
बाबाना कुणाला दाखवली नाहींत. तुझ्याकडे देखील बोलले नव्हते अजून. 

': मला दाखव पाहूं तीं पत्रे, ' मी म्हटल. 

जमनात्रेनच्या आईशी मी बोलत बसले होतं तोंपयंत तिनं घरा 
जाऊन पत्रे आणटीं, मी तीं पाहिली, त्या पत्रात गोष्टी प्रेमाच्या होत्या 
स्वऱ्या पण ' प्रेम ? हा शब्द त्यांत कुठंच आला नव्हता. लखकाला 
सुलाचनेच्या मनावर प्रामाणिकपणे पारेिणाम करायचा होता, असं वाटत 
दवोतं. त्यांतले एक पत्र मला महत्वाचं वाटलं, त्याच्या शेवटीं लिहिलं 
हात, “' प्रमाने मी वेडा झाला आहे, अते म्हणणाऱ्या तरुणांप्रमार्ण 
मी भलतीच भाषा बापरीत नाहीं, तुझ्याशी सुखाचा संसार थाटावा 
अशी माशी इच्छा आहे. तुझ वडील श्रीमत आहेत, मी एक दिदी 
माणूस आहें. अन्नालासुद्धां मोताद आहे. परक्यांच्या उपकृतीस्कर्ळी 
माझा चारितार्थ आणि अभ्यास चालला आहे. - पुढले भविक्व्य 
मला उज्वल (दिसते आहे, तुझा हात जर मला मिळाला तर आयुष्य 
उज्बल करण्यास मी समर्थ होइन, तूं मला पाहिलें आहेस पण मी कोण 

र| ९७ 


वेणू वेलणकर 


आहे हे आज प्रकट करण्याची माझी इच्छा नाहीं, तुझ्याकडून पत्राच्या 
उत्तराची मी अपक्षा करीत नाहीं. नुसत्या दृह्िक्षेपानं सुद्धा तुला ओळख 
दाखवण्याचा मी प्रयत्न करणार नाहीं-मग त्या हृट्टिक्षेपाला तुझ्याकडून 
उत्तर मिळावे असं कशाला मला वाटेल ! मी हीं पत्रे कां लिहितां असे 
तूं मला विचारशील ! पण-माझा नाइलाज आहि. मन अनावर होऊं 
नये, वासना जागी होऊ नये, मलभलत्या कल्पना मनांत येऊ नयेत, 
एवढ्यासाठी मी ह पत्रे लिहितो. तीं तुला पाठवावीत अशीसद्धां माझी 
इच्छा नसते. पण मी तुला ती कां पाठवता, हे माझं मलासुद्धा कळत 
नाही --वाचल्यावर , ही पत्रे तू विसरून जा, असे मी म्हणणार नाहीं. 
योगायोग असला तर आपली भेट होइल आणि भेट झाली तर माझी 
खात्री आहे. कीं तूं मला पारखी राहणार नाहींत. ” 

पत्रं लिहिणारा माणूस अगदींच ब्रेफाम नसावा असं मला वाटलं. 
असं त्रिलक्षण वतन हा कां करतो, याचा बिचार करण्यासाठी मी पुन्हां 
पुन्हां त्या पत्राचे निरीक्षण करू लागलें तेब्ह्यां मला दिसून आल, की 
अक्षर माझ्या आळखीचं आहि. 

कुठं पाहिलं होतं इं अक्षर मी ? मी डोक्याला बराच ताण देऊन 
पाहिला. मला थोडा संशय आला म्हणून मी या गोष्टीचा छडा लाव- 
ग्याचा निश्चय केला. 

त्यादिवशी रात्री खाणावळींत साफसुफीचे काम चालू 
असतां मी बाळासाहेबांना बोलावून घेतलं, मी माझ्या उजव्या 
हाताच्या दोन बोटांना चिंधी बांधून धतली होती. बाळासाहेब आले 
यावेळीं मी त्यांना म्हटलं, “' माझी बोटं कापली आहित, मला लिहितां 
येत नाहीं. एव्हढे हे संस्कृत श्लोक जरा उतरून द्या पाहूं. बाळासाहेबांनी 
लागलीच लिहिण्यास सरवात केली नि नक्कल पुरी होतांच ते कागद 
माझ्याजवळ दिले. 

* एव्हढच काम १ ” बाळासाहेबांनी विचारलं, 

र्ट 


सुशिक्षणाचे अनुभव येऊं लागले 


मी ' हो ” म्हणतांच ते निघून गेले 

साऱ्या गोष्टींचं निराकरण झाले. ते अक्षर बाळासाहेबांचं होत. दोन्ही 
अक्षरं मी ताडून पाहिली. 

बाळासाहेबांनी पूर्वी एकदां सुलोचनेत्रद्वल केलेले प्रश्न मला आठवले. 

मला प्रश्न पडला, प्रामाणिकपणं ही पत्न लिहिलीं आहेत का ! खरोा- 
खर्च बाळासाहेबांना सुलोचनेबद्दल कांही ओढ आहे का! मग “मी 
विद्यार्थी आहे अत भासवण्याचा प्रयत्न या पत्रांत कां केला जात होता ? 

मला आणखी आश्चर्य वाटलं, मला वाटलं होते तितके बाळासाहेब 
भोळे नव्हते. पत्रं लिहिण्यांत त्यांनीं चांगलंच लेसखनकोशल्य दाखवलं 
होतं. विशिष्ट उद्देशानं लिहिलेली तीं बनावट पत्र, खरीं वाटण्याइतकी 
बेमालूम होतीं. अगदीं कसलेल्या लेखकाला शोभेल इतकं लेखनकोशल्य 
या पत्रांत दाखवलं जात होते. 

ती गोष्ट मी तेवढ्यावरच सोडून दिली. सुलोचनेकडे बोललं नाही 
कीं बाळासाहेबांनाही त्याची दाद लागू दिली नाही. 

असेच कांहीं दिवस गेल. पुन्हा सुलाचनेला पत्र आले, त्यावेळीं तिनं 
तं मला दाखवलं. ' यंदा परीक्षा पास झालो म्हणजे मी येऊन तुला 
ओळख देईन ? वगेरे मजकूर त्या पत्रांत होता. 

मला पुन्हा संशय आला. अक्षरासारखं अक्षर तर नसेल, खरोखरच 
एकाद्या विद्यार्थ्यांने ह पत्र पाठवलं नसेल का ? उगीचच बाळासाहेबांचा 
संदय कांघध्या ! 

दुसऱ्या दिवशीं दुपारी मी बाळासाहेबांना बोलावणं पाठवले. ते 
येतांच सरळ पत्र त्यांच्या हाती दिल॑ नि म्हटलं, “' हे अक्षर तुर्म्ही 
ओळखतां का? ” | 

बाळासाहेब कां वेळ त्या पत्राकडे, कांहीं वेळ माझ्या चेहऱ्याकडे, 
आळीपाळीने पाहात होते. मी पुन्हां तोच प्रश्न केला त्या वेळीं ते 
म्हणाळे, “ हो! ” 

९९ 


वेणू वेलणकर 


: कुणाचे अक्षर ईं £? ” 

५ हू माझे अक्षर आहे. हें पत्र मी लिहिलं आहे. 

“६ कुणाला ? ” 

५६६ सुलाचनेला. ” 

५ सुलोचनला कां? ” 

५६ हूं एक माझं वेड आहे. कुणीं तरी माझ्यावर प्रेम करावे असं मला 
वाटतं. कुणी तरी अतःकरणाच्या भावनेने माझी आठवण करावी असं 
वाटतं. माझ्या पाहाण्यांत तुम्ही दोघीच आलां आहांत. तुम्हां दोघींचीच 
मला साधारण माहिती आहे. एकदां वाटलं होतं, की असं पत्र लिहून 
तुला पाठवावे, पण पुन्हां मी विचार केला. माझ्या उद्देशाचा चरिताथे 
झाला नसता. तू ओळखलं असतंस. सलोचनेला मी पत्रे पाठवली 
अहित, तीं ती तुला दाखवील असं मला वाटलं नव्हतं. मी फार खबरर- 
दारी घेत होतो. माझ्यावर विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस, मी कधींच 
तिला ओळस्त्र दिली नसती किंबा कबुलीही दिली नसती-तशीच मी 
तिच्याकडून कोणत्याच प्रकास्ची अपेक्षा ही करीत नाहीं. मी काय 
म्हणती त॑ कदाचित तुला कळणार नाहीं. कुणी तरी अतःकरणाच्या 
जाणिवेन--जिवाच्या जिव्हाळ्याने--तळमळीनं--कळकळीने-काळीज 
तोडून माझ्याकडे पाहावं--माझी आठवण करावी--कुणी म्हणजे 
भलत्त्याच कुणी नव्हे-माफ कर-कुणा तरुणीने---अविवाहित तरुणीनं 
माझी अश्ला आठवण करावी, एव्हृढयाच करतां मी ही पत्रं लिहितो. 
मळा काय वाटतं तं स्पष्ट सांगतां येत नाही. कल्पना होत असली तर 
तुझी तूंच पहा. पण अगदीं निर्मळ अंतःकरणाने--निरपेक्ष बुद्धीनं 
मी ही पत्रं लिहिलीं आहेत. कृपा करून या पत्रांवरून गैरसमज होऊं 
देऊं नकोस किंवा त्या बिचारीला माझे नांबही कळवूं नकोस---” 

६: क्रां? नांव कां कळवूं नको ? ” मी विचारलं. 

:६ मी अज्ञींच तिला पत्रे घालीत राहाणार आहे. त्यांत माझ्या 


०० 


सुशिक्षणाचे अनुभव येऊ लागले 


मनाला समाधान आहे. मी चरित्रहीन होऊं नये असं तुला वाटत 
असेल, तर कृपा करून माझी ओळख त्या बिचारीला देऊं नकोस. ” 
तो विलक्षण प्रकार ऐकून मी थक्क झाले. मानसशास्त्रांतलं हे एक 
गूढ प्रमेय आहे असं मला वाटलं. 
मी वचन दिलं तेव्हां बाळासाहेब निघून गेले. तें वचन पाळायचे 
नि पुढं काय होतं तं पाहायचं, असा मनाशी ठाम निश्चय करून मी 
मूग गिळून स्वस्थ बसलं. 


१०१ 


प्रकरण १० 
सखुलोचनेचं लग्न झालं 


आणखी कांही दिवस निघून गेले. साऱ्या गोष्टी पूर्वीप्रमाणेच चालल्या 
होत्या. तीच थट्टा, तींच पत्रं, तेच जाहिरनामे--नि बाळासाहेबांची ती 
तश्ीीच सेवा करण्याची पद्धति-सार कांदी पूर्वीप्रमाणेच चाललं हतं. 

बाळासाहेबांच्या भाषणाचा माझ्या मनावर परिणाम झाला होता. 
'त्यामुळ माशी वृत्ती मात्र पूवीची राहिली नव्हती. हा मनुष्य दांभिक 
आहि, लबाड आहे, काँ बदमाद आहे, याची मला कांद्दीच कल्पना 
ठरवतां येईना. पत्रे लिहिल्याचं त्यांनीं प्रामाणिकपणे कबूल केलं याचंच 
मला आश्चर्य वाटलं. त्यांनी नाकबूल केलं असतं तर त्याच्या प्रामागिक- 
पणाबद्दल मला ठोका आली असती. माझ्या मनानं एकच घेतलं, की 
माझ्यापुढं खोटं बोलायची बाळासाहेबांची टाप नाही. 

६६ हूल बरेच दिवसांत पत्र येत नाहीं. सुलोचना म्हणाली. तिला 
चुटपुट लागल्यासारखी झाली होती. त्या पत्रांची तिला एक प्रकारची संवय 
लागली होता. तसलीं तीं पत्रे यावीत नि त्यांच्यावर मनोाराज्यं बाधावींत 
अक्षी आपल्याला संवय लागल्याचे तिने मनमोकळेपणानं माझ्यापुढं 
कबूल केल होतं नि त्यामुळेच तीं पत्रे बंद झाल्यानं ती अस्वस्थ झाली. 

बाळासाहेबांना मी सरळ सरळ विचारलं, '“ मी पत्र पाठवीत 
राहाणार ?) असं मला बजावून देखील आतां पत्रे बेद कां केलींत ? ” 

ते म्हणाले, “ मी विचार करता. आहे. कांही निश्चय ठरवतां येत 
नाहीं मला. ” 

१०२ 


सुलोचनेचं लग्न झालं 


५६ किती विसंगत बोलतां आहांत बाळासाहेब ! मनांत येणारे विशिष्ट 
प्रकारचे विचार नाहींसे होण्यासाठीं जो उपाय म्हणून तुम्ही करीत होतां 
तो उपाय जर असा बंद ठेवलांत, तर तुमचे मन नाही का बिघडणार! 
पर्यायानं तुमचं चारित्र्य नाही का बिघडणार ! ” 

५६ तोच अंदाज मी पाहातो. आहे. ” बाळासाहेब दोन्हीं हातांनो 
डोकं धरून जामेनीकडे पाहात म्हणाले, '“' पण माझ्या मनाचा अंदाच 
लागत नाही. पत्रे पाठवणं बंद केल्यामुळे माझे मन अस्वस्थ झालं 
आहि. पत्रं पाठवावी असं वाटतं पग आतां ते तुला कळलं असल्यामुळे 
पत्र लिहिण्यातलं स्वारस्य गेलं. ते माझं गुपित होतं. ते जोपर्यंत गुस 
होतं, तोंपर्यंत त्यांत मजा होती--नि ती मजा होती म्हणूनच मनां- 
तल्या क्लूस कल्पना विसरल्या जात होत्या. आतां तसं होणार नाई. 
कां माझे हे नुकसान केलस £ कां असा घात केलास? मी काय असं 
तुझं वाईट केलं हाते, का. माझ्या आयुष्यांतलं एवढंच सुख नाहीसं 
केलस ?£---?” 

बोलत असतांना ते माझ्याकडे पाहात नव्हते, अगदीं जमिनीकडे 
पाहून ब्रोलत होते. त्यांच्या मनांत चाळलेली खळबळ त्यांच्या प्रत्येक 
शुन्दासरशी फुटून बाहर पडत होती. 

मला त्यांची फारच दया आली. मी म्हटलं, “' असं पहा बाळा- 
साहेब, असा उद्देग करून घेऊं नका. उद्देग केल्यानं मनाला समाधान 
मिळत नाही, त्याला कांही तरी उपाय केला पाहिज, तुम्हांला वाटतात 
तशीं नुसती पत्रं लिहित जा. पाठवू नका पाहिजि तर-किंवा असं करा- 
कुणाला तरी पत्र पाठवलंच पाहिजे असं असलं, तर मला पाठवा ना ती 
पत्रं !--* बाळासाहेबांनी एकदम माझ्याकडे वर पाहिलं. त्यांच्या 
डोळ्यांत एक विलक्षण चमक आळी होती. 

अगदी गंभीर होऊन बाळासाहेब म्हणाले, ““ मग पत्र तरी कशाल 
पाठबायला हवं ! हथंच बोललं तर काय बिघडतं? ” 

१०३ 


वेणू वेलमकर 


५८ तो तुमचा पूर्वीचा उपाय बर! आहे. ” मी शक्‍य तितका गंभीर 
'पणाचा आव आणून म्हटलं, “' हा नुसता उपाय आहे, ध्यानात ठेवा, 
हं नुसतं ओषध आहे. त्याच्यापलीकडे भलत्या कल्पना मनांत आणा- 
यच्या नाहींत. अगदीं मनाचे समाधान करून घ्या. तुम्हांला जितक्या 
मोकळेपणानं जर्शी पत्र लिहायची असतील तशी लिह्दा, मात्र मयोदा 
ओलांडतां नये, इं ध्यानांत ठेवा, 

५६ ठीक आहे. ” असं म्हणून बाळासांहब नित्याच्या संवयीप्रमाणे 
'तांवडीनं निघून गेल. 

माझे मलाच आश्चर्य वाटलं. काय वेडेपणा केला मी हा ! याचा 
अडताच फायदा बाळासाहेबांनी घेतला तर £--नि भलताच परिणाम 
माड्या मनावर झाला तर !-- 

मी आतां तशी कांहीं लहान नव्हते. आई म्हणे, ' तुझ्या वयाच्या 
आम्ही होतो तेव्हां आम्हांला दान दान मुलं होऊन गेलीं होती ! ” 

आजऱचा काळ निराळा होता. आजच्या काळात माझ्या बरोबरीच्या 
कोणत्याच मुलींना मुल झालीं नव्हृती किंवा त्यांची लग्नं सुद्धां झाली 
'नव्हती. कितीकांच्या मनांत लम्न नि मुल, अश्या प्रकारच्या कल्पनासुद्धा 
आल्या नव्हत्या. 

माझ्या मनांत देखील ती कल्पना यायला नका होती. मी कुटुंबांत 
वावस्त नव्हते. आमच्या घरांत कुणीं जोडपी नव्हती. लमकार्याला 
मला कुणी बोलावीत नसत, कारण माझी आई विधवा नि मी खाणा- 
बळवालीची मुलगी--कुणीं बोलाबलंच तर आई मला जाऊं देत 
नखे--तिला वाटे माझा तिथं अपमान होइल. अशा प्रकारे कोडुंबिक 
'कल्पना मनांत येण्याजोगी परिस्थति नसतांही, मी हें संकट माझ्यावर 
कां ओढवून घतलं ! माझं मलाच आश्चय वाटलं. 

, सुलेचनेच्या मनावर फार विलक्षण परिणाम झाला होता. ती 
'अगर्दी वेडावल्यासारखी झाली होती. इतर मुलींना पत्रं येतात ह 
१०४ 


सुलोचनेचं लग्न झालं 


तिला माहीत होते. त्यांतली कांही पत्रं त्यांना आवडतात--कांहींबद्दल 
तिटकारा येतो. अशा येणाऱ्या कांहीं पत्नांतीन एका मुलीच्या लग्नाचा 
यांगायोग आला होता. आपल्याला पत्रे येतात हं कांही तरी विदाष 
आहे, कुणाचं तरी मन आपल्याकडे ओढलं जातं, असा बायकी अभि- 
मान, अज्ञा व्हानिटी, जी तिच्या अतःकँरणांत गाजत होती, तिचा त्या 
पत्रांनी चरितार्थ होत होता. 

सुलोचनेचे हृ बेड दिवसेदिवस विकोपाला जाऊ लागलं, तिला 
अभ्यास सुचेनासा झाला. रस्त्यांतून जाणाऱ्या प्रत्येक तरुणाकडे ती 
उगीचच निरखून पाहूं लागली. आपल्याकडे कुणी पाहाता आहे का 
मान वळवून !---हे पाहण्याच्या बाबतींत ती इतकी बसावध राहूं 
लागली, की रस्त्याने जाणारांच्यादेखाल ते सहज ध्यानी यऊं लागलं. 
ती चूक मी तिच्या नजरेला आणून दिली--पण माझा उपदेश तिच्या 
गळी उतरेना. 

ती मला म्हृणाळी, “' तुला इं कळायचे नाही. अशी पत्रं आलीं 
असतीं तुला, नि तीं नंतर बंद झाली असतीं, म्हणजे मी काय म्हणते 
ते तुला कळलं असतं. तूं वाचली आहेसच तीं पत्र, कोण बिचारा 
असेळ तो ? इतकां वक्तशीर पत्रे पाठवायचा---तो बेद कसा झाला १ 
आजारी तर नार्टी पडला ! पत्तासुद्धा त्यानं कसा लिहिला नाही --पत्ता 
कळता तर मी चौकशी तरी केली असती. मला काय वाटतं ह तुला 
सांगायला माझ्याजवळ शब्द नाहीत. कशाला उगीच बोलूं ! ज्याचं जळे 
त्याला कळे ! ---” 

असंच कांहीतरी असंबद्ध बोलत ती इतकी वाहावत गेली, कीत 
एकून मला भीति वाटूं लागली, 

तिला पुन्हां पत्रं पाठवायला बाळासाहेबांना सांगणं मला योग्य वाटले 
नाही म्हणून मीच एक युक्ती युक्ती काढली नि तिला उत्र लिहिलं 
त॑ असंः-- 

१०५ 


वेणू वेलणकर 


५ कोणत्या विशेषणांनी तुला संबोधू ! पूर्वी जी विदोषणं मी तुला 
लावीत होता. तीं लावायचा अधिकार आतां मला राहिला नाहीं. तरे 
पत्र लिहिण्याच्या परित्थतीपलीकडे मी गेलो आहे. मनाची इच्छा 
असते एक आणि देवी असते भलतेच. वडील माणसांचे मन मी 
मोडले असते तर माझं पुढले शारे आयुष्य फुकट गेलें असते. त्यांच्या 
अधिकाराला मी बळी पडलो आणि विवाहबद्ध झालो, हे कळवण्या- 
साठीं तुला मी हे शेवटचं पत्र लिहीत आहे. या जन्मांत आतां आपली 
गांठ पडणे शक्य नाहीं आणि मी काण हे कळवण्याची आतां जरुरीही 
राहिली नाहीं--- 


मी पत्र लिहिलं खरं पण अक्षराचे काय, हा प्रश्न मला पडला. बाळा- 
साहेबांसारखं अक्षर काढणे मला हक्‍्य नव्हतं नि दुसऱ्या अक्षरांत जर 
पत्र गेल असतं तर तिचा विश्वास बसला नसता. 

चटकन्‌ माझ्या डोक्यांत कल्पना आली. म्हटले बाळासहितवांची 
एकदा कसोटी पाहावी. 

मी बाळासाहेबांना हाक मारली, ते आले तेव्हां त्यांची मद्रा घाबरल्या- 
सारखी झाली होती. 

६ का बालावलंस ? ” ते म्हणाले, “' तुझा बेत फिरला का?” 

६६ नाहीं, ” मी म्हटलं, '' पण त्या बेताला पक्कं महत्त्व येण्यासाठी 
तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. मी इं पत्र लिहिलं आहे. याची 
इथेच बसून मला नक्कल करून द्या: 

त्यांनीं तें पत्र हाती घेतलं नि बाचून पाहिल्यावर म्हटलं, ““ ह यत्र 
चालणार नाहीं --” 

£६ मग कसं पत्र पाहिज ? ” मी विचारलं. 

५ ते मीच लिहितां. ” बाळासाहेब म्हणाले. 

१०६ 


सुलोचनेचं लम झालं 


एक क्षणभर मला बिचार पडला, 

: माझ्यावर विश्वास ठेव ? अत म्हणून बाळासाहेब निघून गेले. 
माझं मलाच आश्चर्य वाटलं. एकेक काय प्रशंग ओढवून घेत आहे मी !' 
बाळासाहेबांनी असं पत्र लिहिलं नि पुन्हां ते बनावट आहे म्हणून कळ- 
बलं तर मग या पत्राचा उपयोग काय ? कदाचित सुलोचनेची भेट 
घेतली नि झालेली हकीकत तिला सांगितली--तर माझी एकुलती एक 
मेत्रीणसुद्धां मी गमावून बसलें असते. 

ही परीक्षची वेळ होता, त्यांत माझीही परीक्षा होती नि बाळासाहे- 
बांचोहे होती, आदोचा एक अंधुकसा किरण मला समोर दिसत होता. 

बाळासाहेबांना मी मोठ आमिष दाखवलं होतं. त्या आमिषाला 
भुटून जर त --- 

बाळासाहेब पत्र लिहून घेऊन आले-- दोन्हीं पत्रे मी ताडून पाहिली, 
त्यावेळी मला पटलं, काँ बाळासाहेबांचे म्हणणंच खरं होतं. माझ्या 
सम|[रच पोशचं पाकेट पत्ता लिहून त्यांनी माझ्याजवळ दिलं नि कांई| 
न बोलतां ते निघून गेले. 

दुसऱ्या दिवशी सुलोचना कॉलेजांत आली नाही. कलिज सुटल्या- 
नतर मी तिच्या घरी गेले तेव्हां ती तापानं फणफणत असल्याचे मला 
दिसून आलं, मी जबळ जाऊन बसलें तेव्हां ती एक शब्दसुद्धा बोलली 
नाहीं. कितीतरी वेळ माझ्याकडे नुसती पाहात राहिली. 

एकदम तिला रडूं कोसळलं, तिनं इकडे तिकडे पाहिलं, उश्याखाली 
हात घातला नि रडत रडत ते पत्र माझ्या हाती दिलं. 

पत्र बाचून मी तिच्याकडे परत दिलं तेव्हां ते घऊन तिनं त्याच्या 
चिंध्या करून भिरकावून दिल्या, 

:: तूं म्हणतेस तंच खरं वेणू , ती म्हणाली, “' पुरुषांवर विश्वास 
ठेवू. नये, काय भाषा पाघळली आहे ! लाज नाही वाटत मेल्याला माझं 
लयन झाले म्हणून सांगायला ? मग कशाला मला पत्र लिहीत होता £---” 

१०१५७ 


वेणू वेलणकर 


६ आतां पटलं ना !” मी म्हटलं, “आतां हे वेड डोक्यांतून काढून 
टाक नि त्याच्याबरोबर हा ताप देखील फेकून दे पाहूं. 


“६ या पत्रानं मळा ताप आला, असं कां तुला वाटले £'” सुलोचना 
म्हणाली, '' नाहीं बर, मला ताप आला त्याचं कारण निराळं आहे-” 


ती कांहीं बोलत नाहीं असं पाहून मी विचारले “' काय कारण?” 

त्रासल्यासारखे करून ती म्हणाली, ““ कारण तुझच कपाळ ! तुला 
एव्हढेच कळायचं ! तूं जा पाहूं इथून. तूं समोर असलीस तर माझा ताप 
आणखी वाढेल.” 

५: बरे तर-आतां उद्यां येईन.” असं म्हणून मी तिथून उठले. 

सुलोचनेच्या आईला एका बाजूला घेऊन मी झालेली सव हकीकत 
सांगितली, सदाशिवरावांना ती न कळूं देण्याचं मी तिच्याकडून 
बचन घेतलं, 


6 मला वाटलंच तं ! ” सुलोचनेची आई म्हणाली, “' दुसरं कांही 
नाहीं, पोरीला कुणाच्या तरी गळ्यांत बांधली पाहिजे. पुरे झालें ह 
कॉलेज नि शिक्षण !” 


सुलोचना बरेच दिवस आजारी होती. ती बरी झाली पण तिन 
काठेज सोडले, तिची माझी गाठ क्वचितच पडू लागली, मीच 
मुद्दाम जाऊन भेटे त्या वेळीं तिची भेट होई; पण तिचा स्वभाव 
अगर्दींच बदलून गेल्यामुळे मला तिच्याबद्दल वाटत असलेली आपुलकी 
नाहीशी झाली. 


बाळासाहेबाना ती हकीकत मी मुळींच कळवली नाही-नित्यांनाती 
कळलीही नसावी, एक दिवस मला अचानक कळलं, कीं सलोचनेचे 
लम्न झाल. 


मला आश्चर्य वाटलं--मला नुसतं कळवू सुद्धां नये या लोकांनी ! 
१०८ 


प्रकरण १८ 
मी स्वेळ खेळू लागलें 


सुलोचनचं लग्न झाल्याची बातमी कळतांच मी तिच्या घरी गेले. 
सुलःचना सातरीं निघून गेली होती. मला पाहातांच तिची आई 
ओझाळली, ती म्हणाली, “' तुला आमंत्रण द्यायला पाहिजे होतं. पण 
कसं चुकून राहिलं कोण जाणे, सुलोचनादेखील विचारीत होती. पण 
झालं तं झालं ! बरं घर मिळालं सुलोचनेला. नवरा म्युनिसिपालटींत 
नोकर आहे. चांगल पन्नास रुपये पगार मिळवतो आहि--? 

£ झालं त॑ बरं झालं, मी म्हटलं, “' तुम्ही गडबडीत विसरलां 
असाल---पण सुलोचनेनं मला नुसतं येऊन कळवूंसुद्धा नये, याचं मला 
वाईट वाटलं. बरं स्थळ मिळालं. बरं झालं. आली माहेरी तर मला 
कळवा. जमल्यास भेटून जाईन. लग्नाचं आमंत्रण द्यायला नाही. आली 
ती आतां लग्न झाल्यावर कसली येऊन भेटते म्हणा ! ” 

५: असं वाइट वाटून घेऊ नकोस बाई ! ” सुलोचनेची आई म्हणाली, 
£ चूक झाली खरी. आतां ती कबूल केल्यावांचून गत्यंतर नाही. 

मी निरोप घऊन निघाले. ही कसली चूक ! खाणावळबाइच्या 
मुलीला बोलवायचं नाहीं, एव्हढाच त्यांतला इत्यथं होता. 

सुलोचनेचे लग्न झालं, ते मी तिच्या पत्रापत्रीची हकीकत सांगि- 
तल्यामुळं, असं असतांना माझी आठवण झाली नाहीं, हें किती शपथा 
घेऊन सांगितलं असतं तरी मला खरं वाटलं नसते. 

१०९ 


वणू वंलणकर 


सुलोचनेचं लम झाल्याचं मी बाळासाहेबांना कळवलं; तेव्हा ते 
कांहींच बोलले नाही. त्यांना वाईट बाटलं कीं काय, हें त्यावेळीं त्यांच्या 
चेहऱ्यावरून दिसून आलं नाहीं. त्यावरून मी असा अंदाज केला, 
की बाळासाहेबांनी तिला जीं पत्र लिहिलीं होती ती नुसती त्यांच्या 
समाधानासाठी होतीं असं ज॑ त्यांनीं सांगेतलं, त्यांत कांहीं सत्यांशा होता. 

असच आणखी कांही दिवस गेले. या मधल्या मुदतीत विज्ञप 
कांहीं घडलं नाहीं. 

एक दिवस मी आश्च्थचकित झालें. बाळासाहेबांचं पत्र पाष्टानं 
आलं.--मी जवळ जवळ विसरून गेले होते- किंवा तो विषय 
मनांतून काढून टाकला होता म्हणा ना--पण बाळासाहेबांचं पत्र 
आलं त्यावेळी पूर्वीच्या गोष्टी माझ्या नजरेसमोर उभ्या राहिल्या. पत्र 
ज्यावेळीं मी वाचायला घेतलं त्यावेळीं तर मी अगर्दी थक्कच झालं. 
सुलोचनेला जात होतीं त्या पत्रांत नि या पत्रांत जनिअस्मानाचचं अंतर 
होत. 

या पत्रांत बाळासाहेबांनी कोणत्याच प्रकारचा बनावटपणा केला 
नव्हता. पत्राची भाषा साधी होती तशींच सिधी होती. त्यांत त्यांनी 
आपल्या पूर्वीच्या हकीकतीच बऱ्याचशा लिहिल्या होत्या. लहानपणच्या 
वर्तनाबद्दलचीसुद्धां जवळ जवळ क्षमा मागितली होती. प्रस्तुतच्या 
परिस्थिति बद्दल उपकार व्यक्त केले होते नि शेवटी लिहिलं होतं, 
६ जन्मभर मी चुकत आला आहे. इतरांच्या मानानं माझं आयुष्य काही 
मोठं नाहीं, पण या एवढ्याद्या आयुष्यांत मी किती तरी चुका केल्या आडत. 
चुका केल्या हें मला कळतं---पण त्यांच्याबद्दल मला पश्चात्ताप होत 
नाहीं. पुढल्या आयुष्यांत मी तसल्या चुका करणार नाहीं; पण पूर्वीची 
परिस्थतीच अशी होती, कीं त्या चुकांबद्दल मी जर पश्चात्ताप प्रदर्शित 
केला तर तो माझा प्रामाणिकपणा होणार नाई. पत्र लिहायला मी 
ज्यावेळीं सुरवात केली त्यावेळीं कांहीतरी काव्य करावं असं मला वाटल' 

११०८ 


मी खेळ खेळूं लागलें 


होतं; पण लिहितां लिहितां वृत्ती बदलली. कांही लिह्वायचं तं प्रामा- 
णिकपणानं लिहायचं असं ठरवून मी लिहू लागलो. तोंडी किंवा लेखी 
उत्तराची मी आशा करीत नाही. 

शोवर्टी कोणत्याच प्रकारचा मायना न लिहितां नुसतीच सही 
केली होती. 

त्या पत्रात त्यांनीं जे जे काहीं आणखी लिहिले होतं, ते इथे लिहून 
ठेवणं मला बरं वाटत नाहीं. त्यांत जशा चुका होत्या तसेच गन्हेही होते. 
अविचार होते तसेच अनाचार: होते.--व्यभिचारसुद्धां होते. 

तरीही ते पत्र मला आवडले. त्या पत्राचा माझ्या मनावर परिणाम 
झाला. पश्चात्ताप होत नाही, असं जरी बाळासाहेबानी म्हटलं होतं तरी 
अशाप्रकारे झालेल्या गुन्ह्याचा कबुलीजबाब देणं म्हणजे एकप्रकारचा 
पश्चात्ताप प्रदरशेत करणेच होय, असं मी धरून चाललें. 

त्या रात्री मला झोप लागेन्म. त्या पत्रांतला मजकूर सारखा माझ्या 
डोक्यांत घोळत होता. गुन्ह्याची कबुली द्यायलादेखील कांहीं थोडं- 
थेडकं धेय लागत नाहीं ! 

मला वाटल, हा माणूस धीराचा आहे--लेचापेचा नाही. याल! 
स्वाभिमान आहे पण माझ्या लहनपर्णी नाझर म्हणत असत तसं, याला 
याच्या वडील माणसांनी वळण लावलं नाही, हे एक कीड लागलेलं 
गोड फळ आहे, तेव्हढी कीड काढून टाकली कीं--- 

माझं मलाच आश्चर्य वाटलं--ही नुसती सहानुभूती का £--कों 
दया !--कीं याहीपेक्षा पुढल्या पायर्रीचा प्रादुमांव माझ्या मनांत होत 
होता ! बोलून चाढून हा भ्रष्ट पुरुष, याच्याबद्दल मनांत सहानुभूती 
उत्पन्न होणें, म्हणजे सुद्धां माझ्या मनाचा दुबळेपणा नव्हे का! 

चारचोघांत जर त्यानं ही हकीकत कबूल केली असती, तर लोकांनीं 
त्याचे वाभाडे काढले असते--त्याला तुच्छ ठेवलं असते--जवळ उभं 

११३१ 


बेणू वटणकर 


सुद्धा केलं नसतं. मला तसंच वाटलं पाहिजे होतं. मग मला सहानुभूति 
कां वाटली ? 

विचारांच्या भ्रमणाने मी कातावून गेलें. जीव अगर्दी कावल्या- 
सारखा झाला. माझं मन दुबळं झालं आहे असं मला वाटूं लागलं, 
माझ्या खंब्रीरपणाबद्दल मला अभिमान वाटत होता, माझ्या खंकार- 
पणाच्या जोरावर मी बाळासाहेबासारख्या भ्रमिष्ट माणसाला बंगवले 
होत-- तीच मी, त्याच्या एका पत्रामुळे, अशी वितळून जाऊं लागलें 
तर माझ्या अभिमानाचा बडिवार काय १ 

झोपेतसुद्धां मला 'त्या पत्रांतल्या कदीकतीरची स्वप्ने पडत होती. 

दुसर्‍या दिवशी कालजांतून येतांना मी जमनातरोबर तिच्या घरी 
गेळें. झालेली सारी हकीकत मी तिच्या आईला सांगितली, माझी 
केकियत ऐकून ती विचारांत पडली. ती कांहीच बोलत नाहीं अते 
पाहून मी मनांतल्या मनांत कोमेजून गेलें. 

मी तिला विचारले, “' माझी चूक झाली का? कुठं चुकले मी! 
नि चुकले असलें तर ती चूक दुरुस्त कशी करायची १ ” 

£६ काय उत्तर द्यावं दंच मला कळत नाहीं. ती म्हणाली, “तुझ्या 
घेर्यांचे माच मला कोतुक वाटतं. केवढं धाडस केलेस तू हे ! एकाद्या 
मवाली माणसाला प्रेमपत्र लिही म्हणून सांगणं ! मला दुसऱ्या कुर्णी 
सांगितलं असतं तर खरं देखील वाटलं नसतं मला आश्चर्य वाटतं ते 
हेंच, की प्रेमपत्रिका न लिहितां त्यानं आपल्या दोषांचा पाढा तुझ्यापुढं 
वाचला. मठा वाटतं त्याची सद्सदविवेक बुद्धि जागी झाली आहे. अदा! 
वेळीं त्याला दुखवू नकोस. एकाद्या चुकीबद्दल ।कवा गुन्ह्याबद्दल 
एकाद्या माणसाला जर आपण डिवचलं तर तो इरेला पडतो नि दुप्पट 
चुका करूं लागतो. तुझे चाललं आहे तं.बर अहि स्वतःच्या अंत:करणांत 
सावधगिरी ठेव आगि जे जै कांही घडेल ते मला सांगत जा, 

११२ 


मी खेळ खेळूं लाग 


वुसऱ्याला सांगेतलं म्हणजे आपण कसं वागायचं हे आपोआप आप- 
ल्याला कळूं लागतं, असा माझा अनुभव आहे. ” 

जमनाबेनच्या आईच्या उपदेशानं माझ्या मनाचं थोड समाधान 
झालं. मी चुके असलें तरी घसरले नाहीं, एव्हढं मला कळलं. परि. 
स्थिती आटोक्‍्यांत आहे नि ती योग्य प्रकारे आहीक्यांत ठेवली तर एक 
नादुरूस्त झालेला आत्मा पुन्हां सावरला जाइल, अशी माझ्या अंत:कर- 
णांत आशा उत्पन्न झाली. 

ती नवी कल्पना मोठी उत्तेजक होती. मला प्रश्‍न पडला---एका 
जीवाच्या उद्घाराच्या मार्गाला मी मार्गदर्शक होते आई! कल्पना मोठी 
भव्य होता. जीवांचा उद्घार करण्याचा अधिकार महात्म्यांचा, मी एक 
क्षुद्रात्मा होते. जगाच्या इतिहासांत मी मातीमोल सुद्धां नव्हते--ती मी 
एका परित्यक्त जीवाला मार्गावर आणण्याची कल्पना मनांत खेळवूं 
लागलें, याचे मला जितकं आश्चर्य वाटलं तितकाच उल्हासही बाटला. 

त्या कल्पनेनं माझं मन उचेबळून आलं, एक नवीन योजना अंतःकर- 
णांत जागी झालो. त्या भावनेच्या भरांत मी बाळासाहेबांच्या चारित्राकडे 
पाहूं लागळे नि मला त्यांच्याबद्दल करुणा वाटूं लागली. 

माझ्यापेक्षा वयाने मोठा असलेला तो पुरुष मला अगदी लहान बालक 
अहि असं वाटूं लागलं-- 

-क्‍्ण्एक रांगणारं बालक चालायचा प्रयत्न करीत असतां घसरलं, पडलं, 
ठचाळलं, पुन्हां उठून उभं राहण्याचा प्रयत्न करू लागलं; त्याला उठून 
उभं राहतां येईना म्हणून त्याला हात दिला--हात धरून घटकाभर 
ऱचालवलं---असंच कांही दिवस हात धरून घटकाभर चालवलं नि-- 
भविष्यकालाकडे नजर टाकतांच मला दिसलं, की त॑चालत सुद्धां न 
येणारे बालक, नुसतं चालूच नव्हे, तर चांगले घावू लागले. 

खथाणावळीचे व्यवहार सुरळीतपणे चालत झेते. दिवाणजीदेखील 
हली बाळासाहेबांबद्दल बोलले तर चार चांगलेच शब्द बोलत असत, 

टॅ ११२ 


वैणू वेळणकर 


जवायला येणारी माणसं देखील त्यांच्याबद्दलची पूर्वीचा आढी हळूहळू 
विसरून जाऊं लागली होती. 

आई तर सारखी बाळासाहेबांची स्तुतीच करीत असे. तिला 
मधून मधून भीति वाटे. ती म्हणे, “' हल्ली पाहाते आहे, बाळा- 
साहेब फारच निवळले* माझ्यापेक्षा देखील कसोशीने सारे व्यवहार 
पाह्मातात. कुणाला वाटेळ, कीं जसे कांह ते खाणावळीचे मालकच 
अहित. पण मला थोडी भीति वाटते. हे सार टिकलं पाहिज. मूळचा 
स्वभाव जर उचेबळून आला तर पुन्हां मूळपदावर यायचं. ते असेच 
राहिले तर हा सारा ब्यवहार बाळासाहेबांच्या हाती देऊन मी सुखानं 
झापा काढीन, इतका मला त्यांच्याबद्दल विश्वास वाटूं लागला आहे.” 

बरेच दिवस झाले पण बाळासांद्ृबांनीं दुसरं पत्र लिहिलं नाहीं. 

एक दिवस ते अचानक माझ्या खोलींत आले, मी अभ्यास करीत 
होते. ते आलेले पाहातांच मी पुस्तक बाजूला ठेवलं तेव्हां ते म्हणाल, 
६: माझ्यामुळे तुझ्या अभ्यासाचा खोळंबा झाला नाहीं ना!” 

६ नाही.” मी म्हटलं, ““ तसा कांही विशेष नाही, राहिला अभ्यास 
तर असं अडण्याजोगं कांही नाही. आमचं कॉलेजांतलं हे असं आहे. 
कायदा आहे म्हणून कॉलेजांत जायचं, बाकी शिकवतात काय तिथं ! 
सारी मुलं टिवल्याबावल्या करण्यांत वेळ घालवीत असतात. पगार 
मिळतो म्हणून प्रोफेसर खुर्चीवर बसून कांहीतरी कोकलत असतात 
झालं. कोण ऐकून घेतं आहि त्यांचे ? नोट्स मिळवतोंच आहात आम्ह . 
परीक्षेच्या पेपरांची उत्तरं द्यायला नोटूसचा आम्हाला जितका उपयोग 
होतो तितका प्रोफेसरांच्या शिकवण्याचा कांही होत नाही !--” 


६ मला या साऱ्याच गोष्टी अपूवे आहेत. मॅट्रिक झालो त्यावेळी 
बाटत होतं, कीं मी कॉलेजांत जाईन म्हणून, बाबांप्रमाणेंच इंजिनियर 
व्हाव अशी माझी महत्वाकांक्षा होती. पण---कशाला ह्यात त्या गोष्टी £ 

११४ 


मी खेळ खेळ लागले 


मी आलो होता--” बाळासाहेब मर्धेच थांबले नि बसल्या जार्गी 
चुळबुळ करू लागले. 

बाळासाहेबांच्या वृत्तीत हली गेंमीरपणा आला होता. मधेच ते मला 
म्हणाले, “' मला कांही फार सांगायचं नाही. माझं पत्र तूं वाचलंस 
ना !_” मी होकारार्थी मान हालवली तेव्हां ते म्हणाले, “ पुन्हां लिहू 
का आणखी कांही ! 

मी इंसले--चांगली पोट घरून इंसले. त्यामुळे बाळासाहब आणखीच 
गभीर झाले. मी म्हटलं, “' पत्रे पाठवू नका असं का मी तुम्हाला 
सांगितले होतं कर्धी ! मग ता प्रश्न कां केलात ? 

: ठीक आहि.” म्हणून बाळासाहेब निघून गेले, 

मी कां इंसळ॑ याचा माझा मलाच उलगडा होईना. पण त्या इंस- 
ण्याचा बाळासाइबांच्या मनावर आघात होण्याइतका परिणाम झाला, 
असं मला वाटलं. पत्र लिहिण्याच्या बाबतीत त्यांनीं गैरफायदा घेऊं नये, 
मी नुसता खेळ खेळते आहे असं त्यांना वाटाव, म्हणून का मी इंसले ! 


११५ 


ग्रकरण १९ 
माझं लग्न कसं व्हावं! 


बरेच दिवसांनी नोझर आले. हल्लीं ते बरेच वृद्ध दिस लागले होते. 
मी इंटर पास होऊन बी.ए. च्या क्ञासांत गेले, हे ज्यावेळीं त्यांनीं ऐकलं. 
त्यावेळीं ते आश्चर्यानं अगर्दी थक्क होऊन गेले. त्यांना ते खरच वाटेना. 


आई म्हणाली, “' मलासुद्धा खरं वाटत नाहीं. कुठली कोण मी--- 
तिकडे गांवीं असते तर माझ्या दाहीदिशा झाल्या असत्या. माझ्या 
त्या स्थितींत, माझी मुलगी आतां दोन वर्षानी बी. ए. होईल असं 
जर गांवीं असतां मला सांगितलं असतं, तर खरं सुद्धां वाटलं नसतं. 


“ त॑ खरं आहे,” नाझर म्हणाले, “ पण ही आतां बी. ए. होऊन 
करणार आंहे काय ? लम्नच करणार ना ? हिला कांही मामलेदार होतां 
येणार नाही--मुनसफ होतां येणार नाही, मला वाटतं, वकिली करतां येते. 
हल्लीं, असं म्हणतात; पण उद्यां ही वकील म्हणून पाटी लावून बसली 
तर कोणता शहाणा माणूस आपला खटला घेऊन हिच्याकडे जाणार 
आहे ! मला वाटतं, सत्यभामाबाई, झालं एव्हढं शिक्षण पुरे झालं. 
आतां या पोरीचं लम्न करून टाका. केव्हढी मोठी दिसते ही ! चांगली 
चार मुलांची आई दिसते--नि ही अविवाहित? आतां तुम्हाला म्हणावं 
तरी काय ! गांवी असतां तर तुम्हाला वाळीत टाकलं असतं. असलं 
कांहीं पाहिले, कीं दाह्मरे येतात आम्हां लोकांच्या अंगावर ! अगदी 

११६ 


माझ ठम्न कसं व्हाव £ 


यहिल्यापासून ओरडतो आहे, कीं तुम्हांला मुळील वळण लावतां येत 
नाहीं ! काय केलंत हँ !<-” 

६ आतां वळण तें काय लावायचं ?! ” आई थंडपणाने म्हणाली, 
चुर्म्ही पाहातांच--उद्यां ही बी, ए. होणार म्हणून खाणावळीर्ची 
कामं करायर्ची कांहीं चुकवित नाही --सारे हिहोब ती तपासते--देणे 
घेणे तीच पाहाते--दर रविवार्री नि सगासादेनाच्या दिवर्शी बाढायचे 
काम तीच करते --तिला चांगळ॑ जेवण करतां येतं--पक्काने करतां 
येतात--जमाखच येतो नि शिवाय आतां बी.ए. होईल. यापेक्षां आतां 
करायचं ते काय राहिलं ! ” 

“६ आतां करायचं तं एकच, नाझर पिसाळून म्हणाल, “' आतां 
करायचं हिचं लग्न ! दुसरं कांह नाही ! ती परीक्षा गेली उडत ! आतां 
सकादा चांगला मुलगा पाहा नि हिला पिवळी करा. ” 

त्यांचं तै भाषण ऐकून मी मोठमोठ्याने इंठलं; तेव्हां ते म्हणाले, 
“पाहिलंत कशी चकाळली आहि ती! पूर्बी मी आलों तेव्हां माझ्यासमोर 
उभी राहायलासुद्धां भोत अस--ती आतां माझ्यासमोर माझी टायली 
करते आहे ! अगदीं उघड उघड मला हंसते आहे ! आतां तूंच सांग 
पोरी, काय करणार अह्िस तूं परीक्षा देऊन?” 

£ मी काय सांगूं! तें परीक्षा दिल्यानंतर मी ठरवणार आहे, मी 
उत्तर दिलं, “ तोंपर्यंत कांही ठरवायचं नाहीं असंच मी ठरवलं आहे. 

मांडीवर थाप मारून नाझर म्हणाले, “ आधीं मला हे सांग, की तूं 
लयन करणार आहेस, कीं नुसती बिब्बी होऊन राहाणार आइस!” 

६ तही कांही ठरबलं नाहीं.” मी गभीरपणानं सांगेतले. 

५ तं ठरवणारी तू कोण!” 

6 तुम्हीच विचारलंत ना मला ! म्हणून मी तसं सांगितलं. ” 

:: घण समज, उद्यां तुझ्य़ा आईने तुझं लम ठरबलं---चांगव्म 
सुझ्या योग्य नवरा पाहून लम ठरवलं तर तूं काय करणार आहेस !” 

११७ 


वेणू वेलणकर 


6 त्याचाही मी विचार केला नाहीं. बी. ए. होईपर्यंत माझ्या ल्य्नाचं 
कांहीं बोलायचं नाहीं असं आईच म्हणते, तेव्हां ती कशाला या वेळी 
घाई करील! ” 

विषय तेव्हढाच राहिला; पण नाझर कांर्हीना कांही कारण काढून 
आईला पुन्हां पुन्हां तेंच तेंच विचारीत .ह्वोते. मला त्यांची मोठी गंमत 
वाटत होती. असं हे लम्न ग्हणज आहे तरी काय ? कां या लग्नाच्या 
एव्हढ्या उठाठेवी ! काय झाले लग्नाशिवाय राहिलं तर १ बाळासाह- 
बांच्या लमाच्या उठाठेवी कुर्णी कां नाहीं करीत? 

नाझरांच्या बोलण्यांचा आईच्या मनावर परिणाम झाला. तिनं मला 
एका बाजूला घेऊन विचारल, “' तुला काय बाटतं वेणे ? ” 

मी म्हटलं, “ कशाबद्दल?” 

५६ हरे आतां नाझरसाहृब म्हणत होते त्याबद्दल ! ” 

६ म्हणजे माझ्या लग्नाबद्दल का? ” मी विचारलं, '“' लझाबद्दल 
सध्या कांह विचार करायचा नाहीं, असं तूंच म्हणतेस ना? मग आतांच 
असं कां विचारतेस ! ” 

“६ आतां नाझर म्हणूं लागले तेव्हां मलाही वाटूं लागलं.--गार्वी 
कळलं तर लोक खरोखरच कल्लोळ करतील; केलाही असेल कल़ोळ 
त्यांनीं ! नाझर आपले स्पष्टवक्ते, म्हणून त्यांनीं सरळ बोलून दाखवलं. 
मी कुणाकडे जातयेत नाहीं, कुठं मिळतमिसळत नाहीं--तेव्हां लोक 
काय बोलतात याची मला कल्पनाही होत नाही-- 

५ तू चांगली भाग्यवान आहेस आई. लोकांत मिसळली असतीस 
तर तुला त्यांनीं सतावून सोडलं असत, काय करायचं आहे लोकांशीं ! 
माझ्या लग्नाचा नि लोकांचा संबंध काय ! आपण अनाथ अपंग होतो, 
दारिद्यांत होतो, त्या वेळीं कुणी लोक आले का मदतीला ! दुसऱ्या कुणी 
मदत केली का ? आपण हा पसारा मांडला--त्यावेळींही छळच केला 
ना लोकांनी ! देवानं हात दिला म्हणून हे दिवस दिसत आहित---मग' 

११्ट 


माझं लम कसं व्हाव 


यांत लोकांचा काय संबंध ! त्यावेळीं जशी आपण लोकांची पर्वा केली 
नाहीं तशी यावेळींश करायची नाहीं, 

आईचं समाधान झालं. 

पण माझं समाधान झालं का! 

लग्नाची कल्पना माझ्या डोक्यांत नव्हती. नाझरांच्या कळकळीच्या 
बोलण्यानं ती कल्पना माझ्या बुद्धीवर परिणाम करूं लागली. कुणाच्या 
कुटुंबांत मी मिसळत नव्हते. आमचे सारंच घरदार स्वतंत्र असल्यामुळं 
शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या कुटुंबांत चाललेले प्रकार मला दिसून येण्याचा 
संभव नव्हता. सुलोचनेचे लग्न झालं तरीही माझ्या लग्नाबद्दल मला 
कांहींच वाटत नव्हतं. नाझरांच्या भाषणानं त्या कल्पनेच्या चक्राला गति 
मिळाली नि ते चक्र सारखं फिरू लागलं. 

जसजशी या विशिष्ट परिस्थितीचा मी विचार करूं लागले तसतसं माझ 
मन भांबावून जाऊं लागलं. पहिल्यापासून माझी वृत्ती स्वतंत्र होती. 
लग्नानंतर हे माझे स्वातंत्य कायम राहील का ! विवाहित दांपत्यांचे 
इतिहास मला माहीत नव्हते. अविवाहित, विधुर, प्रासंगिक ब्रह्मचर्य 
पत्करलेले कोटुंबिक गृहस्थ, यांच्या समुदायानंच आमची खाणावळ 
भरली होती. त्यांच्या तोंडून कोडुंबिकतेच्या, ज्या गोष्टी ऐकूं येत, त्याव- 
रून कोटुंबिक आयुष्यापेक्षां खाणावळींतलंच आयुष्य त्यांना जास्त इष्ट 
वाटत असे अशी माझी कल्पना होई. कोटुंबिकतेनं बरेचसे पुरुष असं- 


तुष्ट होतात हें भी पहात होते---पण कोटुंबिक त्यितीचा मनावर काय 
परिणाम होतो याचा इतिहास मला माहीत नव्हता. 


तो इतिहास माहीत करून घेण्यासाठी मी पुन्हां जमनाबेनच्या आई- 

कडे घांव घेतली. सुलोचनेच्या आईच्या बृत्तीवरून मला तिच्या 

कोडुंबिकतेची थोडीशी कल्पना आल्यामुळं जमनाबेनच्या आईला विचा- 

रतांनाही मी जरा घाबरले होते. नवरा सांगेल ते ऐकायचे, आपलं मत 

“वसरून जायचं, निदान हिशोबांत धरायचे नाही, अशी सुलोचनेच्या 
११९ 


रेणू वेळणकर 


आईची वृत्ति होती. जमनाबेनच्या घरचा प्रपंच सुलोचनेच्या प्ररच्या 
प्रपेचांपेक्षां निराळा होता. तिच्या घरची पुरुष मंडळी, मी जेव्हां जेव्हां 
जात असे, तेव्हां घर्र गेरहजर असे. साऱ्या दिवसांत पुरुष माणूस 
तिच्या घरांत दिसायचा नाहीं--नि ज्यावेळीं दिसे त्यावेळीं तो टेलि- 
फोनला कान लावलेला. नवराबायकोचे कर्धी चार शब्द होतात की 
नाहीं, याचची सुद्धां मला दका वाटे. 

--म्हणून जमनाबेनच्या आईला ज्या वेळीं मी विचारले त्यावेळी 
तिच्या उत्तराची मला भीती वाटत होती, 

ती भीति निराधार नव्हती. जमनांबेनची आई म्हणाली, “ असं 
पहा वेणूबेन, हा प्रश्‍न मोठा बिकट अहि. प्रामाणिकपणे जर मला विचा- 
रशील तर मी असं म्हणेने--धंदा कर, उद्योग कर, तुझ्या आईप्रमाणं 
स्वतःच्या पायावर उभी राहा; पण या लग्नाच्या भानगडींत पडूं नकोस. 
पण ज्याअर्थी तूं मला जिवाभावाने म्हणून विचारतेस त्याअर्थ| खरं सांगि- 
तल्या खेरीज गत्यंतर नाह्दी-खरं म्हणजे व्यवहारी खरं--नुसतं खरं नि 
व्यवहारी खरं यांच्यांत मोठं अंतर आंहृ---खऱ्याला मयादा नाहीं - पण 
व्यावहारिक खरं हें परिस्थितीवर अवलंबून असतं. आतां हच पाहा. 
मला प॒व्हरढीं चार मुलं अहित. मोठा गडगंज संसार आहे. चाकर नोकर 
माणसं आहेत पण तूं पाहातेस का कधी आम्हीं दोघं घटकाभर एकत्र बसली 
आहोंत ! सारे व्यवहार कसे यंत्रासारवे चाललेळे आहेत. हें कोटुंबिक 
जीवन म्हणजे यांत्रिक जीवन-- एकदां चांगली गति दिली म्हणजे एंजिन 
जसं चाळू लागतं, त्याला जसं घटकाभर थांब्र म्हटलं तर थांबतां यायचे 
नाहीं, तसं हें आहे, पुरुषमाणसांच्या व्यवहाराची चक्रं सुरू झाली, को 
त्यांच्या दात्यांत गुंतलेली बायकांच्या जीवनाची चक्रं तशींच फिरू लाग- 
तात. त्याला दुसरी गति नाहीं. त्या गतीच्या बाहेर जायचा जर त्यांनी 
प्रयत्न केला तर त्याचे दाते मोडून पडतात. ज्यांच्या ठिकाणीं स्वतंत्र 
बाणा आहे, अशांनी या लग्नाच्या भानगडीत पडूं नये. विधवा आहे 
म्हणून समजावं नि आयुष्य कंठाव--” 

१२० 


माझं लभ्न कसं व्हावं 


ऐकत असतांना मी अगर्दी सुन झालं झेते. 

तिनं आपल्या आयुष्यांतील गोष्टी सांगायला सुरवात केली. त्या इथे 
झलिहिण्याजोग्या नाहीत, ज्या बाईला मी सुखासमाधानांत लोळणारी 
म्हणून समजत हाते, ती कोडुंबिक आकर्षेणाच्यापार्यी असंतुष्टतेत 
अुरणारी एक प्रेमळ स्त्री आहे, एव्हढीच अटकळ मला करतां आली. 
तिच्या प्रेमळपणाला व्यवहार आड येत होता. नवऱ्याची व्यवहारी वृत्ती 
तिच्या प्रेमळपणाचा ओलावा आटवून टाकीत होती. दिवसौंदिवस ती 
एकप्रकारे कोमेजून जात होती. मुलांचं प्रेम म्हणावं, तर तेंही तितपतच. 
सी शाळेंत जात होती, अभ्यास करीत होतीं, परीक्षा पास होत होती, 
एका दोघांची लग्न झाली होतीं, एक मुलगी सासरी गेली होती, एक 
मुलगा आईबापांपासून विभक्त होऊन स्वतः व्यापार करून संसार थाटून 
राहिला होता, ही मात्र एव्हढ्या मोठ्या गडगंज संसारांत “ एकुलती 
एक ' होऊन राहिली होती. 

तिच्या भाषणामुळं मला ओदासिन्य प्राप्त झालं. सारा दिवस मी 
नुसती तळमळत होते. आज जो माझा दजा होता, त्या माझ्या सांपत्तिक 
नि शैक्षणिक दर्जाच्या अनुरोधाने माझें लग्न अशाच एकाद्या मोठ्या 
व्यापाऱ्याशी किंवा अधिकाऱ्याशीं झाले असतं; नि जी स्थिति जमना- 
बेनच्या आईची झाली तीच माझी झाली असती. मला वाटले, मी पती- 
बांचून राहूं शकणार नाहीं. या माझ्या वृत्तीबद्दल ज्यावेळीं मी सूक्ष्म 
विश्हेषण करून पाहूं लागलें त्यावळी मला असं वाटूं लागलं-माझे लग्न 
झालं तर तं “ माझं ! लग्न झालं पाहिजे !-माझ्या नवऱ्याचे नव्हे-'मला' 
नवरा मिळाला पाहिजे होता-मी कुणाची बायको व्हायला नको होतं ! 

जसजसा मी विचार करूं लागळ॑ तसतसं माझं मस्तक भणाणून 
नाऊं लागलं. मन कुठंच त्थिर होईना. माझ्या माहितीच्या टापूंत मी 
नजर फेकून पाहिली; पण माझा नवरा व्हायला पात्र असलेला असा 
मनुष्य माझ्या नजरेला येईना. 

१२९१९ 


वेणू वेळ णकर 


मी आईला सांगितलं, “माझं लग्न व्हावे असं तुला वाटत असले, तर 
तूं त्या उद्योगाला लाग. तूं कोण कुठला जा नवरा माझ्यासाठी पाहाणार 
आहेस तो तरी एकदां मला पाहून घेऊ दे. ” 

माझ्या त्या बोलण्यानं आई बिचारी घाबरल्यासाखी झाली. ती 
म्हणाली, “ अश्ली एकेरीवर आल्यासारखी काय बोलतेस ? मी कुठं 
एव्हृदी लमासाठीं तुला तोशीस लावते आहे!” 

“ तूं तोशीस लावली नाहींस-?” मी म्हटलं, “ तर मी तुला सांगते, 
मला लग्न करायचं आहे-मला वाटतं, त्यामुळे माझी परीक्षा कांही अडून 
राहायची नाईी-लग्न झोल्यावर देखील परीक्षा देतां येईल--पण तूं 
माझ्यासाठी कुठला, कसा, कोणत्या दर्जाचा, नवरा पाहाणार आहिस 
याची मला परीक्षा घ्यायची आहि. ” 

पहिल्यानं ऐकत असतां जरी आई गभीर होती तरी हँ भाषण 
बोलत असतांनाचा माझा आविर्भाव पाहून हंसली नि म्हणाली, 
८८ बुरे बर. आतां त्याच उद्योगाला लागतें. मी जिवंत आहे. तोंपर्यंत 
एकदां तुला उजवून टाकली कीं सुटले, ” 

माझी मलाच गंमत वाटली मी आपल्याशीच हइंसले नि खोलींत 
निघून गेळे, पाहाते ता. तिथं बाळासाहेबांचं पत्र आलेलं ! 


श्र्रे 


प्रकरण १७ 


माद्या मनावर परिणास झाला 


तै पत्र मोठं विलक्षण होतं, सुरवातीला शोवटाला कसलाच मायना 
नव्हता. पत्र असे होतंः-- 

* किती दिवस तरी पत्र पाठवावे म्हणून विचार करीत होतो. बरींच 
पत्रे मी लिहून पाहिली, पण माझ समाधान होईना. सुलोचनेला मी 
जशीं पत्रे पाठवीत होतो तरस पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला; पण तें 
मनाला पटेना. तुला पत्र लिहायचे आणि त्यांत बनावटपणा असायचा 
ही कल्पनाच मला दुःसह होई. मनाचा निश्चय करून प्रामाणिकपणाने 
पत्र लिहायचे म्हणून सुरवात केली. ते मात्र अत्यंत कठीण गेलें. 
दोन ओळींपलिकडेसुद्धां जातां येईना. तें पत्र लिहीत असतांना मला 
कळलें, की माझ्या भावना बदलत आहेत; नव्हे, नवीन भावनांचा उगम 
झाला आहि. वृत्तीसुद्धां पूर्वीची राहिली नाहीं. अश्या वेळीं लिहूं काय 
लिहायचे म्हटले म्हणजे ते तुला वाचण्याजागे होईल काय, अशी 
शका मनांत आली. दूरच्या अतरावर असणाऱ्या तुला जर पत्र लिहा> 
यर्चे असते तर तर्स लिहिण्याचा मी हिय्या केला असता. पण इूर्थे तूं 
मी समोरासमोर. पत्रांत लिहिळे आहे याची आठवण सदोदित जागी 
असायची. तूं त॑ वाचल आहेस हें विसरतां यायचे नाहीं. अर्स असतांना 
लिहू काय आणि कसं ! पत्र लिहिण्याची तू॑ आज्ञा केलीस म्हणून हे 
पत्र लिहिलें, हेंच माझं शेवटच पत्र ! ! 

१२२३ 


वेणू वेळणकर 


खाली नुसती सही होती. ते पत्र वाचून मला धक्का बसला. असं कांही 
'पत्र येईल अशी अपेक्षा मी केली नव्हती. त्या पत्राचा अर्थ मला कळला 
नि म्हणूनच त्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. 

मला वाटलं, कुठली ही आपत्ती मी माझ्यावर ओढवून घेतली ! 
मला पश्चात्ताप झाला नाही--चूक केली असं वाटलं नाही--तरी ज॑ 
'कांहीं केलं ते केलं नसतं तर बरं झालं असतं, असं मात्र वाटायला लागलं. 

मी त॑ पत्र नेऊन जमनाबेनच्या आईला दाखवलं. ते वाचून पाहा- 
तांच तीही क्षणभर स्वस्थ राहिली. 

मी विचारलं, “' काय वाटतं तुम्हांला ! 

£: मोठा कठीण प्रसंग आहे ! ” ती म्हणाली, “ तुझं तूंच ई संकट 
आपल्यावर ओढवून घेतलं आहेस, आतां यांतून कसं मोकळं व्हायचे 
हें तुझे तुलाच ठरवतां येईल. मी यांत कांही सांगूं शकत नाहीं. ” 

आशेचा एक आधार होता तिथं निराशा झाली. स्वतः विचार 
करायला मी असमथे झाले होते--आईला यांतलं कांही सांगतां येत 
नव्हतं-नि जमनाब्रेनच्या आईने तर सारा भार माझ्यावरच टाकला. 

कांही विचारच करायचा नाही असं मी ठरबलं. जं काय व्हायचं 
असेल तं होईल. कोणत्याच प्रकारे आपण पुढे पाऊल टाकायचे नाहीं 
म्हणजे झाले. 

बाळासाहेबांच्या वृत्तीत कांहींच फरक झालेला दिसून येत नव्हता. 
नित्याचे व्यवहार जसे चालायचे तसे चाळले होते. पत्राबद्दल उल्लेख 
त्यांनीं कधींच केला नाहीं की मीही नाही. 

पत्राची भाषा अर्थातच आतां संपली होती. रोजच्या व्यवहारांतल्या 
भाषेपलिकडे मी कांहींच बोलत नव्हत, त्यांत माझ्याकडून चूक किंवा 
'फरक होऊं नये म्हणून मी खबरदारी घेत होतें. जितक्या जरेनं मी 
रोज बाळासाहेबांना वागवीत अर्से त्या जरबत थोडीशीही ढिलाई होऊं 

१२ 


माझ्या मनावर परिणाम झाल 


दिली नाहीं, मी तशीच वागते, म्हणून बाळासाहेबांनींही आपल्या वर्तनांत 
फरक होऊ दिला नाही, 

पूर्वीप्रमाणे पुन्हां एकदां मी त्यांच्या गैरइजेरीत त्यांच्या खोलीची 
तपासणी केली. तीं क्रीम्स नि फेस पावडस-सगळीं कांही निघून गेली 
होतीं. मला जरा बरं वाटलं. 

मी त्यांच्या टेबलाचे ड्रावस उघडून पाहिले. आश्चर्ये करण्याजोगी 
एक वस्तू मला तिथं दिसली. यापूर्वी ती वस्तू तिथं नव्हती. 

ती वस्तू म्हणजे बाळासाहेबांच्या आईचा फोटो. 

बाळासाहेब येऊन इतके दिवस झाले होते पण हा वेळ पर्यत. त्यांनीं 
कर्षी आपल्या आईच्या नांवाचा उल्लेख केला नव्हता. त्यांनीं तसा 
उल्लेख केला नाहीं म्हणून मला पूर्वी बाईट वाटे, मागल्या खेपेला मी 
"ज्यावेळीं तपासणी केली त्यावेळीं हा फोटो तिथं नव्हता, मला आश्चर्य 
वाटलं, आतांच हा कुठून आला ! 

मनांत एक विचार आला नि तो अमलांत आणायचं मी ठरवले. 
वाटलं, यांतून काय निष्पन्न होतं पाहू ! 

मी तो फोटो घेऊन गेलें नि माझ्या खोलींत माझ्या अभ्यासाच्या 
टेबलासमार लटकावून ठेवला. तितक्यांत आई माझ्या खोलींत आली 
नि तो फोटो पाहतांच जवळ जवळ ओरडली. धांवतच ती त्या 
फोटोजबळ गेली, इकडे तिकडे पाहात असतां तिच्या डोळ्यांतून 
सारखी आसवं वाहूं लागली. 

गंभीर स्वरानं ती मला म्हणाली, “ कुठं ग मिळाला तुला हा 
फोटो ! किती वाटत असे मला--एव्हढे त्यांनीं दिल॑पण त्याबरोबरच 
एक फोटो दिला असता तर ! इतके फोटो घरी पडले होते. त्यावेळी 
त्यांतला एकाददुसरा मी उचळून आणला असता तर कळलंसुद्धां 
नसत॑ कुणाला ! पण कसं बाई मला सुचलं नाहीं. बरं झालं, हा फोटो 

१२५ 


धेणू वेळणकर 


आणलास. तो चांगला मोठा करून घेतला पाहिजे नि पुढल्या 
दिवाणखान्यांत टांगला पाहिजे. कुठे मिळाला तुला हा ! ” 

मोठी पंचाईत आली. आईला काय सांगावं है मला कळेना, खरं 
सांगितल्याखेरीज गत्यंतर नव्हतं. 

ती म्हणाली, “' हं बरं केलं नाहींस. विचारलं असतंस तर त्यांनीं 
नाहीं का म्हटलं असतं ? कदाचित एव्हढाच एक फोटो त्यांच्याजवळ 
असेल---जिवाभावासाठी त्यांनीं तो जपून ठेवला असेल--नितो तूं 
असा घेऊन आलीस ! त्यांना न विचारतां घेऊन आलीस इं कांही बरं 


नाही, आपण त्यांच्याकडून मागून घेऊं --याचा चांगला मोठा फोटो 
करून घेऊ नि त्यांचा फोटो त्यांना परत देऊं-- 


आईचं बोलणं संपते न संपत तोंच बाळासाहेब घाबऱ्याघाबऱ्या 
खोलींत आले. चटूकन मी फोटोआड उभी राहिलें. 

आईला खोलींत पाहातांच, ते कांहींच न बोलतां तटस्थपणे उभे 
राहिले; तेव्हां आई म्हणाली, ““ काय झालं बाळासाहेब ! तुम्ही घाबरलेले 
कां दिसतां १--” आईला कल्पना आली नव्हती असं नाही --पण 
तीदेखील अंदाज घेत होती 

अगदीं संथपर्गे बाळासाहेब म्हणाले, “' माझ्या खोलींतली --माझ्या 
ड्रॉवरांतली एक मोलाची वस्तू हरवली आहे 


मला दूर लोटून, फोटो काढून हाती. घेत आई म्हणाली 
“हीचकाती! 


बाळासाहेबांनी फोटोवर जबळजबळ झडप टाकली नि आईच्या 
हातांतून तो काढून घेतला. 


बाळासाहेब जायला निघाले असं पाहून आई मला दरडावून 
म्हणाली, “' त्यांची क्षमा माग. 


जात असतांना वळून बाळासाहेब म्हणाले, “' त्यांत क्षमा कसली 


गायची !' सद्य आणला असेल तो त्यांनी, आतां मिळाला, 
ठीक झालं 


१२८६ 


माझ्या मनावर परिणाम झाला 


बाळासाहेब जायला निघाले असं पाहून आई म्हणाली, “' मला 
इवा आहे तो फोटो. मी तो मोठा करून घेईन नि हा तुमचा तुम्हांला 
परत करीन. 
न बोलतां बाळासाहेबांनी तो फोटो आईच्या हार्ती दिला निते 
एकदम निघून गेळे--फोटो घेऊन आई निघून गेली. 
मला अगदीं मेल्याहून मेल्यासारखं झालं. आईच्यासमोार तरी माझी! 
अशी फजिती व्हायला नको होती. बाळासाहेबांच्या खोलींत जाऊन, 
स्यांच्या नकळत मो त्यांची डावरे धुंडाळत, हं जे आईला कळलं ते 
मोठं वाईट झालं. आईनं तसं कांही विचारलं नाही---तरी पण 
एकदेरीत तिला अंदाज आल्याशिवाय राहिला नसावा. 


मी तशीच बाळासाहेबांच्या खालींत गेले. ते ईझीचे अरवर पडले होते 
मला पाहतांच ते उठून उभे राहिले. 


५६ उठतां कशाला ? बसा ना |! ” मी म्हटलं. 

मला आश्चर्य वाटलं. बाळासाहेबांच्या डोळ्यांत आसवं आली होर्ती, 
एव्हढं त्यांनी मन मोकळं केलेल मी हं पाहिल्यानंच पाहिले. र्म 
विचारलं, “ माग मी तुमच्या खोलीची झडती घेतली त्यावेळी हृ 
फोटो इथं नव्हता (->.” बाळासाहेबांनी नकारार्थी मान हलवली. 

५ नि मग आतांच हा इथं कुठून आला!” 

“५ खालीं बस नि ऐक ! ” बाळासाहेब म्हणाले, “' इतके दिवर 
झाले मला इथं येऊन--पण आईचं नांव मी उच्चारलेलं तूं कधी ऐकर 
होतंस का ! नाही ना ? पण आतां हा तिचा फोटो मी सदोदित नजरे 
समोर ठेवतो आहे. साऱ्या आयुष्यांत मी कर्घी तिची आठवण केल 
नाही--तुझ्यामुळे मला तिची आठवण झाली--ऐकलेस ! तुझ्यामु 
मला तिची आठवण झाली. अशीच ती मला जरब लावीत असे. ती जर 
लावते म्हणूनच मी तिला झिडकारीत अर्से, तिची आज्ञा मी कर्धीः 
पाळली नाहीं. आदर मानाच्या नजरेनं मी तिच्या हयातीत तिच्याकः 

१२७ 


वेणू वेलणकर 


पाहिले नाही, याला कारण आमचे बाबा. माझ्यासमोर ते सदोदित 
तिला टाकून बोलत असत. तिच्या वेघळेपणाबद्दल तिला दोष 
देत असत म्हणून माझा तिच्याबद्दल अनादर झाला. आतां 
मत्ञ कळतं, कीं तो वेंधळेपणा नव्हता. तो चांगुलपणा होता. 
तिन चांगुलपणाचं देत पेरून ठेवलं, त॑ हे. तुमच्या घरी पिकलं नि 
म्हणूनच मी आज अन्न खाता आहे. नाहींतर असाच भटकणार होतो. 
कुणी सांगावं, कदाचित्‌ तुरुंगांत गेली असतो. अगदीं त्याच बेताला 
आलो होतो. हेंच कशाला, तू मळा तुरुंगांत पाठवलं असतंस. ही 
पैशाची मी अफरातफर केली, तेव्हढी पुरेशी होती मला तुरुंगांत पाठ- 
वायला. सहा रुपये काय, सहाशे काय, सहा हजार काय नि सहा 
लाख काय; चोरीच्या गुन्ह्याला शिक्षा सारखीच, ऐकलेस, वेणू, 
ती माझी पहिली चोरी नव्हती. सर्कशीत असतांना चोऱ्या करण्यावरच 
माझी चैन चालत होती. मी निर्ढावळलेला होतो. इथली तुमची 
व्यवस्था इतकी चोख आहे, कीं. त्यामुळे मला बरेच दिवस 
यौरी करतां आली नाहीं. ज्यावेळी मी चोरी करू लागली त्यावेळी 
उघडकीस आलो. आईनं जसं मला वागवलं तसं--माझी कल्पना आहे 
ती नुसती--तिच्या इतर वर्तनावरून मी अंदाज करतो आई---तसं 
तूं मळा बागवलंस, म्हणून मी मिंधा झालो--मेल्याहून मेला झालो. 
त्या दिवशीं मळा आईची आठवण आली नि टूंकेच्या तळाला चुकून 
पडून राहिळेला तो फोटो मी शोधून काढला--फ्रेम केलालनि हाताजवळ 
ठेवला. ज्या ज्या वेळीं भलत्या कल्पना मनांत येतात, मन>चळूं लागतं, 
पूर्वी केलेल्या अनाचारांकडे जाण्याची प्रद्र्ती होऊं लागते, त्या त्या वेळी 
तिच्य़ा त्या निमेळ चेहेऱ्याकडे मी नजर टाकता. त्यामुळे माझे मन 
झुद्ध होतं. म्हणूतच इतके दिवस मी चोख राहिलो आहईे---म्हणूनच तो 
फोटो गेल्यामुळें मी कासावीस झाला, ऐकलंस ! बेणू, त्या फोटोकडे 
पाहूं लागलो, कीं मला तुझी आठवण येते. त्या चेहऱ्या होजारी मला 
१२८ 


साझ्या सनावर्र परिणाम झाळा 


तुझा चेहेरा दिस लागतो. ती आज निघून गेली आहे, तरी देखील 
तिचं अस्तित्व मला जाणवतं-_तुझ्यामुळे जाणवतं---”" 

बाळासाहेब एकदम ओक्साबोर्क्सी रडूं लागले. पुढे होऊन त्यांचं 
सांत्वन करावं, आपल्या पदराने त्यांच्या डोळ्यांतलीं आसवं पुसावी, असं 
एक क्षणभरच मला वाटलं --पण मी आत्मसंयमन केलं. 

बाळासाहेब जितक्या चटूकन्‌ माझ्या खोलीतून निघून जात, तज्चीच मी 
त्यांच्या खोलीतून निघून गे. 


९ २१२९ 


प्रकरण १८ 
माझ्या दारावर टिचक्या 


मी थड़ेबजा बोलले हार्ते खरी, पण आईनं ते माझं बोलणे अगदीं 
हिशेबी घरलं. ती सारखी उद्योगाला लागली होती. जेवायला येणारी 
जीं जी जुर्नी माणसं होती, त्यांचीं त्यांची घर शोधून काढून त्यांच्या- 
मार्फत ती माझ्यासाठी स्थळं शोधण्याच्या उद्योगाला लागली होती. 

या बाबतींत ती माझ्याकडे कांही बालत नव्हती. पण मला मात्र 
चुटपुट लागून राहिली होती. मी नाहीं असं समजून ती एकदां दिन- 
भाऊंबरोबर बोलत असतांना मी ऐकलं तेव्हां मला हें कळलं. तिला 


सरळ सरळ विचारावे असं माझ्या मनांत आलं होतं; पण तसं करायचा 
मला धीर होईना. 


एक दिवस रात्री सारी कामं आटोपल्यावर, मी अभ्यास करीत बसलें 
होते, तिथे आई आली नि म्हणाली, “' ऐकलेस वेणे, तुझ्यासाठी एक 
स्थळ पाहिलं आहे. पूर्वीच्या परीने वागायचे म्हणजे तुला सांगायची 
कांही जरूरी नाहीं; पण तूं आतां कांही लहान नाहींस--चांगली कर्ती” 
सवरती झाली अहिस---' माझ्या लग्नाच्या तयारीला लाग असं मला--- 
आईला-रसांगण्याइतकी सुशिक्षित झाली आहेस. म्हणजे त्यांत काई 
वाईट आहे असं मी म्हणत नाई, जसे दिवस थेतील तसं वागलं 
पाहिजे, पण मी एक स्थळ पाहिलं आहे. असं स्थळ शोधून सापडायचं 
नाही, असं दिनूभाऊ म्हणत होते. मुलगा कसलीशी मोठी वकिलीची 

१२९० 


माझ्या दारावर टिचक्या 


परीक्षा पास झालेला आहे. पण वकिली करीत नाहीं, गव्हर्नर साहेबांचं 
ते कसलं मोठं ऑफिस आहि ना कोटांत--तिर्थ आहे नोकरीला. चांगला 
दीडशे रुपये पगार मिळतो म्हणे--” 

५ थांब आई ! ” मी म्हटलं, '' दीडशे रूपये पगार मिळवणाऱ्या 
माणसाला का तूं देणार आहेस मला! दीडशे रुपय पगाराचा नोकर तुला 
देखील सहज ठेवतां येईल ! तुला काय नि मला काय--एकच. उद्यां 
या बाळासाहेबांना दीडशे रुपये पगार करायचा म्हटलं तर तूं काय नाही 
म्हणणार अहिस ?! असल्या सरकारी नोकराशीं का मी लग्न करूं? ” 

आशश्‍चा उल्हास मावळून गेला, मला वाटलं, हं तिच्या लक्षांत आलं 
नव्हतं. दिनूमाऊ बोलले असतील--त्यांनीं अगर्दी खुलवून सांगितलं 
असेल--सरकारी नोकर म्हटला म्हणजे आमच्या लोकांना अगदी 
परजह्म वाटतं. हा पूर्वीचा परिणाम आईच्या मनावर देखील नव्हता 
असं नाही, 

५ मग आतां कसं करायचं १” आई म्हणाली, “' उद्यां ते पहायला 
येणार आहेत तुला. 

मी अगदीं सुन्न झाले, इथपर्यंत आली का मजल? हे पहायला येऊन 
काय माझी परीक्षा घेणार आहेत? मी आईला स्पष्ट विचारले तेव्हां ती 
म्हणाली, “ आतां हे एकदां ठरलं आहे ते होऊन जाऊं दे. कांही 
तरी कारण काढून मोडून टाकू. पण उद्यां तू मात्र कांही वेडंवाकडं 
करूं नकोस. 

दुसऱ्या दिवर्शी सकाळीं ते ग्रइस्थ आले. तो एक हाडकुळा, चष्मा 
लावलेला, क्षयी दिसणारा असा तरुण होता. त्याला पाहतांच मला 
किळस आला. 

त्याने मला प्रश्न विचारले--माझी परीक्षा घेतली. तो एम्‌. ए; एल्‌. 
एल्‌, बी; होता. सरकारी अधिकाऱ्याची ऐट मात्र तो अगदी बरेबर 
आणीत होता. दिनूमाऊ म्हणाले--त्याला चहा दे म्हणून--पण मी 

१२२१ 


वेणू वेळणकर 


कांही स्वतः त्याला चह्या नेऊन दिला नाहीं, ' पररक्षा ' होतांच मी 
निघून गेलें. 

आईनं नंतर दिनूमाऊंना काय सांगितलं ते मला कळलं नाही. पण 
ती मला म्हणाली, “' तू म्हटलंस त॑ खरं ग बाई ! कसलं मरतमढं 
आणून उभं केलं दिनूमाऊनीं ! नि काय मेला तारीफ करीत होता 
माझ्याजवळ ! विश्वासाची माणसं म्हणून ज्यांना म्हणायचं, तींच जर 
अशीं गळा कापायला उठू लागलीं तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा !” 

माझा जीव खालीं पडला. मी माझ्या नित्याच्या उद्योगाला लागलें. 

-म्पण त्या रात्री एक चमत्कार झाला. घरांत जिकडे तिकडे साम- 
सूम झाल्यावर माझ्या खालीच्या दारावर कुणी तरी टिचक्या मारल्या, 
मी जवळ जवळ झोपी जायच्या तयारीत होते. मला वाटलं, पूर्वीसारखाच 
कुणीतरी थट्टा करायला आला असल, 

मी जाऊन दरबाजा उघडला नि पाहाते तो दारांत बाळासाहेब ! 

त्यांचा चेहरा अगदीं भसूर झाला होता, डोळे तारवटल्यासारखे झाले 
होते--माझ्या तोंडांतून सद्दज आश्चर्याचा उद्गार निघून गेला, 

ते आंत येऊन माझ्या इझीचेअरवर बसले. बसले कसले--पडले 
म्हटलं तरी चालल. 

मी घाबरून विचारलें, “' काय झालं ! ” 

किती तरी वेळ त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडेना, मी अधिकच 
घाबरून गेलें. पुन्हां विचारलं तेव्हां ते म्हणाळे, “' मी राजीनामा 
द्यायला आली आहे. मला इथं राहायचं नाहीं. ” 

त्यांच्या आवाजांत करारीपणा. स्पष्ट दिसत होता. इतक्या करारी 
शब्दांनी बोलतांना मी त्यांना कधींही पाहिलं नव्हते. 

५ काय झालं £? ” मी विचारलं, “' कुणी तुमचा अपमान 
क्रेलाका!” | 

£६ नाही, '” बाळासाहेब अगदीं रुक्षपणानं म्हणाले, “' कुणी माझा 

१२२ 


माझ्या दारावर टिचक्या 


अपमान केला नाही. कुणी मला त्रास दिला नाहीं. जितक्या सुखांत 
पूर्वी होतो तितक्‍याच सुखांत आहै---पण आतां हँ सुख पुरे झालं. 
सुखासाठी माझा जन्म नाही. सदरर्तनासाठीं माझा जन्म नाहीं. मी 
नरकांतला किडा आहे. मला नरकांतच लोळलं पाहिजे. नरकांतून 
स्वर्गात जाण्याचा मी प्रयत्न करूं लागलो होतो; पण जी शिडी हाताला 
लागली ती कोसळणार, असं पाहून मी आतां नरकांत उडी घ्यायचा 
निश्चय केला आहे. इथं यापुढं राहायला मी लायक नाहीं नि म्हणून मी 
राजीनामा देतो आहे. 

६६ कृपा करा नि मला काय ते स्पष्ट सांगा! ” मी काकुळतीला 
येऊन म्हटले. 

6 स्पष्ट काय सांगायचे ! ” बाळासाहेब चिडून म्हणाले, ““ आई- 
बापांनीं माझा तसा नाश केला नि तूं आतां माझ्या सर्वनाशाला उठली 
आहिस ! बाबांनीं मला आईविरुद्ध चिथावलं म्हणून मी आईचा प्रेमळ- 
पणा पायाखाली लाथाडला ! पुढं बाबांच्या चरकांत सापडल. त्यांनी 
मला चिखलांमातींतून राबवलं म्हणून पळून गेलो--सकशीतल्या मवाली 
पहेलवानांच्या लाथा खात आयुष्य कंठलं--इथं आली --स्वगीत आलो 
असं मला वाटलं---नि इथं तुम्ही माझा असा गळा कापतां आहांत!” 

£ काय केलं आम्हीं असं! ” मी घाबरून विचारलं. 

£ अजून तुला कळत नाही? ” बाळासाहेब अगदी त्रातिकपणानं 
म्हणाले, “ कीं नुसतं ढोंग करते आहेस? की मला फसवते आहेस! तुझं 
लग्न ठरले ना !-- 

आतां माझ्या डोक्यांत प्रकाश पडला. मी भानावर आलें नि गंभीर- 
पणानं म्हटलं, “' बरं मग ! त्यांत तुमचे काय बिघडलं !-- 

“ तूं इथून निघून गेल्यावर मला इथे वागवणार कोण ! कुणाच्या 
हाताखाली मी काम करूं! मन भरकटलं तर कुणाकडे पाहून ते 

१२२९ 


वेणू वेळणकर 


ताळ्यावर आणू ? कुणासाठी मी आत्मसंयमन करूं! सांग ना ? कुणा- 
साठी नरकाचे साम्राज्य सोडून मी स्वगांच्या रिडीला हात घालूं! ” 

त्यांच्या त्या भाषणानं माझ्या हृदयावर मोठा आघात झाला. तरीद्दी 
मन कठोर करून मी म्हणाले, “' ह्या काय वेडेपणा ? मी काय तुमच्या 
जन्माला पुरले आहे ? आई आहि ना इथं ! केव्हांतरी माझे लग्न होणा- 
रच ना ! आजची कांही भीति नको. आजचं स्थळ कांही पटलं नाही 
आईला; पण उद्यां दुसरा कुणी तरी येऊन घेऊन जाणारच आहि ना मला! 
मग आईला आधार द्यायला तुमच्याशिवाय इथं दुसर कोण आहे (-” 

दोन्ही हात तोंडावर घट्ट दाबून बाळासाहेब कांहीं वेळ स्वस्थ बसले. 

६६ जा आतां निजा जाऊन ! ” मी म्हटलं, “' कुणी पाहिलं तुम्हांला 
यावेळीं इथं, तर भलता प्रसंग यायचा ! ” 

तोंडावरचा हात काढून बाळासाहेबांनी माझ्याकडे पाहिले. ते त्यांचं 
पाहाणं काळीज फाडून टाकणारं होतं ! सारा जीव डोळ्यांत आणून 
अत्यंत काकुळतीने ते माझ्याकडे पाहात हाते. त्या पाहाण्याचा माझ्या 
मनावर परिणाम झाला---पण पुन्हां मी मन कठोर केलं. 

पाहातां पाहतांच त्यांना एकदम हुंदका आला. ते ओक्साबोक्सी 

रड लागल, 

त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. “' वेणू, वेणू, मला नको ग 
अंतर देऊंस ! माझ्यामाठी तरी लग्न करूं नकोस ! कुणाचे कल्याण 
झालं आहे लग्नानं ! माझी आई आठवते तुला! तूं तिला चांगली ओळख- 
तेस--तिचा सहवास तुला लाभला आहे--त्या माउलीचे आमच्या 
बाबांनी सारा जन्मभर हाल केले--कर्धी एक सुखाचा शब्द बोलले 
नाहीत! क्रितीतरी कुटुंबं मी पाहिली आहेत--हे. असंच चाललं आहि 
जिकडे तिकडे! ते संकट तरी तुझ्या कपाळीं यायला नको! मी उभा 
राहूं कुणाच्या आधारावर ! तुझ्या आईची काळजी मी ध्यावी, अतं तूं 
म्हणतेस-पण तुला वाटतं का, कीं माझी ती लायकी आहि ! तुझ्या 

१२्ड 


माझ्या द!रावर टिचक्या 


शब्दावर मी चालता आहे. तुझं भाषण बोलता आहे. तुझ्या हातानं 
काम करता आहे. तुझ्या जिवानं जगतो आहे. काय सांगूं ! अंतःकरणांत 
तळमळ होते आहे पण शब्द तोंडावाटे बाहेर पडत नाहींत --' 
| आवेग त्यांना आवरेनासा झाला नि ते पुन्हां आक्साब्राक्सी 

रड॑ं लागल. 

मला नकळत माझ्या कंठांतून हुंदका आला. बाळासाहेब थांबले नि 
माझ्याकडे पाहूं लागले. 

मी मटकन खालीं बसळे-बाळासाहेबांची जी त्थिति झालो होती तीच 
माझी झाली. मी रडू लागल हें पाहून माझे मलाच आश्चय वाटलं मी 
कां रडत हतं तंच मला कळना. 

बाळासाहेब आवेगानं आरडले, “' वेणू , वेणू , रठ्ठे नकोस ! तुझ्या 
डोळ्यांतरली टीप पाहिली, कीं माझ्या काळजाचं पाणी होतं. तूं सागत 
असलीस तर जन्मभर मी इथं राहीन, वाटेल ते केश सोशीन, वाटेल तो 
अपमान सोशीन ! तूं निघून गेलीस तरीदखील तुझ्या आईची काळजी 
घेईन, तुझ्या जागीं तिला होईन--पण तूं रड्डे नकोस. तुझ्या डोळ्यांतलं 
एक टीप पाहिलं तरी माझ्या काळजाचं पाणी होतं.---काय होतं कांही 
सांगतां येत नाहीं !--” 

ते आंवढ्यावर आंबे गिळू लागले. मीही बरीच अस्वस्थ झालं 
होते. दोघांनाही बोलायला वाचा नव्हती. 

तो प्रसंग मोठा चमत्कारिक होता. सुरवात कुठून झाली नि कोणत्या 
थरावर गोष्ट कां आली, हें माझं मलाच कळेना, 

- बाळासांहब चटूकन निघून गेले नि मी जाऊन दाराला कडी घातली, 

ते पुन्हां येतील म्हणून मला भीति वाटली, 

मी दिवा मालवून बिछान्यावर पडलें पण माझा डोळा लागेना, 
पुन्हां पुन्हां रडण्याचा उमाळा येत होता. तो तसा कां येत होता हेंच 
मला कळेना. 

१३५ 


प्रकरण १९ 
आईला समज दिली 


दुसऱ्या दिवशीं सकाळीं उठून मी एकदम जमनाबेनचं घर गाठलं. 
जाते तों दाराला कुलूप. भय्याजवळ चोकशी केली तेव्हां त्यानं सांगितले, 
कीं तार आल्यामुळे सारी मंडळी रात्रीच्या मेलने काठेवाडांत गेली. 

पुन्हां माझी निराशा झाली, निराद्या झाली, असं तरी कसं म्हणू ! 
यापूर्वीच जमनाबनच्या आईनं माझी निराशा केली होती. 

मी घरीं परत येत असतांना विचार करूं लागलें. मी कशासाठी 
जमनाबेनकडे गेले होते ? माझें मलाच उत्तर देतां येईना. मला खात्री 
पटली. स्वतःचा भार स्वतः सहून केल्यादहीवाय मला दुसरा उपाय 
नव्हता. लहानपणापासून स्वतंत्र वृत्ती माझ्या नशिबीं टिचली गेली होती. 
आतां या वयांत सुद्धां कुणाचाच आधार नव्हता. आईला विचारलं असतं 
तर तिला तरी काय सांगतां आले असतं ? आधीं ती जुन्या काळची--- 
त्यांत अगर्दीच व्यवहाारी--अगरदी दुकानदारीबुद्धीची--म्हणजे मी 
माझ्या आईची हेटाळणी करते असं नाही--तरी तिची वृत्ती अगदींच 
हिशेबी होती, ईं कबूल केल्याखेरीज गत्यंतर नाई. सुलोचना पारखी 
झालली--नि तिच्या आईची किंमत मला कळून आलेली. माझी मीच 
विचार करू लागले. पहिल्यानं कल्पना भरकटत होत्या. विवेकाने त्या 
मी हळूहळू गोळा केल्या. त्या साऱ्या कल्पना जेव्हां एकत्र झाल्या तेव्हां 
त्यांतेन मला एक नवी स्फूर्ति मिळाली. त्या स्फूर्तीच्या लह्वानशा ज्योतीनं 
माझ्या चिमुकल्या अंतःकरणांत भरपूर प्रकाश पडला, 

१२६ 


आईला समज दिली 


माझा मलाच आनंद झाला, 

मला प्रश्न पडला, त्याग म्हणतात तो हाच का ? त्यागाची व्याख्या 
तरी काय आहे !--कांही तरी टाकून दिल्यानं त्याग हात असतो का? 
स्वीकारण्याच्या कृर्तीत त्यागाचे तत्व नसतं का? 


या प्रश्नांचा विचार करण्याइतकी तत्वज्ञानाची पुंजी माझ्या पदरी 
नव्हती. मी माणमाच्या मनानं विचार करूं लागले, त्यावळीं जी कांही 
कल्पना माझ्या मनांत आली होती तीच खरी, असं मला वाटलं. त्या 
कल्पर्नंत त्याग असो वा नसा, उदात्त वृत्ती असो वा नसा, व्याव- 
हारिकता असो वा नसो--त्या वृत्तींत 'माणुसकी' होती--एव्हढं मात्र 
मला निश्वयानं म्हणतां आलं असतं. 


त्या सबंद दिवसांत बाळासाहेबांनी माझ्या डोळ्याला डोळा दिला 
नाही. रोजचे व्यवहार नित्याप्रमाणे चालल होते. पण त्यांत कांही तरी 
विचुकपणा दिसून येत होता. पूर्वीप्रमाणे मनःप्रवृत्ती मारून बाहेरचा 
देखावा बेमालूम ठेवण्याची ताकद त्या दिवशी बाळासाहेबांच्या आंगी 
राहिली नव्हती. मी दाक्य तितकी सावध होतं; पण माझीही बाळा- 
साहेबांसारखीचच स्थिति होते आहे कीं काय, याची माझी मला दोका 
वाटत होती. 

तो दिवस मी कसातरी घालवला नि दुसऱ्या दिवशी मी सावध 
झालें. बाळासाहेबांच्या विचुकपणांत मात्र फरक झाला नव्हता. 

त्या दिवसापासून त्यांच्या वागणुकीत थोडासा भ्रमिष्टटणा आला 
असावा, असं पाहाणाराला वाटे, दिवाणजी देखील असंच कांडी म्हणूं 
लागले. दिनूमाऊनीं देखील बाळासाहेबांना प्रश्न केला; ' प्रकृती 
बिघडली आहे का! म्हणून विचारलं. पण बाळासाहेबारनी त्यांना नीटसं 
उत्तर दिलं नाही, इतर ओळखीची मंडळीही वेळोवेळी प्रश्न करूं 
लागली नि त्या प्रश्नांनी ते अधिकाधिक भांबावून जाऊं लागले, 

१३९७ 


वेणू वेळणकर 


एक दोन आठवडे असेच निघून गेले, जमनांबेनच्या आईकडून 
मला एक दिवस बोलावणं आलं. आजपर्यंत तिने केव्हांच मला बोला- 
वणं पाठवलं नव्हते. माझ्या काळजांत धस्स झालं. वाटले, जमनाबेन 
आजारी तर नाहीं ! मी त्यांच्या घरीं गळे त्यावेळीं जमनाबेनची आड 
एकटीच घर्री होती. मी विचारलं त्यावेळीं ती म्हणाली, “' सगळंच 
कांही अचानक झालं. आम्हां लोकांचं हे असं आहे. अचानक गोष्टी 
घडून येणं हे आम्हां व्यापारी लोकांच्या जिण्यांतलं एक महत्वाचं अंग 
आहि. माझ्या सासऱ्याकडून तार आली. त्यांनीं जमनाबेनचं लग्न ठखून 
तिथि-निश्चय ही केला होता. तुला बोलावतांसुद्धां आलं नाहीं. नुसती 
केकात्री कशाला पाठवायची ? जमनात्रेन म्हणत होती, कीं तार करा 
म्हणून; पण शेटजींना तें कांही आवडलं नाही -- 


५६ महणजे १ ” मी आश्चर्याने उद्गारले, '' जमनाबेनरच॑ लम” झालं 
कीं काय!” 


ती म्हणाली, “' हो. ती आतां सासरी गेली आहे. आणखी एक 
महिन्याने इथं येईल. ” 

मला धक्का बसला, आपलं म्हणायला आतां कुणीच राहिलं नाई. 
जिवाभावाची एक मेत्रीण होती तीही दुरावली. तिची आई झाली तरी 
वडील माणूस, तिथं एका पातळीवर बोलणं संभवत नव्हतं. 

इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून कांही वेळाने खिन्न अंतःकरणानं 
मी घरीं आलें. त्या दिवशी मी केलिजांतही गेळे नाहीं. मन कसं उदास- 
वाणे झालं होतं. जग अगर्दी भयाण वाटूं लागले. 

खोलींत समोर टांगलेला बाळासाहेबांच्या आईचा फोटो माझ्या 
नजरेसमोर होता. मला वाढलं, माझ्याकडे बघून कांहीतरी बोलायला ती 
उत्सुक झाली आहे. मी वेड्यासारखी कितीतरी वेळ त्या फोटोकडे टक 
लावून पाहात राहिलें, वेगवेगळे बिचार मनांत येत होते. ती माउली 
आज हयात असती तर मी कोणत्या स्थितींत असते, याची मी कल्पना 

१२३८ 


आहेला समज दिली 


करूं लागले. आजच्या संपन्नावस्थेत आम्ही आहोत, ती संपन्नावस्था 
आम्हांला आणून देण्यासाठीं या माउलीन आपला देह ठेवला. ती 
ह्यात असती तर अजूनपावेता. माझी आई तिच्या घररी सेपाकीण 
म्हणून राहिली असती, त्यांच्या कुदुंबांत मी वाढलें असते, शिकलेसवरले 
असते, कदाचितू यापूर्वीच चांगलंसं स्थळ पाहून तिनं माझे लमद्दी करून 
दिलं असतं. 

मनांतली तळमळ अनावर झाली. काय करावं है सुचेना. डोकं 
अगर्दी भमणभणू लागलं. 

कोलनवॉटर्ची घडी डोक्यावर घालून मी ईझीचेअरवर पडले होतं. 

कुणाची तरी चाहूल लागली म्हणून मी डोळे उघडून पाहिले, तो 
बाळासाद्दैव शेजारच्या खुर्चीवर येऊन बसले होते. 

“ प्रकृती बरी नाहीं का!” बाळासाहेबांनी अगदीं मृदु शब्दांनी 
विचारले, 

मला उत्तर सुचेना. 

“६ आतां मी सावध झालो आहे. ” बाळासाहेब म्हणाले, “पुन्हां तसं 
कांहीं माझ्या हातून घडणार नाही. आता माझं मन माझ्या ताब्यांत 
पक्केपणानं आलं आहि. कुठंही गेला, कांहीही झालं, तरी जे वळण एकदां 
लागलं आहि ते आतां मी सोडणार नाही. पण या .ढ॑ इथं राहाणं मात्र 
मला दुःसह झाले आहे. क्षमा कर, मी जाता याबद्दल तुला काय वाटेल 
याची मला अटकळ आहे. तरीही माझा आग्रह आहे, कीं मला जायला 
परवानगी दे. मी निरोप घ्यायला आला आहे!” 

कपाळावरची घडी फेकून देऊन मी ताडकन्‌ उठून बतून म्हणाले, 
: कुणाच्या हुकमानं तुम्ही जातां? ” 

माझा प्रश्न ऐकून बाळासाहेब स्तंमित झाले. “ जा जाऊन आपल्या 
कामाला लागा ! ? मी दरडावून म्हटलं, '“ कांह नाही इथून जातां 

१२९ 


वेणू वेलणकर 


यायचं ! कशाला उगीच .धमकी देतां ! चांगलं डांबून ठेवणार आहे इथं 
तुम्हाला, काय करते आहे ते पहा, नि मग जायचा प्रयत्न करा. ” 

बाळासाहेब आश्चर्य चकित होऊन म्हणाले, “' तुझा इरादा तरी 
काय आहि ! कां मला उगीच छळतेस ? जाऊं देना मला. मी 
सामानसुद्धां बांधून तयार ठेवलं आहे. ” 

मी ताडकन उठलं नि घांवतच बाळासाहेबांच्या खोलींत गेलं. 
त्यांनीं बांधलेलं सामान भराभर सोडून टाकून टुंकेतल्या वस्तू काढून 
जागच्या जागी ठेऊन दिल्या. 

बाळासाहेब नुसते पाहात उभे होते. मी जायला निघाले असं पाहून 
ते म्हणाळे, “ बरं आहे, जशी तुझी मर्जी, ” 

मी कांहींच उत्तर न देतां माझ्या खोलींत आले. 

त्या रात्री आईला मी माझ्या खोलींत बोलावून घेतलं. यापूर्वी 
तिला मी असं कधींच बोलावलं नव्हतं. खोलींत येतांना ती घाबरी- 
घुबरी झाली होती. 

५ काय झालं ? ” ती म्हणाली. 

६ कांही नाहीं आई, ” मी म्हटलं, “' मला तुला एक गोष्ट विचारा- 
यची आहे---” बाळासाहेबांच्या आईच्या फोटोकडे बोट करून मी 
म्हटलं, “' या बाईनं एक हजार रुपये दिळे नसत तर आज माझी 
स्थिति काय झाली असती, ते मला सांगशील का?” 

“ काय व्हायची स्थिती ? ” आई एक सुस्कारा टाकून म्हणाली, 
५ कुणाच्या तरी घर्री धर्मांचे तुकडे मोडीत राहिला असता किंवा देशा- 
घडीला तरी लागलों असतो -- 

५६६ माझी काय स्थिति झाली असती ! दारिय़ांत असतो तर तूं 
माझे काय केलं असतंस? ” 

6 कुठले तरी साधारणसं स्थळ पाहून, कुणातरी भटाभिक्षुकाच्या 
गळीं तुला बांधलं असतं. ” 

१४० 


आहेला समज दिली 


£ होय ना ! मग आज हं वेभमव आहे कुणाचे १ ” 

£ ते तर मी रोज म्हणत असते ! ” आई गहिंबरून म्हणाली, 
६ सारं आई ते त्या माउलीचै-- 

“६ बाळासाहेब तिचे कोण १ ” 

“६ हा काय प्रश्‍न करतेस ! ” आईनं मित्रया वर चढवून म्हटलं 

तुला वेड तर नाह्दी' लागलं १? ती बाळासाहेबांची आई ईं तुला 
माहीत आहे ना?” 

५ म्हृणजे ते हिचे वारस ? असंच ना? ?' मी आईला बजावून 
विचारलं. 

£ म्हणतेस तरी काय १ ” आई म्हणाली, “' तुझ्या बोलण्याचा 
रॉख नाहीं मला समजला ! ” 

मी साघेपणानं बोलायला सुरवात केली, “' ऐक आई. आतां अगदीं 
स्पष्ट स्पष्ट बोलते. दृजार रुपये दिले ते या माउलीनं. ते तिनं दिले नसते तर 
ते तिच्या मुलाचे झाले असते --तिच्या मुलाकडे गेले असते--ते आमच्या 
कडे आले. मी म्हणते, ठेव म्हणून आमच्याकडे आले---ती तिची 
ठेव आम्हीं वापरली, तिच्यावर ब्यापार केला, तो फायदेशीर झाला, 
त्याची शकडो पट झाली, आतां तिचा हा मुलगा आला आहे. त्याची 
इष्टेट नको का त्याच्या इवालीं करायला £ ” 

“६ मग तूं नि मी कुठं जाणार 

£ ते मी मागाहून सांगेन, ” मी हळूच इंसून म्हटलं, “' पण मी 
म्हटलं एव्हढं सारे तुला पटतं ना!” 

५: मला पटतं, ” आई म्हणाली, “' पण ते आपले मनाच्या बोलीनं 
पटतं. व्यवहाराच्या बोलीला कांही ईं पटायचं नाहीं. कोण असा कणाचा 
अवतार आडे, कीं जा चाढून आलेल्या संपत्तीवर लाथ मारील! माझ्या- 
जागी जर दुसरे कुणी असतं तर त्यानं म्हटलं असतं, “ तिनं मला दिलं. 

१४२१ 


वेणू वेळणकर 


मी त्याच्यावर कमावलं, आतां काय हक्क आहे तिचा त्याच्यावर !-- 
मीं तसं म्हणत नाहीं. पदोपदी मी आठवण ठेवते आहे, हें सगळं तिचं 
आहे. नि ही आठवण ठेवत आहे म्हणूनच मला बरकत येते आहे. ” 

£ स्वरं ना ईं! तर आतां हे सारं तिचे तिच्या सुलाला देऊन 
टाक. तो आतां कर्तासवरता झाला आहे. पूर्वी कसाही असेल पण 
आतां निवळला आहे. तुला नाहीं असं वाटत. ! 

आई थोड्याशा श्ांतपणानं म्हणाली, ““हा--तो निवळला आहे यांत 
कांहीं शंका नाहीं. पूर्वीच्या वृत्तीचा आतां मागमूस सुद्धां राहिला नाही, 
ई एकादं मेलं आंधळं सुद्धां सांगेल, पण तुझा रोंख काय आहे, त॑ जरा 
मला स्पष्ट करून सांगदील ? 

£ रॉख एव्हढाच आहे, मी म्हटलं, “ त्यांचं त्यांना देऊन टाका- 
यचे नि आपला मार्ग आपण पाहायचा. ” 

५ मार्ग पाहायचा म्हणजे काय करायचं ? ” आईनं विचारले. 

६६ काय करायचं! ” मी हेसून म्हटलं, “' एव्हढंसुद्धा तुला कळत 
नाहीं आई! अग ते नाहीं का आपल्याकडे नोकर म्हणून राहिले, तसच 
आपणही त्यांच्याकडे नोकर म्हणून राहायचं ! ” 

£ नोकर म्हणून ! ” आईने विचारलं, 

6 कां राहूं नये ! ” मी म्हटलं नि चांगली तोंडभर इंसले, ““ काय 
लाज आहे त्यांत ? एरवी कुठे तरी नोकरीच केली पाहिज्ञे होती ना 
आपल्याला !? त्यांवरळी कुठें तरी देऊन टाकणार होतीस ना मला भटा- 
भिक्षुकाला ! मग आतां असं कर-हें वैभव त्यांचं त्यांना देऊन टाक नि 
त्याबरोबरच आपली मुलगीही त्यांना देऊन टाक, ” 

आई अगर्दी नाजूक हंसली. 

मी विचारलं, ““ कां इंसलीस ! ” 

५ किती झाले तरी तूं खाणावळवाली'ची मुलगी. शवटी आपल्याळा 
हवा तसा नवरा “ शिजवून ) तयार करून घेतलास ! ” 

१४२ 


भाइला समज दिली 


आई मोठमोग्यानं इंसू लागली, मीही हंसलें. दोघींचंही इंसं एक- 
मेकांत मिसळलं. आम्ही वेड्यासारख्या हसत सुटलो. 


बाळासाहेब धांवतच खोलींत आले नि म्हणाले, “' काय झालं!” 

£ ते असं आहे, ” आई म्हणाली, ““ ही आमची वेणू 
म्हणते आहे--”' 

£ कांही सांगायचं नाहीं ! ” मी दरडावून सांगितलं, “' योग्य वेळी 
योग्य गोष्टी झाल्या पाहिजेत. भलत्या वेळीं भलतं बोललं तर त्याचा 
भलताच परिणाम व्हायचा. त्यांचें डोकं हलीं नाहीं ठिकाणावर--ते जरा 
ठिकाणावर येऊं दे म्हणजे मग सांग. नाहींतर असं कर---यांना घेऊन 
जा बाजूला---नि काय त॑॑सांग म्हणजे त्यांचं डोके आपोआप ठिका- 
णावर येईल. 

इंसत इंसत आई म्हणाली, “' इकडे माझ्याबरोबर या बाळासाहेब! ” 

चुचकारलेल्या कुलुंगी कुत्र्यासारखे बाळासाहेब आईच्या मागोमाग 
निघून गेले. 

ता क्षण निःसीम आनंदाचा होता. त्या आनंदांत मी निमम्न 


होऊन गेले. 


१४३ 


प्रकरण २० 
माझी मालकी कायम राहिली 


जमनाबेन माहेरी आली ती अगदी वेळीच आली. सुलोचनेनं 
मांझी उपेक्षा केली, जमनांबेननं मला फसवलं --पण मी दोघींनाही 
विसरे नाहीं, सुलोचनेला देखील बोलावलं होतं. 

वेणू वेलणकरचा अवतार संपला. 

बाळासाहेब खाणावळीचे मालक झाले--माझी मालकीही कायम 
राहेली. 


3 तत्सत्‌ 


१४४